शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

LMOTY 2020: जे दिल्लीत शक्य आहे, ते इतरत्र का नाही? अरविंद केजरीवालांनी सांगितला शिक्षण, आरोग्याचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:00 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे हे सातवे पर्व. दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा सोहोळा  यावेळी कोरोनाच्या निर्बंधांमुळे विजेते आणि मान्यवर यांच्यापुरताच मर्यादित करण्यात आला. नुकत्याच संपन्न झालॆल्या या  सोहोळ्यातील ऊत्कंठावर्धक संवाद, मनोगते आंणि  मुलाखतींचे चित्रीकरण करण्यात आले असून  महाराष्ट्रातल्या अत्यंत सन्मानाच्या आणि  प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहोळ्याची ही 'व्हर्चुअल  मैफल'  लोकमतच्या यू ट्यूब वाहिनीवर अनुभवता येईल. त्यासाठीचे क्यू आर कोड येथे प्रत्येक मुलाखतीसोबत दिले आहेत.  या सोहोळ्यातील  मुलाखती  आंणि संवाद सत्रांची ही एक संपादित झलक!

केजरीवालजी, मी तुम्हाला महाराष्ट्रीयनच मानतो. कारण तुमचं  ट्रेनिंग आमच्या नागपुरात, महाराष्ट्रातच झालं होतं. मध्यंतरी टीकेला सामोरे गेलात; पण मग अचानक लोकांच्या मनातले ‘गुड बॉय’ कसे झालात?- मी नेहमीच ‘गुड बॉय’ होतो. माध्यमांना मात्र ‘बॅड बॉय’ वाटत होतो. पण आता माध्यमांचीही नजर बदलली आहे आणि ते मला ‘गुड बॉय’ मानू लागले आहेत.

प्रशासनाशी, भारत सरकारशी पूर्वी तुम्ही संघर्ष करायचात. आता तसं फारसं दिसत नाही. हा बदल कशामुळे झाला? तुम्ही आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे का?- जनतेचा फायदा, जनतेचा विकास हेच कायम माझ्यापुढचं ध्येय राहिलं आहे. आमच्या घराण्यात कोणीच राजकारणात नव्हतं. तो वारसा मला नाही. आपण कधी राजकारणात पडू असंही मला कधी वाटलं नव्हतं. अण्णा हजारे यांचं आंदोलन झालं. त्यात आम्ही सामील होतो. जनतेचं खूप प्रेम मिळालं आणि पहिल्याच प्रयत्नात मी दिल्लीचा मुख्यमंत्री झालो. जनतेचं भलं व्हावं हाच विचार कायम मनात होता. त्यासाठी बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो.  सगळ्यांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागते. कोरोनाचीच बाब घ्या. कोरोना ही महामारी  आपण एकट्यानं थोपवू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांची मदत घेतली. केंद्र सरकारकडेही गेलो. केंद्राच्या सगळ्या विभागात गेलो. मी केंद्र सरकारचे आभार मानू इच्छितो की केंद्रानं याबाबत आम्हाला मदत केली. सामाजिक संस्था, श्रमिक संस्था, खासगी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स.. सगळ्यांकडे आम्ही गेलो आणि प्रत्येकाची मदत घेतली. परमेश्वराच्या कृपेने दिल्लीत आज काेरोना बऱ्यापैकी आवाक्यात आहे. पण जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ येते, तेव्हा आम्ही संघर्षही करतो.

कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुम्ही भेटलात. त्यावेळी तुमची भावना काय होती?- जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा प्रत्यक्ष नाही, पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधानांची भेट झाली होतीच.. दोन-तीनदा फोनवरही बोललो. त्यांना निवेदन, विनंती केली. अमित शहा, डॉ. हर्षवर्धनजी यांनाही भेटलो. जिथे जिथे शक्य होतं, तिथे त्यांनी आम्हाला मदतच केली.

दिल्लीत तुम्ही काही आदर्श कामं केलीत, जी इतर कुठेही झालेली नाहीत. त्यामुळे दिल्लीतले लोक तुमच्यावर खुश आहेत..- तीन-चार क्षेत्रांत आम्ही जे काम केलं त्याची चर्चा संपूर्ण देशभरात आहे. एक म्हणजे शिक्षण. दिल्लीत आमचं सरकार जेव्हा आलं, तेव्हा सरकारी शाळांची स्थिती अतिशय खराब होती. आपल्या देशात दुहेरी शिक्षण पद्धती निर्माण झाली आहे. गरिबाचा मुलगा सरकारी शाळेत जातो, अखेरपर्यंत गरीबच राहतो. श्रीमंतांची मुलं खासगी शाळेत शिकतात, मोठे झाल्यावर श्रीमंत होतात. ही परिस्थिती आम्ही बदलली. सरकारी शाळा आता खासगी शाळांना इन्फ्रास्ट्रक्चरपासून तर शिक्षणापर्यंत सर्वच बाबतीत आता टक्कर देत आहेत. हे आम्हाला शक्य झालं, याचं कारण आमचं सरकार सत्तेवर येताच शिक्षणावरचं बजेट आम्ही पाच हजार कोटींवरून दहा हजार कोटी; दुप्पट केलं. दरवर्षी शिक्षणावरचं आमचं बजेट २५ टक्के आहे. 

याशिवाय आरोग्यावरचं आमचं बजेट १५ टक्के आहे. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावर आम्ही दरवर्षी ४० टक्के खर्च करतो. इतका पैसा या दोन्ही क्षेत्रांत आल्यानंतर युद्धपातळीवर या दोन्ही क्षेत्रांचा आम्ही कायापालट केला.  शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना आम्ही प्रशिक्षणासाठी परदेशांत पाठवलं. पाच वर्षांत मी स्वत: परदेशात गेलेलो नाही, पण आमचे शिक्षक विदेशवारी करून आले आहेत. भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद आणि लखनौ यांच्याशी आम्ही टायअप केलं आहे. आमचे बहुतेक शिक्षक तिथे ट्रेनिंग घेऊन आले आहेत.  गेल्यावर्षी सरकारी शाळांतील मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८ टक्के, तर खासगी शाळांची ९६ टक्के होती. आता तर अशी परिस्थिती आहे, अनेक उच्चभ्रू पालकही आपल्या मुलांना खासगी शाळांतून काढून सरकारी शाळांत दाखल करत आहेत. दिल्लीत सरकारी दवाखान्यांची स्थिती खूप खराब होती. डॉक्टर्स नाहीत, औषधं नाहीत, उपचार नाहीत.. आता सरकारी दवाखानेही खासगी दवाखान्यांच्या तोडीस तोड आहेत. शिवाय उपचारांपासून ते औषधांपर्यंत सारं काही इथे मोफत आहे. ऑपरेशनला खासगी हॉस्पिटलमध्ये १५ लाख रुपये लागणार असतील, तर तेही इथे मोफत होईल. गरीब, श्रीमंत सर्वांना मोफत उपचार! तिसरी गोष्ट म्हणजे वीज. २०१४ मध्ये आमचं सरकार आलं त्यावेळी ऐन उन्हाळ्यात सात सात- आठ आठ तास वीज नसायची. आज दिल्लीत चोवीस तास वीज आहे. आणि सगळ्यांत मोठा चमत्कार म्हणजे वीज मोफत आहे. दिल्लीतल्या ७३ टक्के लोकांना विजेचं शून्य रुपये बिल येतं!

दिल्ली तर तुम्ही काबीज केलीच आहे, सुरत महापालिका निवडणुकीतही नुकतीच उत्तम कामगिरी केली. आगामी काळात  गुजरात, गोवा येथेही तुम्ही जाणार म्हणता, तुमचे मनसुबे काय आहेत?- दिल्लीतल्या कामाची चर्चा अख्ख्या देशभरात पसरते . दिल्लीत चोवीस तास वीज आणि तीही मोफत, प्रत्येक कुटुंबाला वीस हजार लिटर याप्रमाणे जवळपास १३ लाख कुटुंबांना मोफत पाणी या सुविधांची चर्चा आहेच! इतर सरकारंही हे करू शकतात अशी जनभावना होते आहे.  दिल्लीतल्या सरकारी शाळा आम्ही पाच वर्षांत व्यवस्थित केल्या, त्या सत्तर वर्षांत होऊ शकत नव्हत्या का? इतर सरकारांनी हे केलं तर आमची गरजच पडणार नाही. लोक आता विचारायला लागले आहेत, या गोष्टी जर दिल्लीत होऊ शकतात, तर आमच्या इथे का नाही? सर्वसामान्य माणसांना लागतं तरी काय? वीज, पाणी, मुलांना चांगलं शिक्षण, आरोग्याच्या सुविधा.. तेच आम्ही प्राधान्यानं देण्याचा प्रयत्न करतो. 

आधी लोकमतला ‘दिसतं’, त्यानंतरच जगाला ‘कळतं’!लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार आतापर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांना मिळाला आहे. सर्वसामान्य माणसं जे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात अशा माणसांना चारही दिशांतून शोधून काढून जगापुढे आणलं जातं याबद्दल लोकमतचं मला विशेष कौतुक वाटतं. मोठमोठे मान्यवर हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य नाही. लहान लहान माणसं रोजच्या जीवनात जे विशेष काम करतात, ते महत्त्वाचं आहे. अशा लोकांना शोधून लाेकमत त्यांचा सन्मान करतं, त्यांना जगापुढे आणतं. अज्ञात असलेल्या, पण अतिशय महत्त्वाचं काम करणाऱ्या लोकांना जेव्हा जगापुढे आणलं जातं, तेव्हा संपूर्ण समाजातच एक विधायक ऊर्जा निर्माण होते. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत एकप्रकारे समाजाच्या भरण-पोषणाचं काम करत आहे. (मुलाखत : विजय दर्डा, चेअरमन एडिटोरियल बोर्ड, लोकमत वृत्तसमूह) 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल