इसिस : भारताच्या उंबरठय़ावर उभे आहे दहशतीचे सावट

By Admin | Updated: August 22, 2015 19:08 IST2015-08-22T19:08:13+5:302015-08-22T19:08:13+5:30

नरेंद्र मोदींच्या युएई दौ:यात मुत्सद्देगिरी पणाला लावून भारताने पाकिस्तानला दम भरला आणि ‘इसिस’च्या भारत-प्रवेशाची बिळे बुजवण्यासाठी पहिले पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर एका क्रूर दहशतवादी संघटनेच्या भयावह प्रसाराचा वेध

ISIS: India is standing on the threshold of the scandal | इसिस : भारताच्या उंबरठय़ावर उभे आहे दहशतीचे सावट

इसिस : भारताच्या उंबरठय़ावर उभे आहे दहशतीचे सावट

- पवन देशपांडे
 
हातात रायफल घेऊन काही जण एका मॉलमध्ये घुसतात.. अंदाधुंद गोळीबार करतात, अनेक जणांना ओलीस ठेवत सारी यंत्रणा वेठीस धरतात..
 
नेहमीचीच वर्दळ. लोक आपापल्या कामात व्यस्त असतात.. तेवढय़ात एक ट्रक, जीप अथवा कार येते, मोठ्ठा स्फोट होतो.. 
शंभराहून अधिक निष्पाप जीव मारले जातात..
 
..हात मागे बांधलेले आणि खाली मान घालून बसलेला एक माणूस. तोंडाला काळी पट्टी बांधून त्याच्याच बाजूला काळ्या कपडय़ातील एक व्यक्ती. खाली बसलेल्या माणसाच्या मानेवर ठेवलेला धारदार सुरा. क्षणात गळ्यावर सर्रकन सुरी फिरते. ‘जगाला हे कळावं’ म्हणून मुद्दाम चित्रित केलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केला जातो..
 
एका रांगेत उभ्या केलेल्या काही महिला. भोगवस्तू बनण्यास नकार दिल्यानं त्यांना ओळीनं गोळ्या घातल्या जातात.. 
 
कुठे घडत असतील अशा भयंकर घटना? का घेतले जात असतील असे निष्पाप बळी? 
- (सध्या तरी) हे ठिकाण आहे इराक आणि सीरिया. 
गेली कित्येक र्वष नरकयातना भोगतच हे दोन्ही देश सुखसमृद्धीची नवी पहाट उगवण्याची वाट पाहत आहेत. 
भारतापासून हे दोन्ही देश शेकडो मैल दूर असले तरी हा धोका आता भारताच्याही उंबरठय़ावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
हल्ल्यांची अशी क्रूर पद्धत वापरणारी ही संघटना आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस. जगातली सध्याची सर्वात घातक, सर्वात क्रूर आणि सर्वात भयानक दहशतवादी संघटना.
ही संघटना आपलं जाळं भारतीय तरुणांवर टाकते आहे. गेल्या काही दिवसांतील घटनांवर नजर टाकली तर ते स्पष्ट होईल. 
गेल्यावर्षी कल्याणचे चार तरुण इराकमध्ये गेल्याची माहिती समोर आली. ते चौघेही इसिसच्या दहशतवाद्यांना सामील झाले होते. त्यातला एक जण भारतात परतला आणि आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 
इसिसचा टि¦टर हँडलर बंगळुरूमधून जेरबंद झाला. तो बंगळुरूमध्ये बसून टि¦टरद्वारे लोकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचा. पोलिसांना त्याचा ठिकाणा लागला आणि तो पकडला गेला. 
कल्याणच्या चौघांना इसिसमध्ये जाण्याची प्रेरणा देणा:या नवी मुंबईतील प्राध्यापकालाही पोलिसांनी अटक केली आहे. 
आताची ताजी घटना.. इसिसचा भारतातील प्रवक्ता बनण्यास निघालेल्या नवी मुंबईतील जुबेर खानला महाराष्ट्र एटीएसने दिल्लीत अटक केली. त्याचाही इराकला जाण्याचा प्लॅन होता.
काश्मीरमध्ये आतार्पयत आठ-दहा वेळा वेगवेगळ्या रॅलींमध्ये इसिसचे ङोंडे फडकले आहेत. गेल्या महिन्यात तर ‘सावधान, इस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये येतेय’ असेही फलक काही तरुणांनी लावले होते. या तरुणांना पकडण्यासाठी पोलीस अजूनही धजावलेले नाहीत, कारण काश्मीरमधील परिस्थिती आणखी चिघळेल, अशी त्यांना भीती आहे. 
गुप्तचरांच्या माहितीनुसार सध्या 25 पेक्षा अधिक तरुण इसिसच्या संपर्कात आहेत. इसिसने भारतात मोठी फौज निर्माण करण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे. त्यासाठी भारतात त्यांचे दलाल कार्यरत आहेत आणि टि¦टरच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेळोवेळी त्यांचं ब्रेनवॉशिंगही केलं जात आहे. आतार्पयत काहींना पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं असलं तरी ही फळी वाढत जातेय, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे इसिसला रोखणं हे भारतासमोरील मोठं आव्हान झालं आहे
देशाच्या गृहसचिवांनी काही आठवडय़ांपूर्वी काही राज्यांतील पोलीसप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्याचा अजेंडाही इसिस हाच होता. कारण काश्मीर, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत इसिसची मुळे घट्ट होत असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे. त्यामुळेच टि¦टरच्या माध्यमातून इसिस ज्या भारतीय तरुणांना आपल्या क्रौर्यसेनेत सामील करून घेण्यासाठी ब्रेनवॉशिंग करण्याची शक्यता आहे अशा तरुणांवर नजर ठेवण्याचा आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहसचिवांनी तसे आदेशही दिले आहेत. 
इसिसचं आक्रमण इतकं सोपं आणि सहजपणो आटोक्यात येणारं नाहीच. गेल्या वर्षभरातील कारवाईनंतर अमेरिकेलाही आता ते पुरतं उमजलं आहे. इसिस हा राक्षस आहे. माणसं खात सुटलेला. त्यांच्या ङोंडय़ाप्रमाणंच जगावर आपली काळी छाया पसरवण्याच्या मनसुब्यांनी कत्तली करत सुटलेली ही दहशतवादी संघटना आहे. कलियुगातली राक्षससेना!
..आणि त्यांच्या अजेंडय़ावरचं भारत हे नवं सावज आहे !
 

 

Web Title: ISIS: India is standing on the threshold of the scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.