महाराज आणि महाराष्ट्र भूषण
By Admin | Updated: May 16, 2015 14:46 IST2015-05-16T14:46:57+5:302015-05-16T14:46:57+5:30
माझा विरोध हा श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना नाही. ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकात लिहिलेल्या चुकीच्या नोंदींना माझा विरोध आहे आणि तो असेल. जितेंद्र आव्हाड

महाराज आणि महाराष्ट्र भूषण
असे म्हटले जाते की, इतिहास ही बदलत्या काळासोबत प्रवाही असणारी एक प्रक्रिया आहे.
याच दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा अभ्यास व्हायला हवा,
महाराजांच्या पर्वाचे संशोधन व्हायला हवे आणि सत्य इतिहास लोकांसमोर यायला हवा. - हीच इच्छा मनात ठेवून मी आपल्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील काही संदर्भाना आक्षेप घेतला आहे.
आपल्याला विरोध करण्यासाठी नाही तर मराठी मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुढील दोनशे वर्षानंतर संशोधन करणा:या पिढीसमोर चुकीचे संदर्भ जायला नकोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाचे विद्रूपीकरण व्हायला नको केवळ या आणि याच भावनेतून!!
ति,
मा. श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांस,
स.न.वि.वि.,
‘‘महाराष्ट्रभूषण’’ हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने आपल्याला इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून जाहीर केला असल्यामुळे मी माङो आक्षेप नोंदविले. वैयक्तिकरीत्या आपल्याला विरोध करणो हा त्यामागचा हेतू नव्हता. पण एक इतिहासप्रेमी, शिवप्रेमी म्हणून उद्याच्या पिढीर्पयत चुकीचा इतिहास जाऊ नये म्हणून आम्ही आक्षेप दर्शविले. त्यामध्ये कुठेही आमच्या मनात द्वेष नव्हता हे पत्रच्या सुरुवातीसच स्पष्ट करीत आहे.
जगभरातील इतिहासकारांनी व इतिहासावर भाष्य करणा:यांनी जे परिमाण आखून दिले आहेत, त्या भूतकाळातील गोष्टीचा अभ्यास करीत असताना त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याची इतिहासकाराने विशेष काळजी घ्यायला हवी. केवळ नोंदी आहेत म्हणून त्याने इतिहास म्हणून नोंद करणो चुकीचे ठरू शकते. त्या ऐतिहासिक नोंदीचा काळपरत्वे काही आधार मिळाला का? त्यावर काही संशोधन झाले का? अनेक इतिहासकारांच्या नोंदीत तरी ती गोष्ट सापडली आहे का? सापडली असल्यास ते सत्य मानून त्याची नोंद करण्यास हरकत नाही. पण, एखाद्या भूतकाळातील घटनेचा उल्लेख फक्त एखाद्या पुस्तकात आढळल्यानंतर त्या घटनेबाबत कुठल्याही तत्त्ववेत्याने, इतिहासकाराने त्या गोष्टीवर भाष्य केले नसल्यास त्याचा अर्थ असा होतो की, समकालीन साधनातून किंवा व्यक्तिचरित्रतून किंवा नोंदीतून सदरच्या घटनेविषयी कुठलेही पुरावे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे भविष्यातील इतिहासकाराने अशा घटनेची नोंद करणो टाळले पाहिजे.
संशोधन करीत असताना आपली अभ्यासूवृत्ती जागरूक ठेवून संशोधन करणो आणि आपल्या आवडीनुसार संशोधन करणो याला नक्कीच परिमाण आहे, नाहीतर मानवी स्वभावानुसार माणूस त्याला आवडेल तेच निवडेल. त्यातून इतिहासकार निर्माण होत नाही. असे म्हटले जाते की, इतिहास ही बदलत्या काळासोबत प्रवाही असणारी एक प्रक्रिया आहे.
याच दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा अभ्यास व्हायला हवा, महाराजांच्या पर्वाचे संशोधन व्हायला हवे व सत्य इतिहास लोकांसमोर यायला हवा. हीच इच्छा मनात ठेवून मी आपल्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील काही संदर्भाना आक्षेप घेतला आहे. आपल्याला विरोध करण्यासाठी नाही तर मराठी मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुढील दोनशे वर्षानंतर संशोधन करणा:या पिढीसमोर चुकीचे संदर्भ जायला नको, मिळायला नकोत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाचे विद्रूपीकरण व्हायला नको केवळ या आणि याच भावनेतून.
आपल्या वयोमानाप्रमाणो आपल्याला विरोध करणो योग्य नाही. आपल्या पुस्तकातील चुकांना असलेला आमचा विरोध आपल्यार्पयत पोहचविण्यासाठी हा पत्रप्रपंच.
आपल्या वतीने आपल्या अत्यंत जवळचे असलेले इतिहासकार श्री. बलकवडे यांनी काही बाबतीत खुलासा केला. मी एक शिवप्रेमी म्हणून आपल्या वतीने श्री. बलकवडे यांनी केलेल्या खुलाशाला उत्तर व आक्षेप या पत्रच्या माध्यमातून आपल्यार्पयत पाठवित आहे.
‘कुंतीविषयी चित्रगुप्ताचे नोंदीत पान क्र. 23 वर लिहून ठेवले आहे’, असे श्री. बलकवडे यांनी आपल्या वतीने सांगितले. आईसाहेबांच्या तोंडी वाक्ये लिहून कुंतीच्या पंक्तीला आपण आईसाहेबांना बसवू पाहता तेही चित्रगुप्ताने लिहिलेल्या भाकडकथांच्या आधारावर.
त्याच पानावर महाराज आईसाहेबांना अफजल खानाच्या वधाच्या आधी प्रतापगडावर भेटले अशी नोंद आहे. आपल्यासारख्याकडून आमची माफक अपेक्षा एवढीच आहे की, अनेक पुरावे, नोंदी, साधने व बखरी तसेच अनेक इतिहासकारांनी ज्यावर भाष्य केले आहे की अफजल खानाच्या वधाच्या वेळी आईसाहेब राजगडावर होत्या.
अफझलवधाची माहिती देणारी प्रथम दर्जाची साधने- 1) शिवभारत 2) जेधेशकावली 3) जेधेकरीणा 4) समकालीन अस्सल पत्रव्यवहार अशा कोणत्याही साधनात कुंतीचा उल्लेख नाही, पण आपण भाकडकथांनी भरलेल्या चित्रगुप्तबखरीचा आधार घेतला.
कृष्णाजी अनंत सभासदांनी 1696मध्ये लिहिलेली बखर ही शिवकालीन इतिहासाची नोंद घेणारी पहिली बखर आहे. सभासदांनी लिहिलेल्या या बखरीची संपादित आवृत्ती म्हणजे चित्रगुप्ताने लिहिलेली बखर आहे. कुठलीही नोंद ही अनेक ठिकाणी तपासून त्यामागील सत्यता पडताळून सत्यतेच्या परिमाणावर उतरत असेल तरच घ्यावी, असे सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. सभासदांच्या बखरीमध्येदेखील प्रतापगडावर अफजल खानाच्या वधाच्या आधी आईसाहेब आणि शिवाजी महाराज यांची भेट झाल्याची नोंद आढळत नाही. एवढेच नव्हे तर त्या भेटीत आईसाहेब शिवाजी महाराजांना उद्देशून ‘‘मला कुंती व्हायचे आहे’’ असे म्हणाल्याचादेखील कुठेच उल्लेख नाही. इथेदेखील कुंती विषयाचा उल्लेख कुठल्याही परिमाणात बसत नाही त्यामुळे आपण केलेला हा उल्लेख चुकीचा असल्याचे केवळ माङोच नव्हे तर इतर अनेकांचे मत आहे.
तसेच चित्रगुप्ताने अफजल खानाच्या वधाच्यावेळी शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी पंत नावाचा वकील असल्याचे लिहिले आहे. दत्ताजी पंत हे नाव चित्रगुप्ताने कुठून आणले याचा आपण तपास करायला हवा होता. चित्रगुप्ताने सांगितलेले व्यक्तिचरित्रतील नाव व इतिहासकारांनी संशोधनानंतर दिलेले नाव यात साम्य नाही. त्यातच फक्त कुंती हे उदाहरण देण्याचे कारण ते काय? तसेच चित्रगुप्ताने लिहिलेली आईसाहेबांच्या मनातील कुंतीसंबंधीची भावना आणि आपल्या पुस्तकातील उद्देश यामध्ये खूप मोठे अंतर आहे. आपल्या नोंदीवरून असे वाटते की, कुंतीला पाच वेगवेगळ्या पुरुषांकडून झालेले पुत्र हे राजमान्यतेच्या आड आले नाहीत असे विचार जिजाऊंच्या मनात होते. ही बाब समकालीन इतिहासाच्या नोंदीचा अभ्यास करीत असताना जिजाऊंची बदनामी करणारी नाही का? नीटस, गो:या व देखण्या दिसणा:या कुणबी समाजाच्या बायका पंचवीस होनाला पाच मिळत होत्या, असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहित असताना आपण का करावा? आपण स्वत: कबुली दिली आहे की, शिवजन्मापूर्वीच्या नोंदीतून व पत्रव्यवहारातून हा संदर्भ आपल्याला मिळाला आहे. मग शिवचरित्रमध्ये त्याचा उल्लेख करण्याचे कारण काय होते? कुणबिणी म्हणजे त्या काळातील कुणबी समाजातील स्त्रिया होत. हा समाज शूद्र म्हणून संबोधला जात असे. याबाबतचे आपले भाष्य हे जातिव्यवस्थेला धरून वाटते.
आपण आपल्या पुस्तकात अनेकवेळा मराठय़ांबद्दल लिहिले आहे. तसेच वैश्य समाजाबद्दलदेखील लिहिले आहे. त्यामुळे आपल्या पुस्तकातील सर्व विषयांवर अभ्यास केला असता आपण आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख हे जातीय व्यवस्थेला धरून केले आहेत असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. मराठा (क्षत्रिय), वैश्य, कुणबी म्हणजे शूद्र या तीन समाजाबद्दल आपण आपल्या पुस्तकात शेलक्या शब्दात लिहिले आहे. हे समकालीन वर्णव्यवस्थेला (चातुवर्ण) धरून नाही का?
महाराजांची उंची ही माङयासारख्या मागासवर्गीयांसाठी खूप मोठी आहे व ती मी मानतो, कारण हा पहिला असा राजा होता की ज्याने जातिव्यवस्थेला शह देत ख:या अर्थाने शूद्रांना सन्मानाने जगण्यासाठी व्यवस्था केली. आपल्या प्रशासनात स्थान दिले आणि हुकूमाने आपल्या राज्यातील गुलामगिरी आणि मानव विकण्याचे प्रकार बंद केले. वाघमारे, देवकातेंसारख्या त्याकाळी शूद्र म्हणून संबोधल्या जाणा:या समाजात जन्मलेल्या कर्तृत्ववान पुरुषांना जहागिरी देऊन प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी दिली. याचा उल्लेख आपल्या पुस्तकात आला असता तर बरे झाले असते. या दोन आक्षेपांबद्दल आपण खुलासा केलेला असतानाही आमचे काही आक्षेप आहेत व त्याचा खुलासा आपण जरूर करावा..
मराठे मोठेपणासाठी आपली स्वत:ची आईदेखील विकायला कमी करीत नसत असे पान क्र. 78, 79 वर वाचायला मिळते. असा कुठला दाखला, पुरावा, नोंदी आपल्याला मिळाल्या आहेत का?
आपल्या पुस्तकातील पान क्र. 31, 32, 42, 44, 45, 47, 5क्, 52, 67वरील उतारे वाचल्यानंतर मराठे हे टाकावू होते हे दाखविण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याचा कुठला पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे का? किंवा हे इथे लिहिण्याची खरेच काही आवश्यकता होती का?
स्त्रियांविषयी लिहीत असताना आपण त्यांचा उल्लेख कुठेही सन्मानाने केल्याचे दिसून येत नाही. (पान क्र. 72, 76, 91 व 137)
पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे की, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. तरीही आपल्या शेवटच्या आवृत्तीमध्ये हा बदल झाल्याचे दिसून येत नाही. मग एक चिकित्सक या नजरेतून आपण तो बदल करायला हवा होता की नव्हता? त्यामुळे आपण लिहिलेल्या पुस्तकाला कादंबरी म्हणावी की इतिहासतज्ज्ञाने केलेला अभ्यासपूर्ण आविष्कार म्हणावा?
पान क्र. 8क्वर जिजामाता कारभा:यांच्या सहवासात राहत होत्या, असे लिहिले आहे. हे कितपत योग्य आहे?
शहाजी राजे यांच्यापेक्षा पंतांची म्हणजे दादोजी कोंडदेव यांची शिवाजी महाराजांवर जास्त माया होती याला काही पुरावा आपण देऊ शकाल का?
दादोजी कोंडदेव शिवाजी महाराज यांचे रक्ताचे नाते नसताना त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे गोत्र एक होते असे आपण कसे काय म्हणू शकता?
ही मूर्ती मीच घडवली, मीच हिचा निर्माता आहे असे म्हणणो दादोजी कोंडदेव यांच्या तोंडात घालून आपण इतिहासाचे विद्रूपीकरण केले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल काय?
पंतांची व आईसाहेबांची लगीनघाई उडून गेली (पान क्र. 132). हे आपण कुठल्या अर्थाने लिहिले आहे? तसेच पान क्र. 132वर शहाजी राजे हे लग्नाला येऊ शकले नाहीत असे आपण लिहिले आहे. वास्तविक पाहता अनेक इतिहासकारांनी हे लग्न विजापुरात इ.स. 1637 मध्ये झाल्याचे लिहिले आहे. असे असताना आपल्या नोंदीची आपण दुरुस्ती का केली नाही?
औरंगजेबाच्या दृष्टीने महाराजांचा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे ‘ते काफीर होते’ असे तो म्हणतो. समकालीन इतिहासाचा विचार करता औरंगजेबाने आदिलशहावरदेखील हल्ला केला. गोवळकोंडय़ावरदेखील हल्ला केला मग तो कोण होता? स्वत:च्या बापाला व भावाला मारणारा औरंगजेब हा त्यांनाही काफीर समजत होता का? शिवाजी महाराजांना युद्धामध्ये ज्याच्याशी तह करावा लागला तो औरंगजेबाचा सरदार मिङरराजे जयसिंह कोण होता? यावरून हे स्पष्ट होत नाही का, की समकालीन इतिहासातील लढाया जाती-धर्माच्या नव्हत्या तर साम्राज्य सुरक्षितता व विस्ताराच्या होत्या?
बादशहाच्या पदरी असणारे मराठा सरदार शिवाजी महाराजांचा मत्सर करीत असत. (पृ. 329 ओळ क्र. खालून 4, 5) ‘‘बादशाहाच्या पदरी पिढीजात सरदारक्या करणारे मराठे लोक महाराजांचा मत्सरच करीत. हा कोण शिवाजी? याचे आजेपणजे तर नांगरगठ्ठे कुणबी होते.’’ आपल्या पुस्तकातील ही नोंद समकालीन इतिहास नजरेआड करून लिहिल्याचे हे सुस्पष्ट, स्वच्छ व सत्य उदाहरण आहे. महाराजांना अनेक लढाया स्वकीयांच्या विरुद्ध लढाव्या लागल्या. पण, हेदेखील तितकेच सत्य आहे की महाराजांच्या सैन्यात अनेक जाती-धर्माचे लोक होते. त्यात मराठेदेखील होते, कुणबीदेखील होते. आणि त्यामुळेच ख:या अर्थाने ‘‘रयतेचा राजा’’ म्हणून त्यांची ओळख झाली असे माङो मत आहे. त्यामुळे सर्वच मराठे त्यांचा मत्सर करीत होते हे म्हणणो साफ चुकीचे नाही का?
1 2 3 4 5.. असे अनेक आक्षेप घेण्यासारखे उल्लेख आपल्या पुस्तकात आढळतात. आपल्या पुस्तकातील काही उल्लेख चित्रगुप्ताच्या बखरीमधील उल्लेखावरून दिले आहेत असे आपण सांगता. जर हाच विचार केला तर अजून 1क्क् ते 2क्क् वर्षानंतर आपण केलेल्या चुकीच्या नोंदीचा वापर करून संशोधक संशोधन करतील व विद्रूपित इतिहास भावी पिढीसमोर जाईल. तसे होऊ नये म्हणूनच आम्ही आक्षेप घेतला आहे. परत एकदा मी स्पष्ट करतो की, माझा विरोध हा श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना म्हणजेच आपणास नाही. ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकात लिहिलेल्या चुकीच्या नोंदींना, केलेल्या चुकांना माझा विरोध आहे व तो असेल. कारण तुमच्याएवढे माङोही महाराजांवर प्रेम आहे. तेव्हा हे आक्षेप आपल्याला योग्य वाटत असल्यास त्याबाबत जरूर विचार करावा व शक्य झाल्यास आपल्या पुढील आवृत्तीमध्ये आपण घेतलेले चुकीचे संदर्भ वगळल्यास आपण ज्या महाराजांवर मनापासून प्रेम करता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ख:या इतिहासाला न्याय दिल्यासारखे होईल एवढीच एक सर्वसामान्य शिवप्रेमी म्हणून प्रामाणिक इच्छा.. महाराष्ट्र शासनाने आपल्याला ‘महाराष्ट्रभूषण’ जरूर द्यावे, पण ते इतिहासकार म्हणून देऊ नये असे माङो स्पष्ट मत आहे. कारण इतिहासकार म्हणून दिल्यास आपण लिहिलेल्या शिवचरित्रला अधिकृत मान्यता मिळेल व चुकांनाही राजमान्यता मिळेल. आणि आपण लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हाच सत्य इतिहास आहे अशी नोंददेखील होईल. त्याचमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेल्या शंका-कुशंकांचे निरसन जोर्पयत होत नाही तोर्पयत ‘मी महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारणार नाही’, असा शिवबाणा आपण दाखवावा हीच आपणास विनंती.
कळावे,
शिवप्रेमी जितेंद्र आव्हाड