परसिव्हरन्स हॅज लॅण्डेड...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 08:14 PM2021-02-20T20:14:23+5:302021-02-20T20:34:12+5:30

या मिशनचे सात महत्वाची उद्दिष्ट म्हणजे मंगळावरती असलेल्या पुर्वीच्या जीवसृष्टीच पुरावे शोधणे, सूक्ष्म जीवाणूंचा शोध घेणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवाने मंगळावरती पहिल्यांदा पाऊल ठेवण्याची वाट तयार करुन देणे.

Perseverance has landed | परसिव्हरन्स हॅज लॅण्डेड...!

परसिव्हरन्स हॅज लॅण्डेड...!

Next

हर्षल राजे, खगोलशास्त्राचे अभ्यासक

अमेरिकेच्या फ्लोरिडा स्थित केप कॅनाव्हरन केंद्रावरुन अ‍ॅटलस ५ राॅकेटनी 30 जुलै २०२० आकाशात झेप घेतली आणि सर्वांच्याच मनात एक उत्कंठा निर्माण झाली. सगळी माणसं, जी या मोहिमेसाठी गेली आठ ते दहा वर्ष काम करत होती ते इंजिनियर्स, डिझाईन स्पेशलिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मोहिमेसाठी काम करणारे खगोल जीवशास्त्र आणि खगोल भूगर्भ शास्त्रज्ञ यांचा या मोहिमेमध्ये महत्वाचा वाटा होता. या मोहीमेला नाव दिले होते... मार्स २०२०. 

२०२० हे पृथ्वीतलावरच्या सगळ्यांसाठी परीक्षेचे वर्षं. अजूनही त्या परीक्षेचे सावट गेलेले नाही. पण त्या ऐन परीक्षेच्या काळात आणि मानवतेची कसोटी पाहणाऱ्या काळामध्ये या मोहिमेला मूर्त रुप देणे यासाठी ८ ते १० वर्ष कसोशीने आणि मन लावून झटणं हे कष्ट घेतले. त्याचे पुढच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये काय फलित येणार हे बघणारी ही मोहीम. सात महिन्यांनंतर या ऍटलास रॅाकेटने अंतराळात सोडलेले मार्स २०२० या मिशन अंतर्गत परसिव्हरन्स मार्स रोव्हर हा आत्तापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि सर्वात प्रगत असा मार्स रोव्हर किवा ज्याला एक छोटी रोबोटिक गाडी म्हणु असा तो रोव्हर मंगळाच्या कक्षेत पोहोचलेला होता. १८ फेब्रुवारी दुपारी २ वाजुन २० मिनिटांनी तो मंगळावर उतरणार होता. पण त्याच्या आधीची जी ७ मिनिटं आहेत ज्यात एन्ट्री डिसेंड आणि लॅण्डींग ही खूप काळजीची सात मिनिटे होती. त्या ७ मिनिटामध्ये, मागचा इतिहास असा सांगतो की काहीही घडु शकते. त्यामुळे शास्त्रज्ञांची कसोटी पाहणारा हा काळ होता. आणि त्याची सुरुवात झाली. तेव्हा नासाच्या कंट्रोलरुममधून परसिव्हरन्सला आज्ञा गेली की आम्ही नियंत्रण सोडत आहोत. 

आता पुढे तुझं तुला जायचे आहे. ७ मिनिटांमध्ये बराचसा डेटा येत होता. पॅराशूट उघडले होते. खाली परसिव्हरन्सचा खाली उतरण्याचा वेग तो नियंत्रणात होता. अपेक्षित वेगाने तो खाली उतरत होता. पॅराशूट उघडल्यानंतरच जमिनीच्या काही अंतरावर आल्यानंतर त्याची एक मॅकेनिकल क्रेन जी ज्या मिशनमध्ये पहिल्यांदा वापरली गेली. त्याद्वारे या रोव्हर जमिनीवर उतरवला गेला आणि पहिला मेसेज आला...परसिव्हरन्स हॅज लॅण्डेड...! 

आकाशनिरीक्षक आणि त्यातल्या त्यात प्लॅनेटरी सायन्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे मिशन आहे. परसिव्हरन्स हे इतकं महत्वाचे का आहे तर ते आत्तापर्यंतचं सर्वात आधुनिक आणि क्लिष्ट तंत्रद्यानाने युक्त असं रोव्हर आहे. याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे मंगळावरचे सॅम्पल्स घेणे. 

परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी. चिकाटी दाखवत पुढे जाणे म्हणजे परसिव्हरन्स. या मिशनचे सात महत्वाची उद्दिष्ट म्हणजे मंगळावरती असलेल्या पुर्वीच्या जीवसृष्टीच पुरावे शोधणे, सूक्ष्म जीवाणूंचा शोध घेणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवाने मंगळावरती पहिल्यांदा पाऊल ठेवण्याची वाट तयार करुन देणे.

आत्तापर्यंतच्या मोहिमांमध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. यात असे सापडले होते की मंगळावरती पाण्याचा अंश होता. आणि यामुळेच इथे जीवसृष्टी  असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याला शोधण्यासाठी त्याचे संकेत जे अश्मीभूत रुपाने मंगळाच्या माती किंवा दगडांमध्ये सापडतात का याचा शोध घेणे याचा शोध घेणे हे या रोव्हरचे महत्वाचे काम आहे. त्याबरोबरच तिथल्या वातावरणाचा आणि भुगर्भाच्या अभ्यास करणे हे देखील एक महत्वाचे काम आहे. आता तुम्ही म्हणाल की यापुर्वीच्या मिशन्स नी ही कामे केली नाहीत का तर केली. पण परसिव्हरन्स या सगळ्याच्या दोन पाउल पुढे जात आहे. परसिव्हरन्स वर आधीच्या रोव्हरपेक्षा प्रगत असे कोअर सॅम्पल ड्रील्स आहे. ते ४५ सॅम्पल घेणार आहे. त्यासाठी निवडली गेलेली जागा हे एक विवर आहे. हे निवडण्याचे कारण म्हणजे हे विवर पाण्याने भरल्याच्या खुणा आहेत. ते पाणी पुढे जाउन त्याचा एक आकार तयार झाला आहे. आणि त्यामुळेच इथे सुक्ष्म जीवाष्णू अश्मांच्या रुपात इथे सापडण्याची शक्यता आहे. यासाठी वापरले जाणारे ड्रील देखील अत्याधुनिक आहे. सॅम्पल घेतल्यानंतर त्या रबर ट्युबमध्ये भरुन एका ठिकाणी ठेवुन दिली जाणार आहेत. आणि हे झाले की पुढच्या मोहिमांमधून ते परत पृथ्वीवर आणण्याची सोय असणार आहे. 

आता हे जेजेरो क्रेटर जे आहे ते साधारण पणे ४५ किलोमीटर व्यासाचे आहे. मंगळाच्या उत्तर भागात आहे. साधारण ३.५ अब्ज वर्ष इथे नदीच्या प्रवाहाचे अस्तित्व असण्याची शक्यता फोटोंवरुन लक्षात येते. अशाठिकाणी जिथे पाण्याचा प्रवात असतो अशा ठिकाणी सूक्ष्म जीवाणू असण्याची दाट शक्यता असते. आणि हेच या मोहिमेतून शोधले जाणार आहे. इतका खर्च करायची गरज काय असं म्हणाल तर मानवाला जे कुतुहल आहे की आपणच एकटे आहोत का जिथे जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे का याचा शोध घेणं. तसेच आत्ता मंगळावर जे वातारण आहे त्यापेक्षा काही वातावरण पूर्वी होतं का हे देखील मोहिमेतून शोधले जाणार आहे. म्हणजे मंगळावरच्या पुरातन वातावरणाची अवस्था कशी होती याचा अभ्यास करणे. यापूर्वी जे रोव्हर गेले होते यांच्यामधून एवढी ही वैज्ञानिक माहिती घेण्याची शक्यता नव्हती. आणि जिथे पाणी आहे तिथे जमिनीत थेट दगडांचे नमुने घेतले तर आपल्याला उत्तरे नक्की मिळतील अशा ठिकाणी त्या रोव्हरला उतरवले गेले आहे. 

पूर्वी एखाद्या ग्रहावर स्पेसक्राफ्ट पाठवले की ते तिकडचेच व्हायचे. पण या मिशन मध्ये महत्वाचा भाग म्हणजे जाऊन परत येणे प्रयोगाचा महत्वाचा भाग आहे. मानवाला मंगळावर पाठवण्याच्या मोहिमेचाही हा महत्वाचा भाग असणार आहे. चंद्रावर माणूस गेला आहे आणि परत आला आहे. पण ते म्हणजे अंगणात जाऊन परत येण्यासारखे आहे. पण पृथ्वी आणि मंगळाच्याजवळ असते याचे गणित मांडून मानवाला मंगळावर पोहोचवून परत आणणे याची जी कसरत करावी लागणार आहे त्याचे पहिले पाऊल या मोहिमेत आहे. हा रोव्हर नमुने तर घेणार आहे. पण ते प्रयोग करणार नाही. ते फक्त उत्खनन करुन ठेवणार आहे. आणि पुढच्या मिशनमधून ते मागे आणले जाणार आहेत. 

मंगळाचे वातावरण हे पृथ्वीच्या खूप जवळ जाणारे आहे. आणि त्यामुळे जर त्या पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ जाणारे तयार केले जाऊ शकते का याची पडताळणी केली जात आहे. पुढे इथे मानवी वसाहत केली जाऊ शकते का याची चाचपणी करायची आहे. त्यामुळे त्याला लागणारा खर्च प्रचंड आहे. पण आपण बघितले आहे की, भारताने जरी अशी काही मोहीम करायची म्हटली तर आपण मंगळयान मोहीम खूप कमी खर्चात करुन दाखवली. तशीच मोहीम भारत देखील करण्याचा विचार या मोहिमेमुळे करु शकतो. मानवाचे पहिले पाऊल मंगळावर पडण्यासाठी, तिथे नवे पर्व चालू करण्यासाठी जी पहिली पायरी आहे ते म्हणजे ही मार्स २०२० मोहीम आहे.

Web Title: Perseverance has landed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.