शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

International: पंतप्रधान नाचल्या, मग बिघडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2022 12:03 IST

International: पंतप्रधान निवासात मद्यपानाची पार्टी ठेवून वर त्याचा व्हिडिओ काढण्याचा अगोचरपणा फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांच्या चांगलाच अंगलट आला...

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक पंतप्रधान निवासात मद्यपानाची पार्टी ठेवून वर त्याचा व्हिडिओ काढण्याचा अगोचरपणा फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांच्या चांगलाच अंगलट आला...पंतप्रधानपदाचा स्वतःचा म्हणून एक आब असतो. त्यामुळे त्या पदावरील व्यक्तीला अष्टावधानी राहून आपले दैनंदिन जीवन जगावे लागते. त्यात खासगी क्षण अभावानेच मिळतात. ते स्वतःपाशीच ठेवायला हवे. मात्र, काहींना त्याचे भान राहात नाही. मग त्यातून वाद-विवाद उद्भवतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन होय. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना तर पदच सोडावे लागले. जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून मरिन यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी त्या फिनलंडच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. गेल्या महिन्यात त्यांच्या निवासस्थानी एक मेजवानी झाली. तीत त्यांनी मद्यधुंद अवस्थेत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली. मरिन यांनी नुकतीच झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.२०१९ पासून सत्तेत असलेल्या मरिन यांचा राजकीय जीवन प्रवास वयाच्या विशीतच सुरू झाला. कॉलेजमध्ये असतानाच त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्या बनल्या. आपल्या फायरब्रॅण्ड वक्तृत्वामुळे साना मरिन पक्षात आणि लोकांमध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी पावल्या. मग युवा शाखेच्या अध्यक्ष, टॅम्पेरे शहराच्या नगराध्यक्ष, पक्षाच्या उपाध्यक्ष, खासदार आणि २०१९ मध्ये थेट पंतप्रधानपद अशा प्रगतीच्या पायऱ्या झरझर चढत गेल्या. आक्रमक परराष्ट्रनीती हाही मरिनबाईंच्या कौतुकाचा विषय आहे.  त्यांचा खमकेपणा वाखाणण्यासारखा असल्याने फिनलंडचे नागरिक मरिन यांना मद्यधुंद पार्टी प्रकरणासाठी माफही करतील.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय