प्रसिद्ध चित्रपट समीक्षक शिरीष कणेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त. शास्त्रीय संगीतातील तो जाणकार नाही की फिल्म इन्स्टिट्यूटचा पदवीधर नाही. घरचे कुणी सिनेमा क्षेत्रातही नाहीत, तरीही सिनेमाच्या विविध पैलूंचे त्याच्यासारखे रसग्रहण, भाष्य, त्यातील कलाकार ...
दुसऱ्याला न आवडणारी एखादी कृती आपण केली की त्याची भरपाई एका चांगल्या कृतीने होईल, असे आपल्याला वाटते; पण मानसशास्त्र सांगते, एका चुकीची कृती पुसण्यासाठी एक नव्हे, पाच चांगल्या कृती कराव्या लागतात! ...
ओबडधोबड, खाचखळग्यांचा रस्ता अचानक गुळगुळीत डांबरी झाला. गाडी थांबवली तर बाहेर रोंरावणारा वारा! आम्ही धडपडत बाहेर पडलो. तो वारा पिऊन सुनील बेभान नाचू लागला. एक दांडगट अदृश्य हात आम्हाला दरीकडे ढकलत होता. नकळत मी ओरडलो, ‘सुनील, सचिन काळजी घ्या रे!’ ...
आल्प्सची भौतिकता आणि हिमालयाची आध्यात्मिकता चित्रांत टिपणारा तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर. प्रवासात त्याला हिमाच्छादित पर्वतांचं दर्शन झालं आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला. यानंतर आल्प्स आणि हिमालय पर्वतराजीत सलग काही वर्षं त्यानं प्रवास केला. चित्रं ...
पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...
२०१४ ते २०१७ या तीन वर्षांत पेट्रोलियमजन्य पदार्थांवरील करांत सरकारने १५२ टक्के वाढ केली आहे. पण पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती वाढण्याचे तेच एकमेव कारण नाही. भारतातील सार्वजनिक-खासगी तेल कंपन्याही पद्धतशीरपणे जनतेची लुबाडणूक करतात. ...
झिका, इबोला, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, डेंग्यू, आता नुकताच आलेला निपाह.. आजपर्यंत कधीच न ऐकलेले हे असे साथीचे आजार ‘अचानक’ कुठून येतात? मोठ्या देशांनी विकसनशील देशांत मुद्दाम पसरवलेले हे रोग असतात, हा व्हायरल ‘संशय’ कितपत खरा? आपली औषधं खपवण्यासाठी कंप ...
यंदा सरकारी खर्चाने ३४ जिल्ह्यांत सामुदायिक विवाह साजरे झाले. गडचिरोलीत सर्वाधिक १०२ जोडप्यांचे विवाह झाले. मुंबईत एका सोहळ्यासाठी तब्बल ४६ लाख रुपये गोळा झाले, तर साऱ्या सोहळ्यांसाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या विवाहांना प्रतिसाद तर चांगला हो ...
लग्न ही अतिशय खासगी आणि कौटुंबिक बाब, पण त्याचे आज राजकीयीकरण होत आहे. लोकांची मानसिकताही अशी की, पुढाऱ्यांनी गावासाठी काही केले नाही, पिण्याचे पाणी पुरवले नाही, तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या नाहीत तरी चालेल; पण आमच्या लग्नांना, कुटुंबातील अंत्यविधी ...