‘करण्या’तून मुक्तता

By admin | Published: June 21, 2015 01:29 PM2015-06-21T13:29:21+5:302015-06-21T13:29:21+5:30

‘मैं कौन हू?’ - इस का जवाब सिर्फ खामोशी है! बाकी सभी जवाब निर्थक है, क्यों कि वे सभी जवाब शब्दों के जाल में उलझे होंगे या भावनाओं का लबादा पहने होंगे.

Free from 'Do' | ‘करण्या’तून मुक्तता

‘करण्या’तून मुक्तता

Next
>श्री श्री रविशंकर
 
‘मैं कौन हू?’ - इस का जवाब सिर्फ खामोशी है! बाकी सभी जवाब निर्थक है, क्यों कि वे सभी जवाब शब्दों के जाल में उलझे होंगे या भावनाओं का लबादा पहने होंगे. भावनायें कभी पूर्ण नहीं होती,
इसलिए मैं कौन हॅँू?’ इस सवाल के साथ एक गहरी खामोशी में उतर जाओ. तब तुम उत्तर को अपने आसपास ही पाओगे.
--------------
मी कोण आहे?
कसा समाज मला हवा आहे?
कोणत्या समाजात मी राहतो?.
हिंसाचारमुक्त समाज, रोगमुक्त शरीर, कंपनविरहित श्वास, संभ्रममुक्त मन, बंधनमुक्त प्रज्ञा, आघातमुक्त स्मरणशक्ती आणि दु:खमुक्त आत्मा. प्रत्येक मानवाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे.
कसा मिळेल हा अधिकार, हा हक्क आपल्याला?
अध्यात्म आणि विज्ञानाच्या ‘योगविचारातून’!
अध्यात्म आणि विज्ञान यांचा अन्योन्य असा संबंध आहे. एकमेकांशी त्यांची वीण इतकी घट्ट विणलेली आहे, की एकमेकांपासून त्यांची विभक्ती शक्यच नाही.
मुळात ‘मी कोण आहे?’ हा प्रश्नच आपल्याला अध्यात्माकडे नेतो. 
त्यातूनच पुढचा प्रश्न येतो, ‘हे काय आहे?’. 
- हा प्रश्न आपल्याला विज्ञानाची शिडी चढायला लावतो! अध्यात्म आणि विज्ञानाच्या ‘योगा’तूनच आत्मिक समाधान आणि आनंदाची प्राप्ती होते.
आनंद!
- तो तर आत्ताचा क्षण जगण्यात आहे.
हा क्षण जर ‘सापडला’, तर एका विलक्षण अनुभूतीची प्राप्ती! सारं जग चिंतामुक्त आणि हिंसाचारमुक्त करण्याची शक्ती या क्षणात आहे!
कसा सापडणार हा क्षण?
त्याचं उत्तर आपल्या श्वासात आहे.
शरीर आणि मनाला जोडणारा हा धागा शरीर-मनाला स्थिरचित्त करण्याचं एक साधनही आहे. योग आणि अध्यात्माच्या सरावातून हा क्षण आपल्याला ‘पकडता’ येऊ शकतो.
ज्ञानप्राप्ती आणि प्रबोधनासाठी जगभरात पुरातन काळापासून अध्यात्माचा अवलंब केला जातो. अलीकडच्या काळात त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. 
जगातल्या सर्वच समाज-संस्कृतीत एक जीवनपद्धती म्हणून ‘योगा’नं स्थान मिळवलेलं आहे. आणि आता तर राजकारणाच्या जागतिक पटलावरही ‘योग’ विराजमान झाला आहे. 
सुशासन आणि प्रशासनासाठी एकाच वेळी अनेक कौशल्यांवर प्रभुत्व असावं लागतं. या कौशल्यांचं कृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी योगाभ्यास प्रवृत्त करतो. - हाच ‘राजयोग!’ 
पुरातन काळापासून राजे-महाराजे, राजपुत्र यांनी या मार्गाचा अवलंब केला, त्यातूनच तर ‘राजयोग’ हा शब्द घडला आणि रूळत गेला. 
व्यायामाचा एक प्रकार किंवा वजन कमी करण्यासाठीचा हुकमी एक्का म्हणून पाश्चात्य जगात ‘योग’ खूपच लोकप्रिय झाला. लोकांनाही त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. चिंता, तणाव, रोजच्या धबडग्यातून मुक्ती, व्यसन, निद्रानाश. यांसारख्या अनेक विकारांवर योग हा सर्वसामान्य जनतेसाठी रामबाण उपाय ठरला. पण योगाभ्यासाची त्यापुढली पायरी असते ती आपल्या आंतरिक सामथ्र्याची अनुभूती!.. आणि एकदा या सामथ्र्याची जाणीव झाली, की त्या शक्तीच्या विकासाची आस!
खरंतर आपल्या जगण्याला, आपल्या अस्तित्वालाच योग एक नवा आयाम प्राप्त करून देतो. योगाभ्यासातून शरीराला ताजेपण, लवचिकता प्राप्त होते, तर प्राणायामातून मनाला स्थिरता. योगामुळे आपल्या जगण्याच्या स्तरालाच एक प्रकारची ‘श्रीमंती’ प्राप्त होते. 
योगाचे फायदे तरी किती?
शरीर-आरोग्याची बळकटी, स्मरणशक्तीला तजेला, एकाग्रतेत वाढ, बुद्धिमत्तेला धार, नैराश्य, ताण-तणावातून मुक्ती, उत्साह, स्फूर्तीच्या साठय़ांमध्ये वाढ! सृजनाचं काम करणा:यांच्या विचारशक्तीला चालना देण्याचं आणि कालांतरानं या विचारमार्गातला बोळा - उदाहरणार्थ ‘रायटर्स ब्लॉक’ - काढून टाकण्याचं महत्त्वाचं कामही योगाभ्यासातून साध्य होतं. 
महर्षी पतंजलींची योगसूत्रं म्हणतात, मनाला सर्व प्रकारच्या चकव्यांमधून मुक्त करण्याचा मार्गच आहे योगाभ्यास!
तुम्ही कधी तुमच्या मनाकडे जरा लक्ष देऊन  ‘पाहिलंय’ का?
- पाहा.
काय जाणवेल?
हेच की, हरेक क्षणी आपलं मन पाच प्रमुख गोष्टींपैकी किमान एकात गुंतलेलं असेल.
1- उत्तरांचा किंवा पुराव्यांचा शोध
2- निष्कर्ष काढणं
3- कल्पनेत रममाण असणं
4- भूतकाळात दंग असणं
5- स्वपA पाहणं
‘योग’ म्हणजे यातली एकही गोष्ट न करणं!
या पाचही व्यवधानांमधून मन मुक्त होत असतं त्याक्षणी ‘योग’ साधला जातो!
मनात सारखा दंगा सुरू असतो. घाई उडालेली असते. जागेपणी आपण जे पाहतो, ऐकतो, ज्याचा वास घेतो, ज्याला स्पर्श करतो, ज्याची चव घेतो, ज्याचा विचार करतो, जे काम करतो त्यात बुडालेले असतो. जागेपणीची ही अवस्था संपते, तेव्हा एकतर आपण जगापासून तुटून स्वप्नांच्या राज्यात रमतो किंवा मग त्या स्वप्नांसह, घाईसह झोपी जातो.
- यातल्या कुठल्याच अवस्थेत शरीर अगर मनाला हवी असलेली संपूर्ण विश्रंती मिळतच नाही.
शारीरिक पातळीवरची अनुभूती जेव्हा हवी असते, तेव्हा त्यासाठी शारीरिक ‘कष्ट’ घ्यावे लागतात, पण मानसिक अनुभूतीची आस जेव्हा आपण धरतो, तेव्हा मात्र ‘कष्टविरहित’ कृतीची गरज असते. 
 ‘कष्टपूर्वक’ किंवा बळजबरीनं झोपण्याचा, रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करून पाहा. झोप तुमच्यापासून आणखी दूर पळेल, आणखीच प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. ‘कष्टविरहित’ अवस्थेसाठी विशिष्ट कौशल्याची आवश्यकता असते. संपूर्णपणो ‘शांत’ होण्यातून, मनातला दंगा विझवून स्थिर होण्यातून मिळणारी ऊर्जाच मग नव्या कृतीसाठी प्रोत्साहित करत असते. 
एखादा जुनुन, चारही बाजूंनी घेरून टाकणारी आसक्ती हा ‘श्वास’ आहे. आत जाणारा! पण नुसता श्वास ‘आत’ घेऊन कसं चालेल? - तो  ‘बाहेर’ सोडावा लागणारच! उच्छ्वासाखेरीज पुढच्या श्वासाला जन्म कसा मिळेल? हा उच्छ्वास म्हणजेच ‘नि:संग’पणा, विरक्ती!
आसक्ती, विरक्ती आणि अनुकंपा या तिन्हींचा सुसंवादी समतोल हेच आयुष्याचं श्रेयस आहे, असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या अंगी शिस्त बाणवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आपण त्याग करीत असतो. पण ‘योग’ ही एक अशी शिस्त आहे, ज्यामुळे आंतरिक स्वातंत्र्याची दारं आपोआपच खुली होतात! विसंगत वाटेल, पण हे सत्य आहे.
कधी ‘बाह्य जगात’ वावरायचं, कधी त्यातून बाहेर पडायचं आणि कधी आपल्या आंतरिक विश्वाच्या डोहात  बुडून जायचं, हे स्वत: ठरवण्याची गुरुकिल्ली म्हणजे योग! मनाच्या या तिन्ही स्तरांवर आपल्या प्राथमिकतेनुसार वावरता येणं म्हणजे योग! मनाचा कुठला स्विच कधी ऑन करायचा आणि कधी ऑफ, याचं कौशल्य आपल्याला प्राप्त होतं ते योगाभ्यासातून. 
श्वास-उच्छ्वासाचं ‘हे’ तंत्र, आत येण्या-बाहेर जाण्याच्या वेळा आणि मार्गावरचं नियंत्रण गवसलं, की आपल्या मनाचं तंत्र आपल्या ताब्यात येतं. जेव्हा तुम्ही मनावर विजय प्राप्त करता, तेव्हा जग जिंकण्याचा संघर्षच उरत नाही.
‘मी कोण आहे?’ हा प्रश्नही मग आपोआप लोप पावतो..
www.artofliving.com
 
------------------
हे सारं अखेर कशासाठी?
1 लहान बाळांकडे नीट लक्ष देऊन कधी पाहिलंत का? ही एक कृती केलीत, तर योगाभ्यासासाठी कोणत्याही योगशिक्षकाची तुम्हाला गरज नाही! तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतचं प्रत्येक मूल योगासनंच करत असतं. या बाळांचं श्वास घेणं, त्यांची झोपण्याची पद्धत, त्यांचं हसणं हे सगळं योग नाहीतर दुसरं काय आहे? लहान बाळ योगी असतं, त्यामुळेच ते तणावमुक्त, आनंदी असतं. ही बाळं दिवसातून चारशे वेळा हसतात.
2 योगाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, त्यामुळे व्यक्तीचं वागणं बदलतं, स्वभाव मैत्रीपूर्ण होतो आणि वातावरण प्रसन्न होतं. 
3 योगामुळे आपल्या लहरी सुधारतात. आपल्या असण्यातूनच आपण शब्दांपेक्षाही बरंच काही सांगून जातो. क्वांटम मेकॅनिक्सच्या संदर्भात सांगायचं, तर आपण सर्वजण लहरी किंवा रेडिओ लहरी सोडत असतो. जेव्हा एखाद्याशी आपलं पटत नसेल तेव्हा आपण म्हणतोच की, ‘आमची वेव्हलेन्ग्थ जुळत नाही!’ - कारण आपली संपर्कक्षमता इतरांच्या संपर्कस्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. 
4 श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलं आहे, ‘‘योग: कर्मसु कौशलं’’. योग हा केवळ व्यायाम नाही, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही किती कौशल्याने संपर्क आणि कृती करू शकता याचं प्रतिबिंब आहे. 
5 नवनिर्मिती, अंतज्र्ञान, कौशल्य आणि उत्तम संपर्क साधणं हे सर्व योगाचे परिणाम आहेत. विविधतेत सुसंवाद हे योगाचं सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थच एकत्र आणणो, अस्तित्वातील, जीवनातील विविध पैलूंचा मिलाफ घडवणो असा आहे.
6 सध्या जगभरात ‘जीडीपी’बद्दल (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) बरंच बोललं जातं. ‘जीडीपी’कडून आपण आता ‘जीडीएच’कडे (ग्रॉस डोमेस्टिक हॅपिनेस) जात आहोत. त्यासाठीही योग हे अतिशय उपयुक्त साधन आहे. 
7 आज कुठेही नजर टाका, सारेच वैफल्यग्रस्त दिसतात. केवळ औषधे घेऊन काही होणार नाही. त्यासाठी आपल्या श्वासाइतकं नैसर्गिक असं काहीतरी आपल्याला हवं आहे, जे वापरून आपण आपली उन्नती करून घेऊ शकू. अटळ ताण-तणावाचा सामना करतानाच चेह:यावर हास्य कायम ठेवू शकू.
- योगाचा हाच तर उद्देश आहे.. 
 
 

Web Title: Free from 'Do'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.