नुसतीच भुई का धोपटायची?

By Admin | Updated: January 16, 2016 13:42 IST2016-01-16T13:42:45+5:302016-01-16T13:42:45+5:30

‘शनिच्या चौथ:यावरून दर्शन’ या मुद्दय़ाकडे धार्मिक बाबीपेक्षा सुरक्षा म्हणून बघितले पाहिजे. शनिशिंगणापूरला स्त्री-पुरुष असा भेद नाहीच. दर्शनाचे नियम सर्वाना सारखेच आहेत. खरं तर सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाता आलं पाहिजे. तसा कायदा व्हावा. भांडायचंच असेल, तर त्यासाठी भांडायला हवं.

Just begging? | नुसतीच भुई का धोपटायची?

नुसतीच भुई का धोपटायची?

- अनिता शेटे
 
 
शनिशिंगणापूर देवस्थानाच्या चौथ:यावरून महिलांना दर्शनाची संधी मिळावी यासंदर्भातील वादंग चर्चेत असतानाच आता देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदी एका महिलेचीच 
निवड झाली आहे.
त्यानिमित्त देवस्थानच्या नवनियुक्त अध्यक्ष अनिता शेटे यांच्याशी सर्वच मुद्दय़ांवर साधलेला सविस्तर संवाद.
 
शनिशिंगणापुरातील परंपरा आणि त्यासंदर्भातील सुधारणा यांचा ताळमेळ साधताना देवस्थानच्या अध्यक्ष म्हणून तारेवरची कसरत करावी लागेल. ती कशी साधणार?
- एखादी प्रथा चांगली असेल, ज्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नसेल तर तिचं पालन करायला कोणाचीही हरकत असू नये. देवस्थानचे पावित्र्य आणि नियम पाळणं ही माझी पहिली जबाबदारी असेल. महाराष्ट्राला शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यात बदल आणि सुधारणा हे कोणा एकटय़ा-दुकटय़ाचं काम नाही, ती सर्वाची सामुदायिक जबाबदारी आहे. गावाची परंपरा जर  सांभाळली गेली आणि त्यात कोणाचंच नुकसान होणार नसेल, तर त्यात गैर काय? परंपरा तोडून जर आपण अघटिताकडे जाणार असू, त्यातून लोकक्षोभ होणार असेल तर त्याचा अट्टहास तरी कशासाठी? गावाच्या लौकिकास कुठेही तडा जाणार नाही, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची अध्यक्ष म्हणून माङयावर जबाबदारी आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे.
 
स्त्री-पुरुष समानता आता कायद्यानंही बांधील आहे. असं असताना दर्शनासाठी स्त्री-पुरुष असा भेद कशासाठी?
- शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात स्त्री आणि पुरुष असा कुठलाच भेद केला जात नाही़ लाखो भाविक शनिच्या दर्शनासाठी येतात़ चौथ:यावर शनिदेवाची मूर्ती नसून स्वयंभू शिळा आहे. त्यामुळे कोणालाही चौथ:यावर प्रवेश दिला जात नाही़ नियम प्रत्येकासाठी समानच आहे. शिखांच्या गुरुद्वारामध्ये डोक्यावर रुमाल ठेवून दर्शन घ्यायचा नियम आहे. तो त्या ठिकाणी पाळलाच जातो. तिथे तो वादाचा विषय नसतो, मग शनिच्या चौथ:यावरूनच वाद का? धार्मिक बाबीपेक्षा सुरक्षा म्हणून या नियमाकडे बघितले पाहिजे. पुरुष असो की स्त्री, सर्व जण चौथ:याखालूनच दर्शन घेतात. त्यात कुठलाही भेद नाही. महिला भाविकांना शनिशिंगणापुरात आल्यानंतर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, हे पाहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. शनिशिंगणापूरला येणारा प्रत्येक भाविक समाधानानं येथून परतला पाहिजे ही माझी पहिली प्राथमिकता आहे.
 
