शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:13 AM

मै उगाता हूं कपास, सारी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी ही लाश क्यू एक कफन के लिए तरसती है

  • रूपेश उत्तरवार

जगाचा अन्नदाता आज खितपत पडला आहे. त्याचे अश्रू पुसायला अनेकजण पुढे आले. मात्र ते केवळ कोरडे आश्वासन होते. यामुळे अश्रूचा महापूर गाव खेड्यातून वाहतो आहे. मात्र समाज व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे दु:ख नाही.गृत्समद ऋषींनी कळंबनगरीत कापसाचा शोध लावला. वऱ्हाडात पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून जगभरात यवतमाळचा नावलौकीक आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटीशांनाही इथला कापूस वाहून नेण्यासाठी रेल्वेगाडी सुरू केली.सततच्या निसर्ग प्रकोपासोबत शेतमालास न मिळणाऱ्या दराने कापूस उत्पादक शेतकरी अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे वळले. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक भुईसपाट केले. आता शेत शिवारात केवळ अश्रू ढाळणारे शेतकरी पहायला मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे सरकार मायबाप मात्र बेपत्ता आहे. एकतर शेती व्यवसायातील पीक पद्धती शेतकऱ्यांना बदलावी लागणार आहे. अथवा शेती व्यवस्थेला सरकारचे मोठे पाठबळ असावे लागणार आहे.राजमान्यता मिळालीच नाहीशेतीला खर्चावर आधारित दर कधी मिळालेच नाही. शेतमालाचे दर ठरविणारा केंद्रीय कृषीमूल्य आयोग याची कधी दखलही घेत नाही. शासन शेतमालाच्या किमती काही रुपयाने वाढविते. खर्च मात्र हजाराने वाढतो आहे. आयात निर्यात धोरण आणि शेतीमधील गुंतवणूकही नावालाच आहे. यामुळे शेतमालाचे उत्पन्न दुप्पट होणार किंवा नाही, याचे उत्तर काळच देणार आहे.निसर्गाचा समतोल ढळलानिसर्गाचा समतोल ढळत आहे. त्याचा संपूर्ण परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. निसर्ग प्रकोपाचा सामना शेतकºयांना करावा लागतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीर पाठबळ शेतकºयांच्या पाठीशी उभे नसल्याचीच गंभीर बाब पहायला मिळते. पीक विमा नावालाच आहे. ह्या कंपन्या शेतकºयांच्या पाठीशी कधीही उभ्या राहताना दिसत नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.कृषी विद्यापीठांचे संशोधन अपुरेनिसर्गाच्या कालप्रवाहात तगधरणारे संशोधित वाण कृषी विद्यापीठांनी निर्माण केले नाही. यामुळे पतरतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीटी आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करण्यात विद्यापीठ मागे आहेत.शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी किडींचा प्रकोप तर शेतमालास भाव नाही. यामुळे शेतकरी सदैव दु:खात जगतो आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्याही घडत आहेत. खर्चावर आधारीत दर, २४ तास वीज, सिंचनाची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि आपत्ती काळात मदतीचा हात असेल तरच हे थांबणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी