शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

आई, कोविड आणि स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 06:05 IST

आईला हॉटेलमध्ये विलग करण्याचा  निर्णय झाला,पण डॉक्टर म्हणाले, अहो, हे शक्य नाही! त्या स्मार्टफोन वापरू शकतात का?

ठळक मुद्देजखमेला हळद नि नाकाला कांदा लावण्यापलीकडे प्रथमोपचारअसतो आणि मोबाईल फोन, बोलून निरोप देण्याघेण्यापलीकडे व्यापक आवाक्याचा असतो याचं शिक्षण नव्या साधनांकडे तुच्छतेनं बघणार्‍यांना द्यावं लागणार, नाहीतर काही खरं नाही.

- सोनाली नवांगुळ

चैनीचं नि नंतर कामासाठी अनिवार्य ठरलेलं एखादं गॅजेट कोविडकाळात ‘लाईफस्किल्स’ या सदरात मोडेल हे कुठं ठाऊक होतं! पण तसं झालं खरं.मला ठाऊक होतंच की कधीतरी आईबाबा कोरोना पॉझिटिव्ह असण्याची बातमी येणार! तशी वेळ आलीच. तब्येत जास्तच कुरकुरू लागली तेव्हा 32 शिराळ्यातून त्या दोघांना संपूर्ण काळजी घेऊन खासगी गाडीनं कोल्हापूरला थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचा असं कळवलं. योगायोगानं एक बेड रिकामा झाला नि बाबांवर तातडीनं उपचार सुरू झाले. ऑक्सिजन लावला गेला. हॉस्पिटलच्या कोविड विभागातले सहकारी माझ्याशी वेळोवेळी फोनवरून बोलत होते. त्याप्रमाणे ठरलं की आईची लक्षणं त्रासदायक नसल्यामुळं ती एखाद्या हॉटेलमध्ये विलग राहिल. ऑक्सिमीटर, तापमापक, आवश्यक औषधं ते देतील नि तिच्या संपर्कात राहातील. सकाळी उठल्यापासून आलेला ताण व्यवस्था लागल्यामुळं जरा सैल झाला नि इतक्यात संध्याकाळी डॉक्टरांचा फोन आला, ‘अहो, साठीच्यावर असणार्‍यांना एकटं ठेवण्याचा तसाही धोका असतो आणि तुमच्या आईंच्याबाबतीत तर जास्तच. तुम्हाला नवी व्यवस्था पाहावी लागणार!’ मी चक्रावलेच की आता काय झालं? व्यवस्थापनाला भेडसावणाऱ्या अडचणीत तथ्य होतं. माझी आई जरी सुशिक्षित, पांढरपेशा असली तरी तिनं स्मार्ट मोबाईल नि टॅब्ज वगैरेसारखं तिच्या मते असणारं ‘खूळ’ आत्मसात केलं नव्हतं. आलेला फोन घेणं या पलीकडं तिनं मोबाईलचा वापर केला नव्हता. हॉस्पिटलच्या मते विलगीकरणाची व्यवस्थाच मुळात इंटरनेच्या आधारे होणार्‍या व्हिडीओ कॉल्सवर आधारलेली आहे. व्हिडिओकॉल्सद्वारे पेशंटशी बोलता येणं, त्याचे हावभाव, डोळे, उच्चार यातून संबंधित डॉक्टर्सना प्रकृतीच्या गांभीर्याचा कल समजणं, पेशंटचा एकटेपणा व भीती व्हच्यरुअल दिसण्यातून कमी होणं, त्याला धीर देऊन मानसिक स्वास्थ्यासाठी प्रय} करणं या सगळ्यासाठी स्मार्ट फोन नीट वापरता येणं ही गोष्ट अत्यावश्यक होती. व्हिडीओ कॉल नि व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आपल्या ऑक्सिजनचा स्तर, ताप व अन्य लक्षणं संबंधित डॉक्टर्सना पाठवणं ही त्यातलीच एक गोष्ट. ताप बघणं, ऑक्सिजन तपासणं याचाही आईला अनुभव नाही, ना शिकून घेण्याची इच्छा त्यामुळं तेही व्हॉट्सअँपच्या माध्यमातून कळवणं यावर काटच! म्हणून हॉटेल विलगीकरणाचा मुद्दाच निकालात निघाला नि शहरातील महापालिकेच्या प्रत्यक्ष डॉक्टर्स उपस्थित असणार्‍या व्यवस्था शोधून तिथं तिची सोय लावणं भाग पडलं.असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहानं तंत्रज्ञानाच्या नव्या गोष्टी शिकून घेतल्या, पण असंख्य अजूनही सुरूवातीपासून सुरूवात करण्याच्या रेषेअलीकडे आहेत. जखमेला हळद नि नाकाला कांदा लावण्यापलीकडे प्रथमोपचारअसतो आणि मोबाईल फोन, बोलून निरोप देण्याघेण्यापलीकडे व्यापक आवाक्याचा असतो याचं शिक्षण नव्या साधनांकडे तुच्छतेनं बघणार्‍यांना द्यावं लागणार, नाहीतर काही खरं नाही. हे जगण्याच्या प्रवासातलं अत्यावश्यक कौशल्यच मानून शिकून घ्यावं लागेल.बाकी एक बेष्ट झालं, आई म्हणाली, ‘इथनं बाहेर आल्यावर मला सगळं शिकवून टाका लगेच’ - म्हटलं, कोविड पावला!!sonali.navangul@gmail.com(लेखक आणि अनुवादक )