शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मार्कर पेन ते अमिट शाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:37 IST

Indelible Ink: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर मतदानाची खूण म्हणून शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला. यानंतर काही मतदारांनी ही शाई विविध रसायने वापरून पुसून दाखवली. त्यामुळे मार्कर पेनच्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

-सुजित महामुलकरराज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर मतदानाची खूण म्हणून शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला. यानंतर काही मतदारांनी ही शाई विविध रसायने वापरून पुसून दाखवली. त्यामुळे मार्कर पेनच्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोठा गदारोळ झाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मार्कर पेनऐवजी बाटलीतील शाई वापरण्याचा निर्णय घेतला.

१. 'इंडेलिबल इंक' म्हणजे काय?बोगस मतदान रोखणे आणि एका व्यक्तीला एकाच वेळी मतदान करता यावे हे सुनिश्चित करण्यासाठी मतदान करताना मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाणारी, सहज न मिटणारी आणि १०-१५ दिवस कायम राहणारी शाई म्हणजे ‘इंडेलिबल इंक’ होय.

डाव्या हाताच्या तर्जनीवरच शाई का?

- उजव्या हाताचा जेवणासाठी जास्त वापर होतो.- शाईतील रसायनांचा आरोग्यावर परिणाम टाळण्यासाठी.- मार्कर पेन विरुद्ध बाटलीतील शाई- १.५ लाख मार्कर पेन महापालिका निवडणुकीत वापरले गेले.|- ६०-७०,००० शाईच्या बाटल्यांची ऑर्डर राज्य आयोगाने जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी दिली आहे.-३००-४०० बोटांवर ५ मि.लि.च्या एका बाटलीतून खूण केली जाऊ शकते.

खर्च कोण करतो? राज्य निवडणूक आयोग. राज्य शासनाकडून अनुदान मिळते.

२. कशी झाली निर्मिती?प्रथम वापर : भारतीय निवडणूक आयोगाने १९६२ च्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या शाईचा वापर सुरू केला.

संशोधन : ही शाई ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया’ने (एनपीएल) विकसित केली आहे.

३. कोण करते उत्पादन?कंपनीचे नाव : म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल).मालकी : ही कर्नाटक सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

४. शाई कशी काम करते?मुख्य घटक : सिल्व्हर नायट्रेट (१० ते १८ टक्के), जांभळा रंग.

काय होते? : त्वचेवरील प्रथिनांशी संपर्क आल्यावर ही शाई ‘सिल्व्हर क्लोराईड’ तयार करते, जे पाण्यात विरघळत नाही. ४० सेकंदांत शाई सुकते, पाण्याचा संपर्कात रंग काळसर होतो.टिकाऊपणा : एकदा लावल्यानंतर ही शाई किमान १५ दिवस ते काही आठवडे टिकते.प्रकाशाचा प्रभाव : सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शाईची खूण अधिक गडद होते.मिटते का? : कोणत्याही साबणाने, डिटर्जंटने किंवा केमिकलने ही शाई लगेच पुसता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Marker Pen to Indelible Ink: Election Commission's Ink Choice

Web Summary : Election Commission switches from marker pens to indelible ink for voting. Marker ink's easy removal raised concerns. Indelible ink contains silver nitrate, lasting weeks and preventing fraud.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग