शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

वाहन चालविण्याच्या पद्धतीवरून कळते मानसिकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 8:05 PM

प्रासंगिक : कुणी आपणास असे म्हटले की, आपली वैचारिक पातळी उद्ध्वस्त आहे, आपणास वाहतुकीचे कायदे मोडण्याची सवय आहे, आपण संवेदनाशून्य व क्रूर आहात; दूरदृष्टीरहित आहात, बेभरवशाचे आहात, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेबाबत अजिबात काळजी न करणारे आहात, भावनाशून्य आहात, तर तुम्ही क्षणात रागात याल व भांडायला सुरू कराल.

- प्रा. शरदचंद्र डुमणे 

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे चूक मूल्यमान होत आहे असे भासवाल; पण मित्रांनो, वरीलपैकी एकही विशेषण आपणास लागू होते का, हे जाणून घेण्यासाठी तुमची वाहन चालवण्याची पद्धत कशी आहे, हे विचारात घ्यावे लागेल व मगच काहीतरी सिद्ध करता येईल.वास्तविक पाहता तुमचे खरे व्यक्तिमत्त्व/चरित्र रोडवर तुमच्या वर्तणुकीवरून झळकू लागते हे एका मोठ्या विचारवंताचे वक्तव्य आहे. खालील परिच्छेदामध्ये जरी प्रत्येकी एकच पैलू मांडला गेला आहे, तरी तो सर्वंकष स्वभाव ओळखणारा ठरू शकेल.

१) नियम तोड्या : रात्रीच्या वेळी तुम्ही रेड सिग्नल चालू असलेल्या स्पॉटवर आला आहात. त्याकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे जात असाल तर त्याचा अर्थ असा असेल की तुम्ही स्वत:ला कायदा बाजूला सारण्याचा विचार करण्यात मुक्त आहोत, असे समजता.

२) अविश्वासपात्र : हेल्मेट वापरणे (टू व्हीलरसाठी) व सीटबेल्ट लावणे (कारसाठी) या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेता का? तसे असेल तर ते हे दर्शविते की तुम्ही स्वत:च्या जिवाची व अवयवाची काळजी न घेणाऱ्यांपैकी आहात. त्याचसोबत त्यांच्या परिणामाची समज असणारे ‘शहाणे’ पण आहात.

३) अविचारी : तुम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या अगदी जवळ आलात आणि रेड सिग्नल लागले. तरी न थांबता पुढील वाहन जात आहे म्हणून त्या मागोमाग बांधल्यागत जाता, असे असल्यास तुम्हाला दुसऱ्याची पर्वा नाही. ते थांबू शकतात. त्यांना वेळ आहे. तुम्ही थांबू शकत नाही. तुमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुम्ही थांबणार नाही, असा विचार कराल तर तो अविचार आहे.

४) बेभरवशाचे : तुम्ही रेड सिग्नलजवळ थांबलेले आहात. बाजूच्या रोडवर तुम्हाला आडवे जाणारे वाहनही थांबले आहे. म्हणून ग्रीन सिग्नल नसताना काही धोका नाही असे समजून पुढे जाता का? याचा अर्थ तुम्ही फालतू रिस्क घेण्यास मागेपुढे पाहत नाही असा होतो. 

५) स्वार्थी : एखद्या देवळात जाण्यासाठी अगदी थोडा वेळ तुम्हाला थांबायचे आहे. अशाप्रसंगी तुम्ही आपले वाहन योग्य ठिकाणीच लावता की लगेच निघायचे आहे असे समजून दुसऱ्यांना अडचण होईल अशा प्रकारे लावता? वरील पैकी दुसरा पर्याय निवडत असाल तर तुम्ही थोडाही विचार करीत नाही. तुम्ही स्वार्थी आहात. 

६) स्वकेंद्रित व अविवेकी : तुम्ही ट्रॅफिक सिग्नलजवळ आहात व बरीचशी वाहने तुमच्यापुढे उभी आहेत. रस्त्यावर दुभाजक नाही. अशावेळी तुम्ही तुमचे वाहन सांदीतून रेटून विरुद्ध दिशेच्या ओळीमध्ये घुसता का? अथवा शांतपणे पूर्वीच्याच लाईनमध्ये थांबता? जर विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसत असाल तर त्या ट्रॅफिकला अडथळा होईल हे तुमच्या ध्यानात येत नाही का? त्यांना पुढे जाणे शक्य होते; पण तुम्ही समोर आल्यामुळे ते पण जागेवरच थांबले याचा अर्थ तुम्ही स्वकेंद्रित  आहात आणि स्पष्टपणे अविवेकी आहात.  

७) मूर्ख : साईड रोडने मुख्य रस्त्यावर येताना थोडावेळ का होईना थांबून, निरीक्षण करून मग मेन रोडवर येऊन वाहतुकीत मिसळता का पूर्वीच्याच गतीने मेन रोडवर घुसता? जर न थांबता सरळ मेनरोडवर येत असाल तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे.  

८) नियोजनहीन : तुम्हाला पुढल्या क्रॉसिंगवर उजवीकडे वळायचे आहे. मग अगोदरपासूनच उजव्या बाजूच्या लेनकडे हळूहळू वळता की अनेक पुढे जाणाऱ्या गाड्यांना काटकोनात कट मारून शेवटच्या क्षणी वळता? दुसऱ्या प्रकारची आपणास सवय असेल तर तुमचे नियोजन निकृष्ट आहे.

९) अपरिपक्व : एखाद्या टी जंक्शनवर येऊन तुम्हाला उजवीकडे वळायचे आहे. अशावेळी एकदम उजवीकडे वळता की थोडा वेळ थांबून ट्रॅफिकचे निरीक्षण करून संथपणे वळता? वरील पैकी पहिला पर्याय निवडत असाल तर तुम्ही अपरिपक्व आहात. 

१०) अस्ताव्यस्तपणा : आपण ज्या लेनमध्ये आहोत त्यातच राहून पुढे पुढे सरकायचे हे तुम्हाला पटते की लेन तोडून जशी वाट मिळेल तसे नागमोडी चालीने सटकायचे आवडते? वरील पैकी दुसऱ्या बाबीची आपणास सवय असल्यास अस्ताव्यस्तपणा हा आपल्या स्वभावाचा पैलू आहे हे समजण्यास हरकत नाही.

११) असुरक्षित : एक दिशा मार्ग असताना आपण विरुद्ध बाजूने वाहन चालवत असाल तर तुम्ही कायदे मोडणाऱ्यांपैकी आहात हे स्पष्ट आहे.  

१२) ध्वनी प्रदूषणास कारणीभूत : वाहन चालवताना विनाकारण जोरात हॉर्न वाजवत गाडी नेता का? कंपनीचे ओरिजिनल हॉर्न बदलून (विशेष करून टू व्हीलरचे) मोठ्या कर्कश आवाजाचे हॉर्न गाडीला बसवून गाडी चालवता का? तसे असेल तर तो गुन्हा आहे हे लक्षात घ्या. स्वत:चे व इतरांचे कान कालांतराने डॅमेज कराल यात शंका नाही.

समारोप : तर मंडळी, पुढील वेळी जेव्हा तुम्ही वाहन चालवण्यास निघाल तेव्हा वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन वरीलपैकी एकही विशेषण आपल्याला लागू पडणार नाही याची काळजी घ्या. वरीलपैकी एकही विशेषण आपणास लागू होत नसेल तर म्हणावे लागेल की यू आर ए ग्रेट ड्रायवर अ‍ॅण्ड वंडरफुल पर्सन.

टॅग्स :Automobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद