शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुडत्याला काडीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:38 IST

निसर्गाच्या कुशीत : मराठवाड्यातील सध्याच्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे वन्य पशू-पक्षी थेंबभर पाण्यासाठी, चिमूटभर घासाच्या शोधार्थ रानोवनी भटकंती करीत आहेत. 

- सिद्धार्थ सोनवणे 

अन्न-पाण्याच्या शोधात असलेले एक दुर्मिळ जावडी मांजर नुकतेच पाडळी येथील प्रगतिशील शेतकरी काळू सरवदे यांच्या शेतातील पाण्याचा हौदात पडले होते. त्याचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले असले तरी खऱ्या अर्थाने त्याचे प्राण वाचले ते त्या हौदात असलेल्या वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्यामुळे! ‘बुडत्याला काडीचा आधार’ ही म्हण येथे प्रत्यक्षात प्रत्ययास आली होती.

दुष्काळामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने तहानलेल्या वन्य पशू-पक्ष्यांची तृष्णा भागविण्यासाठी पाडळी येथील शेतकरी काळू सरवदे यांनी त्यांच्या शेतातील हौदात पाणी भरून ठेवले. या पाण्यावर परिसरातील वन्यजीव आपली तहान भागवत. काही दिवसांनी जेव्हा सरवदे पुन्हा हौद भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांना हौदात एक अनोळखी प्राणी पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ मला या घटनेची माहिती दिली. मी अवघ्या पाच मिनिटांत तेथे पोहोचलो. पाहतो तर हौदात दुर्मिळ जावडी मांजर पाण्यावर तरंगत असलेल्या वाळलेल्या लाकडी ओंडक्यावर आधार घेऊन बसलेले.

ते बऱ्याच दिवसांपासून हौदात अडकलेले असावे. त्याचे भुकेने पोट पार आत गेलेले. शरीर थरथरत होते. हालचाल मंदावलेली. अशा अवस्थेतही जेव्हा विठ्ठल सरवदे यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पकडले तेव्हा या जावडी मांजराने त्यांच्या अंगावर गुदद्वाराच्या जवळ असलेल्या ग्रंथीतून घाणेरडा उग्र दुर्गंधीयुक्त पिवळसर स्राव अंगावर सोडला, तसे ते जावडी मांजर माझ्या हवाली केले. मी त्याला पोत्यात घातले आणि हौदातील पाणी शेवटपर्यंत प्राण्यांना पिता यावे, त्यांना हौदातून बाहेर येता यावे यासाठी मोठे लाकूड, मोठा दगड हौदात ठेवण्याचे सांगून त्यांचा निरोप घेतला.

सर्पराज्ञीत आणल्यानंतर मी व सृष्टीने त्याला कपड्याने पुसून पूर्ण कोरडे करून घेतले. तरीही त्याचे शरीर थरथर करीतच होते. तोल जात होता. त्यामुळे त्याला कोवळ्या उन्हात ठेवले. अर्ध्या तासाने ग्लुकोजचे पाणी पाजले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून खाण्यासाठी केळी टाकली. उदमांजरे मांसाहारी आणि शाकाहारीही असतात. तीन     तासांनंतर त्याच्या शरीराची थरथर थांबली. त्यानंतर त्याने केळी खाली.दुसऱ्या दिवशी ते पिंजऱ्यात फिरू लागले. ते बरे झाले होते; परंतु त्याला थोडी विश्रांती आणि शरीरात थोडी ताकद येण्यासाठी आम्ही त्याला एक आठवडा ठेवून पुन्हा त्याला निसर्गात सोडून दिले.  

(लेखक : सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, ता. शिरूर कासार, जि. बीडचे संचालक आहेत.)

टॅग्स :Natureनिसर्गWaterपाणीBeedबीड