शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:05 IST

..त्या बैलाला हाकलला, आणि अचानक  माझ्या मनात झाडं वस्तीला आली.  देवराईतली झाडं. त्यांचा स्वभाव, त्यांची सुख-दु:खं घेऊन आली.  मी नम्र होऊन त्यांना शरण गेलो. मग त्या झाडांनी मला त्यांचे आकार दिले. रंग दिले. टेक्श्चर्स दिली.  सावल्यांचे तुकडे दिले. कवडशांच्या झिरमिळ्या दिल्या.   माझ्या यशस्वी, र्शीमंत; पण शुष्क आयुष्यात नवं कोवळं रक्त भरलं..  तिथून मग मी सुटलो. ..मी पूर्वीसारखा अजिबातच नव्हतो.  कातडी सोलून काढावी, तसा ताजा, कोवळा,  मऊ होऊन गेलो होतो!

ठळक मुद्देचित्रकार सुभाष अवचट यांच्या ‘सेक्रेड गार्डन’ या नव्या चित्रमालिकेचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे दिनांक 11 ते 16 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ते वरळीतील आर्ट अँण्ड सोल गॅलरीत 7 जानेवारीपर्यंत असेल. त्यानिमित्ताने..

- सुभाष अवचट

ठ म्हणता भ उमगत नाही. तगमग थांबत नाही. दार उघडत नाही. उजेड दिसत नाही. कसली ठिणगी म्हणून पेटत नाही. ओला चिकट कंटाळा पसरून असतो.. ही अवस्था सगळ्याच कलाकारांच्या नशिबात लिहिलेली असते.मी तरी असा कोण वेगळा लागून गेलो?सारखी तीच तीच गवारीची पांचट भाजी खाऊन खाऊन कंटाळा यावा, तसं मला झालं होतं. मी रोज तेच तेच करतो आहे. तेच कॅन्व्हास. तेच रंग. तीच टेक्श्चर्स. तेच तंत्र. विषयही तेच. खूप काम झालेलं, खूप कौतुक झालेलं. त्या कौतुकाचं ओझं डोक्यावर वाढत चाललेलं आणि जे जे जुनं केलं ते ते सगळंच साचून राहिलेलं. लोक म्हणत, कसला भारी रे तू, आणि मी माझ्या आत साचत चाललेल्या डबक्याने चिडीला आलेलो.हे होतं असं.सगळ्यांचंच होतं. कलाकारांना तर शापच असतो तो. सुटका होत नाही. हळूहळू आपण या गुंत्यातून सुटायला हवं; ही इच्छाच मरायला लागते. मग माणसं जुन्या रांगोळ्या घालत राहतात. सवयी सुटत नाहीत. स्टाइल्स बदलत नाहीत. कारण माणसं भिऊन असतात. टरकून असतात. ओवळं सापडलं नाही तर नागडं राहावं लागेल या भीतीने सोवळी सोडत नाहीत. मी तसा नागडेपणाला घाबरणारा नव्हे; पण अंगावरच्या रंगांचे जुने लेप सोलून सोलून निघत नव्हते. सगळ्यापासून दूर जायचं, ते कुठे? हे ठरत नव्हतं. मी काम करत होतोच. कॅन्व्हासमागून कॅन्व्हास हातावेगळे होत होते. पण मला ज्याची तहान लागली आहे, ते ‘हे’ नव्हे; याची जाणीव मनात टक्क जागी असे. छळ.शेवटी त्या जीवघेण्या डिप्रेशनमध्येच एका कुठल्यातरी क्षणी डोळ्यापुढे देवराई सळसळली.कितीतरी वर्षं गावाबाहेर वाढत राहिलेल्या पुरातन वृक्षांचं गूढ वन. लहानपणी होतं ते माझ्या आसपास. तिथून जे मनात घुसलं, ते बहुतेक मग तिथेच वाढत राहिलं. त्याची मुळं खोल घुसत राहिली असावीत. पारंब्या शरीरात पसरत राहिल्या असाव्यात. कधी कधी दिसायचं. पानांच्या उंच पसार्‍याच्या चिमटीतून उजेडाचे कवडसे पाझरत खाली बुंध्याशी येतात, तिथे ध्यानस्थ बसलेल्या आकृत्या दिसत. या जिवंत आकृत्या त्या झाडाखाली स्वस्थ बसून काय करत असतील, असं मनात येई. देवराईतली झाडं कुणी मुद्दाम लावत नाही. वाढवत नाही. ती आपोआप रुजतात. वाढत जातात. माणसाच्या स्पर्शाविना वाढलेलं हे जंगल देवाचं असतं. त्या गूढ जगाला उद्देश नाही, व्यवस्था नाही, रीत नाही, नियम नाहीत.. पुराणपुरुष असावेत अशा त्या झाडांनी बघता बघता माझा कब्जा घेतला आणि त्यांच्या त्या ओल्या काळ्या सावलीत मनातले पशू वितळू लागले.खूप वर्षांपूर्वी परदेशात प्रवासाला निघालेलो असताना झेन तत्त्वज्ञानाचं एक चिटुकलं पुस्तक हाती लागलं होतं. त्यातले झेन गुरुजी भारी होते. एक शिष्य त्यांना म्हणाला, गुरुजी, मला स्वत:चा शोध घ्यायचा आहे, मदत करा.गुरुजी म्हणाले, जंगलात जा. जंगल तुला शिकवेल. परत येऊन काय शिकलास ते सांग !हा गेला जंगलात. तर त्याला अचानक विचित्र आवाजच ऐकू येऊ लागले. कोणीतरी जोरात उधळलंय. मोठे घुत्कार घालतंय. झाडांच्या बुंध्याला अंग घासतंय. डरकाळ्या फोडतंय. दगडांना टक्कर देत सुटलंय. त्याला वाटलं, माजावर आलेला बैल असावा. भयंकर मोठय़ा आकाराचा अवाढव्य, अजस्र बैल !.. त्याला दुसरं काही दिसेना.तो परत आला, तर गुरुजी म्हणाले, काय शिकलास?तो म्हणाला, काही नाही गुरुजी. फक्त एक आडदांड बैल होता असावा जंगलात. दुसरं काही दिसलं नाही.गुरुजी हसले. म्हणाले, वेड्या, बैल होता; पण तो जंगलात नव्हे, तुझ्या मनात होता. आहे अजून तो तिथे. पाहिलास का? आत्मशोधाला निघालाहेस ना.? आधी त्या बैलाला हाकल; तरच दुसरं काही दिसेल!- खूप वर्षांपूर्वी पुस्तकात भेटलेले ते झेन गुरुजी अचानक मदतीला धावल्यासारखे आठवले मला. एका रात्री त्यांना मिठी मारून रडलो. म्हटलं, माझा बैल सापडला मला, गुरुजी !त्या बैलाला हाकलला, आणि अचानक माझ्या मनात झाडं वस्तीला आली. देवराईतली झाडं. त्यांचा स्वभाव, त्यांची सुख-दु:खं घेऊन आली. मी नम्र होऊन त्यांना शरण गेलो. मग त्या झाडांनी मला त्यांचे आकार दिले. रंग दिले. टेक्श्चर्स दिली. सावल्यांचे तुकडे दिले. कवडशांच्या झिरमिळ्या दिल्या. बुंध्यांचे खरबरीत स्पर्श दिले. पानांची हिरवी ओल दिली. माझ्या यशस्वी, र्शीमंत; पण शुष्क आयुष्यात नवं कोवळं रक्त भरलं.. तिथून मग मी सुटलो... मी पूर्वीसारखा अजिबातच नव्हतो. कातडी सोलून काढावी, तसा ताजा, कोवळा, मऊ होऊन गेलो होतो. माझ्या वसवसत्या अस्वस्थ आयुष्यात अचानक शांतता पसरली. सतत उसळ्या खाणारं माझं अस्वस्थ मन वडीलधार्‍या खोल तळ्यासारखं नि:शब्द होऊन गेलं. पहाडे तीन तीन वाजता उठून मी कॅन्व्हाससमोर बसू लागलो. तहानभुकेची जाणीव संपली. व्यसनांच्या गरजा सरल्या. माझ्या हातातल्या रेषा वळल्या. रंग सौम्य झाले. थरावर थर चढवून टेक्श्चर्स रचण्याचं हातखंडा, कसब वितळून गेलं. मी वापरतो ते अँक्रेलिक रंगसुद्धा वॉटर कलर्ससारखे पातळ, पारदर्शी होऊन गेले. कितीतरी दिवसांनी मी माझ्या कॅन्व्हासवर गाणी वाहत चाललेली अनुभवत होतो...हेच तर हवं होतं मला. नवं. आधीसारखं नसलेलं. कधीच न केलेलं. न अनुभवलेलं. कोरं. अस्पर्श.कधीचा शोधत होतो.आधीच का नाही सापडलं? वयाच्या चाळिशीत? निदान पन्नाशीत? आता तर साठी उलटली की !कदाचित, त्यासाठी रक्तामांसाची किंमत मोजावी लागत असावी. नशिबात लिहिलेला असह्य छळ सोसून पूर्ण करण्याची गरज असावी. ‘प्रोसेस’मधून जाण्याला पर्याय नसावा. या विचित्र ट्रान्झिटमधून खंगतखंगत हिंमत ठेवून पुढे सरकत राहातात, ते सुटतात. बाकीच्यांचं माकड होतं.अपवाद एकच.ज्ञानेश्वर !वयाच्या सोळाव्या वर्षीच हा माणूस सगळ्यातून सुटून ‘तिथवर’ कसा पोहोचला, देव जाणे!मी आत्तापुरता तरी ‘सुटलो’ आहे ! ------------------------------subhash.awchat@gmail.com(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)