अध्यक्ष म्हणून कोणत्या कामाला प्राधान्य देणार?
- सध्या देवस्थान परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत. ती यापुढेही सुरू राहतील. भक्तांच्या देणगीचा उपयोग शिंगणापूरच्या विकासासाठी करून घेतला जाईल. गोर-गरिबांच्या उत्थानासाठी देवाचा पैसा कामी लागला, तर दर्शनाच्या वादापेक्षा ते नक्कीच मोठे काम असेल. शनिभक्तांना येणा:या अडीअडचणी सोडविण्याचे माङो कर्तव्य आहे. 
विधायक गोष्टींमुळे शिंगणापूरचं नाव देशभरात आणखी प्रसिद्ध व्हावं असा आमचा मानस आहे. शनिशिंगणापूरला अनेक प्रसिद्ध आणि मोठमोठय़ा पदावरील महिला अधिकारी येतात. देवस्थानासंदर्भात त्यांना काय वाटतं, आणखी कोणकोणत्या विधायक गोष्टी करता येतील यासंदर्भात त्यांचाही सल्ला घेईन. गोशाळा, बर्फी प्रसाद विक्री विभाग, गोवरी प्रकल्प असे अनेक प्रकल्प येथे आहेत. ते अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. शनिदेवाचे पावित्र्य आणि शिंगणापूर गावाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार शंकरराव गडाख. अशी अनेक ज्येष्ठ मंडळी आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे हे शिवधनुष्य मी नक्कीच पेलू शकेन असा विश्वास वाटतो.
शनिच्या चौथ:यावर प्रवेश मिळावा यासाठी अनेक महिला संघटना आवाज उठवित आहेत. त्यांना चौथ:यावर प्रवेश मिळेल का?
- शनिदेवाच्या चौथ:यावरून  दर्शनाबाबत अनेक महिला संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र चुकीच्या कारणावरून हे आंदोलन होत आहे. वस्तुस्थिती कळल्यावर विरोध थांबेल असा मला विश्वास आहे. चौथ:यावरून दर्शन घेण्यास फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही बंदी आहे. त्यामुळे स्त्रियांबाबत दुजाभाव केला जातोय, असा कोणताच प्रश्न नाही. चौथ:यावरून दर्शन घेण्यावरून वादंग करण्यापेक्षा इतर गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे देवस्थानच्या माध्यमातून महिलांचं आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक विकासावर जास्त लक्ष दिले जाईल. जनप्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.
शनिदेवाच्या चौथ:यावर महिलांना प्रवेश द्यावा, असे गावातल्या एकाही महिलेचे म्हणणो नाही. तरीही या मुद्दय़ाच्या बाजूने आणि विरोधी मत असलेल्या महिलांचे प्रबोधन करून वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करता येईल. शासनानेच ग्रामसभेला अधिकार दिले आहेत. ग्रामसभेतील निर्णय महत्त्वाचे आहेत, याचेही भान असले पाहिजे. एखाद्या गावाची परंपरा म्हणजे त्या गावातील लोकांच्या भावना असतात. तेच त्यांचे जीवन असते. त्याचा तरी आदर करणार की नाही?
 
देवस्थानचे नियम स्त्रीविरोधी नाहीत का?
- आजची वस्तुस्थिती आहे, जेथून पुरुष दर्शन घेतात, तिथूनच स्त्रियाही दर्शन घेतात. याआधी मात्र पुरुष चौथ:यावर जायचे आणि स्त्रिया खालीच थांबायच्या. आता त्यात सुधारणा झाली आहे. आता सर्वच जण एकाच ठिकाणाहून दर्शन घेतात. या नव्या नियमामुळे दर्शनाबाबत स्त्री-पुरुष समानता झाली आहे. साप समजून भुई बडवण्यात काहीच हशील नाही. दर्शनावरून वाद घालण्याऐवजी विधिमंडळात तसा कायदा मंजूर करण्यासाठी भांडले तर ख:या अर्थानं समानता साधली जाईल. सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाऊ देण्याची परवानगी द्यावी. तसा कायदा झाला तर मला आनंदच आहे. अनिष्ट रूढी-परंपरा पाळण्यास माझा विरोधच आहे. त्यासाठी सर्वानी मिळून प्रबोधन करूया. नियम तोडून चौथ:यावर प्रवेश केल्याने अशांतता तेवढी नांदेल. यासंदर्भात भाविकांचं काय म्हणणं आहे, तेही समजून घ्यायलाच हवं.
 
देवस्थानची पहिली महिला अध्यक्ष म्हणून स्त्रियांच्या हिताचे निर्णय घेतले जातील का?
- परंपरा बदलण्यासाठी माझी निवड झालेली नाही. परंपरा चुकीच्या, कालबाह्य असल्या तर त्या बदलणो हे सर्वाचे, समाजाचे काम आहे. देवस्थान विश्वस्त मंडळाची मी एक प्रतिनिधी आहे. शांतता आणि कायद्याने बदल घडविता येईल. देवस्थानच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आह़े देवस्थानचे काही अलिखित नियम आहेत़ त्या नियमांचं पालन करणं हे माझं कर्तव्यच आहे. महिला अध्यक्ष झाली म्हणून लगेच महिलांना चौथ:यावर जाऊन शनिदेवाच्या शिळेचे दर्शन घेता येईल, असं नाही. शनिच्या चौथ:यावर जाऊन दर्शन घ्यावं, असं मलाही वाटतंच की. मात्र ब:याचदा स्वत:च्या इच्छेपेक्षा सार्वजनिक भावना आणि परंपरांचाही मान राखावा लागतो. शनिदेवाच्या शिळेचं रक्षण करणं, ही माङयासह सर्वाचीच जबाबदारी आह़े पुरुष असो की स्त्री, देवस्थानचे नियम तोडून दर्शनासाठी चौथ:यावर प्रवेश दिला जाणार नाही़, यावर ठाम आहे.
 
शब्दांकन- सुदाम देशमुख 
वरिष्ठ उपसंपादक, ‘लोकमत’, अहमदनगर

 

Web Title: Just begging?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.