शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कान आणि दृष्टी

By admin | Updated: February 19, 2016 18:21 IST

आपण कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात भक्तिभावाने जातो; परंतु ते देऊळ कुठच्या स्थापत्यकलेत बसते, हे आपण कधी विचारत नाही, अन् कोणी सांगतही नाही.

- अमोल पालेकर
 
आपण देवळात जातो, 
परंतु तिथली स्थापत्यकला आपल्याला दिसत नाही.
अजंठा-वेरुळबद्दल बोलतो, 
पण ही कला का लुप्त झाली, 
याचा शोध आपण घेत नाही. 
स्वत:ला नाटकवेडे म्हणवतो, 
पण चौकटीपलीकडचं 
आपल्याला कळत नाही.
आपला संगीताचा कान
उत्तम तयार झाला आहे,
मग दृश्यकलांच्या बाबतीतच
एवढी उदासीनता का?
 
आपण कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात भक्तिभावाने जातो; परंतु ते देऊळ कुठच्या स्थापत्यकलेत बसते, हे आपण कधी विचारत नाही, अन् कोणी सांगतही नाही.  
हेमाडपंती ही स्थापत्यकला कुठे लुप्त झाली, हे आपल्याला माहिती नाही. आपण अभिमानाने अजंठा-वेरुळबद्दल बोलतो, पण ही कला कुठे आणि का लुप्त झाली, याचा शोध घेतला जात नाही.  
दृश्यकलेबद्दल तर आपल्याला उत्सुकताही उरलेली नाही. आपण पटकन कारण देतो, तुम्ही काढलेले चित्र मला कळलेले नाही. कलेचा अनुभव घेण्यासाठी ‘कळणो’ ही प्राथमिक अट असली पाहिजे, हे कुणी सांगितले? कुठल्याही कलेला प्रथम सामोरे आणि जमल्यास शरण गेले पाहिजे. अनुभव घेतल्यानंतर मग जे अनुभवले ते समजले की नाही समजले? आवडले की नाही आवडले?.. ही सगळी प्रक्रिया! ती नंतर येते, पण आपण ती आधी आणून ठेवली आहे.
‘मला आधी ते कळले पाहिजे, मग (आणि तरच) मी त्यात रस घेईन’, हा उलटा प्रवास आपण सुरू केला आहे. 
 संगीताला मात्र आपण सहजगत्या शरण जातो. पहिली दाद आपण स्वराला देतो, स्वराला शरण जातो. शब्दांची दाद नंतर आणि त्यानंतर काव्य. हे आपण दृश्यकलेच्या बाबतीत का करूशकत नाही? संगीताच्या बाबतीत शास्त्रीय संगीताचा राग कोणता आहे? कोणत्या घराण्यातला आहे? त्या घराण्याची खासियत काय, हे माहीत नसले तरीही ते संगीत सहज पोहोचते. मग, दृश्यकलेबद्दलच ‘मला आधी कळले पाहिजे’ हा अट्टहास का? 
दृश्यकलेबद्दलच्या अगाढ अज्ञानाचा एक कलावंत म्हणून मला क्लेश होतो.
 संगीताच्या बाबतीत महाराष्ट्राचा कान अतिशय सुंदर तयार झाला, परंतु आपल्याला ‘नजर’ मात्र अजून मिळालेली नाही. दृश्यकला, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला या सगळ्या प्रांतांमध्ये आपल्याला कधी रसच निर्माण झाला नाही. 
दाक्षिणात्य राज्यांत घरातील प्रत्येक मुला-मुलीला संगीत व नृत्याचे शिक्षण दिले जाते.  कलेविषयीची ही आवड पुढे जीवनाचे काही वेगळे अर्थ उलगडून दाखवू शकते, ही जाणीव तिथे दिसते. आम्ही तेही करीत नाही. 
नाटक ही दृश्यश्रव्य कला आहे असे आपण म्हणतो. पण कुठल्या दृश्याला दाद देतो? आपण केवळ संवादांना टाळ्या वाजवतो. कारण, मराठी रंगभूमीवर अभिनयच केला जातो; ज्याला नाटय़कलेत वाचक अभिनय म्हटले जाते. आपल्याला तेवढेच माहिती आहे. परंतु, बाकीच्या इतर अंगांचे काय? दृश्यभाषा, शरीराची बोलकी भाषा. त्याचा आपण कधी वापरच केला नाही. 
मी जेव्हा रंगभूमीवर गेलो, त्यावेळी मला पहिला प्रश्न पडला, रंगभूमीचा विचार आपण केवळ लांबी व रुंदी एवढय़ाच मितीत का करतो?  पडदा उघडल्या- नंतर कडाडून टाळ्या पडतात, त्या नेपथ्यामध्ये फक्त लांबी-रुंदीचा विचार का? उंचीचा का नाही?
आपण स्वत:ला नाटकवेडे म्हणवतो, पण आपल्याला माहिती असलेली रंगभूमी म्हणजे चौकटीत दिसते तेवढेच नाटय़. ते नाटय़ इथे, आपल्यासमोर घडते आहे असे वाटतच नाही. प्रेक्षक इथे उपस्थित नाहीत असे गृहीत धरून आपण नाटक करतो आणि हे सर्व नाटय़ भिंतीच्या पल्याड चालले असून, चोरून पाहावे तसे आपण ते पाहतो. 
अभिनेते व प्रेक्षक यांच्या पलीकडचे नाते काही असू शकते का, असा प्रश्न मी चित्रकार असल्याने मला पडला. मग नाटक या चौकटीच्या बाहेर घडू शकते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. मराठी रंगभूमी दर्शनी पडद्याच्या बाहेर नेण्याचे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये माझा थोडाफार हातभार लागला, याचे समाधान आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे झालीे, त्याचे सोहळे आपण  कसे केले? - धंदेवाईक यश मिळालेल्या चित्रपटांच्या कौतुकापलीकडे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रयत्नांची दखल घ्यावी अथवा त्यांची आठवण करावीशी आपल्याला वाटली का? 
चित्रपटांच्या  दृश्यात्मकतेचा विचार आपण  केला नाही. मी जे काही शूट करेन, ते नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बदलून टाकता येते. निळे आकाश मी पिवळसर तांबूस करू शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. परंतु याच्या पलीकडे मूलतत्त्वाकडे जाऊन हा रंग मला खरा रसरशीत दिसतोय की नाही, मला हा सूर ऐकू येतोय का, तो पक्का सूर आहे की नाही याचे भान राखता यायला हवे. चि. त्र्यं. खानोलकरांच्या (आरती प्रभू) दोन ओळी मला आठवतात. 
‘वेळूमधुनी घुमते आहे 
हे वा:याचे आर्त कबुतर, 
केव्हापासून धपापते 
हे आकाशाचे मौन दिगंबर.’ 
आता हे धपापणा:या आकाशाचे मौन दिगंबर चित्रकलेत आपण कसे पकडतो, हे महत्त्वाचे आहे. मग, अमूर्त चित्रकला कळत नाही असे आपण म्हणणार नाही. जे शब्दांतून व्यक्त केले, ते दृश्यकलेतून व्यक्त करता आले पाहिजे. 
अशा कितीतरी गोष्टी.
 
(‘एक चित्रकार की खोज में’ ही संकल्पना घेऊन पिंपरी-चिंचवड येथील व्हीनस आर्ट फाउंडेशनतर्फे 120 शाळांमध्ये  चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना दृश्यकलेसंबंधी 
व्यक्त केलेले विचार.)
 
शब्दांकन : हणमंत पाटील