Operation राहत
By Admin | Updated: April 12, 2015 19:19 IST2015-04-12T19:19:05+5:302015-04-12T19:19:05+5:30
यादवीने त्रस्त झालेल्या आणि सौदी अरेबियाच्या बॉम्बहल्ल्यांमध्ये जळणा:या येमेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची यशस्वी सुटका करणारी भारतीय मोहीम सध्या जगभरात गाजते आहे. या मोहिमेत प्रत्यक्ष लढलेल्या एका ‘सेनानी’ अधिका-याचे अनुभव.

Operation राहत
बी. के. कुलकर्णी
यादवीने त्रस्त झालेल्या आणि सौदी अरेबियाच्या बॉम्बहल्ल्यांमध्ये जळणा:या येमेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची यशस्वी सुटका करणारी भारतीय मोहीम सध्या जगभरात गाजते आहे.
या मोहिमेत प्रत्यक्ष लढलेल्या एका ‘सेनानी’ अधिका-याचे अनुभव.
-----------------
गेली अनेक वर्षे मी एअर इंडियाच्या सेवेत आहे. आजवर अनेक उड्डाणो अनुभवली. भ्रमंतीला बाहेर पडलेल्या प्रवाशांना जगाच्या या टोकापासून त्या टोकार्पयत घेऊन जाणो हा आमच्या नित्याच्या कामाचा भाग!
एखाद्या ठिकाणाहून निघणो आणि ठरल्या स्थळी पोचणो हेही नेहमीचेच!
- पण मातृभूमीच्या दिशेने घेऊन जाणारे विमान आकाशात उडताच झालेला टाळ्यांचा कडकडाट आणि त्यामागोमाग वाहिलेले अश्रूंचे पूर मी पहिल्यांदा अनुभवले तेव्हा खरे सांगतो, क्षणभर श्वास थांबल्यासारखेच झाले!
सौदी अरेबियाने सुरू केलेल्या बॉंबहल्ल्यांमधून आपण जिवंत वाचू का या विचाराने थरकाप उडालेल्या नागरिकांची येमेनमधून वेगाने सुटका करून त्यांना घरोघरी सुखरूप पोचवण्यासाठी झटलेले ‘ऑपरेशन राहत’ हा माङया हवाई आयुष्यातला अविस्मरणीय असा अनुभव आहे.
येमेनची अशांत राजधानी सनामधून पहिले विमान जेव्हा आफ्रिकेतल्या जिबोटीच्या दिशेने ङोपावले तेव्हा विमानातल्या प्रवाशांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष आयुष्यभर माङया नजरेसमोरून हलणार नाही.
ऑपरेशन राहतची सुरुवात 1 एप्रिलपासून झाली. एअर इंडियाच्या दोन विमानांसह आमची टीम शेजारच्या आफ्रिकन देशातल्या जिबोटीला येऊन पोहोचली. मात्र रेस्क्यू ऑपरेशनला तत्काळ सुरुवात होणो शक्य नव्हते. भारतीय नागरिकांना येमेनमधून सोडविण्यासाठी जी उड्डाणो करायची होती, त्यासाठी विविध परवानग्यांची गरज होती. या परवानग्या मिळवण्यातच पहिले दोन दिवस गेले. नव्या (अधिक गुंतागुंतीच्या) परिस्थितीत येमेनच्या आकाशात उड्डाण करण्यासाठी सौदी अरेबियाच्या संरक्षण विभागाची परवानगी मिळवावी लागते. परवानगी मिळाल्यावर त्यांनी दिलेल्या वेळेतच उड्डाण करून आणि दिलेल्या मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. त्यात सौदी अरेबियाने येमेनमध्ये बॉम्बिंग सुरू केलेले. त्यामुळे जेव्हा हल्ले थांबविलेले असतात असा मोकळा विंडो टाइम उड्डाणांना मिळतो. तो अगदी दोन-तीन तासांचाच असतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत धोकादायक जागा टाळून आणि योग्य अभ्यास करूनच हवाई मार्ग आखला जातो. त्याप्रमाणो एअर इंडियाने ही उड्डाणो केली.
सर्वप्रथम ही मोहीम मस्कतमधून राबवायची ठरली होती. मात्र प्राप्त वेळेत आवश्यक परवानग्या न मिळाल्याने येमेनजवळच्या जिबोटीची निवड केली गेली. जिबोटीने भारताच्या या मोहिमेला मोठी मदत केली. जिबोटीमध्ये कंट्रोल रूमची स्थापना करून तेथून आम्ही संपूर्ण मोहिमेचे नियमन केले. परराष्ट्र मंत्रलयाच्या मार्गदर्शनाखाली नौदल, वायूदल आणि एअर इंडियाने ही संयुक्त कामगिरी केली. या सर्व एजन्सीचे सदस्य जिबोटीमध्ये दररोज कामाचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी बैठक घेत असत. त्यामध्ये रोजच्या कामाचा आढावा घेतला जाई आणि दुस:या दिवशीच्या कामाचे नियोजन केले जाई.
ज्या नागरिकांना येमेनमधून बाहेर पडता आले त्यांच्या डोळ्यांतून अखंड वाहणारे अश्रू एकाचवेळी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत होते.
सनामधून पहिले विमान जेव्हा जिबोटीच्या दिशेने ङोपावले तेव्हा प्रवासी भारतीयांनी अक्षरश: टाळ्य़ांचा कडकडाट करून जल्लोष केला.
एअर इंडियाने जिबोटी-सना-जिबोटी अशी चौदा उड्डाणो केली आणि साधारणत: अडीच हजार नागरिकांची सुटका केली. उर्वरित नागरिक समुद्रमार्गे नौदलाने सोडविले. 182 जागांची मर्यादा असणा:या दोन विमानांनी जिबोटीला आणल्यानंतर या नागरिकांना भारतात विविध ठिकाणी पोचवण्यात आले. यामध्ये केरळचे नागरिक मोठय़ा प्रमाणात असल्याने बोईंग 777च्या मदतीने जिबोटी-कोचीन-कोचीन-मुंबई अशी नवी उड्डाणो करण्यात आली. या मोठय़ा विमानातून एकाचवेळी 34क् लोक प्रवास करू शकतात. अनेक नागरिकांना भारतीय वायूदलाच्या सी-17 ग्लोब मास्टर या विमानातून मुंबईला पोहोचविण्यात आले.
एअर इंडियाबद्दल बहुतांशवेळा भारतीयांच्या मनामध्ये नकारात्मक भावना असते किंवा अढी असते. मात्र या मोहिमेमध्ये एअर इंडियाने जगाला आश्चर्याने तोंडात बोट घालावे लागेल अशी कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी आखाती प्रदेशात आलेल्या वाळूच्या वादळाचा सामना या विमानांना करावा लागला. सर्व परिसरात एक वाळूचा पडदाच तयार झाला होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. तशाही स्थितीत वैमानिकांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून सर्वाना सुखरूप सोडविले.
(लेखक एअर इंडियाचे ओमान येथील कंट्री मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ऑपरेशन राहतमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.)