स्वप्नं
By Admin | Updated: May 23, 2015 16:53 IST2015-05-23T16:53:40+5:302015-05-23T16:53:40+5:30
काही स्वप्नं पूर्ण होतात, काही अर्धीमुर्धी राहतात. काही तुटतात, काही पुन्हा जुळतात.

स्वप्नं
- चंद्रमोहन कुलकर्णी
- बिट्विन दी लाईन्स
काही स्वप्नं पूर्ण होतात, काही अर्धीमुर्धी राहतात.
काही तुटतात, काही पुन्हा जुळतात.
लिओनादरे द व्हिसीनं काही स्वप्नं पाहिली होती आणि साल्वादोर दालीनंसुद्धा.
फ्लोरिडातल्या सेंट पिटस्बर्गइथल्या दाली म्युङिायममध्ये 'Dali & Vinci : Where minds, machines and masterpieces meet' हे प्रदर्शन भरलंय. 26 जुलै 2015 र्पयत सुरु राहणार आहे.
दालीनं आणि लिओनादरे द व्हिन्सीनं केलेल्या कामाचा कलाजगतावर फार मोठा प्रभाव आहे. चित्रकलेमध्ये या दोघांनी महत्त्वाचं काम तर केलंच, पण इतरही माध्यमं फार प्रभावीपणानं हाताळली. या प्रदर्शनाच्या निमित्तानं निरनिराळ्या माध्यमांमधून होणा:या निर्मितीच्या शक्यतांचा त्यांनी केलेला विचार आणि त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या लिखाणातनं, स्केचबुकांमधून बाहेर आला. काही विचारवंतांनी, कलावंतांनी हा विचार पुढे नेला. ग्राफिक्सच्या माध्यमातनं, पेंटिंग्जच्या माध्यमातनं, थ्री-डी, अॅनिमेशन. अशा अनेक माध्यमातनं दोन महान कलावंतांची स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. म्युङिायमनं तो प्रदर्शित केला.
हे झालं दालीनं आणि व्हिन्सीनं त्यांच्या कार्यकाळात पाहिलेल्या स्वप्नांविषयी.
व्हिन्सीच्या लहानपणी त्यानं पाहिलेल्या स्वप्नाविषयीचं आणि मोठेपणी म्हणजे 15क्8 साली त्यानं काढलेल्या 'The virgin and Child with St. Anne'. अल्लल्ली या चित्रच्या विश्लेषणाचा अभ्यास तिथं प्रदर्शित केला होता. सेंट अॅनच्या मांडीवर कुमारी माता आणि कोकराशी खेळत असलेला बाळ येशू असं मोठं सुरेख चित्र आहे हे.
It sems that it had been destined before that I should occupy myself so throughly with vulture, for it comes to my mind as a very early memory, when I was still in the cradle, a vulture came down to me, he opened my mouth with his tail and struck me few times with his tail against my lips-codex Atlanticus' : Leonardo Da Vinci..
लिओनादरेनं त्याच्या लहानपणी पाहिलेल्या एका स्वप्नाबद्दल 'Codex Atlanticus'मध्ये केलेल्या स्वप्नाबद्दलच्या विधानाचा सिग्मंड फ्रॉइडनं केलेला हा अनुवाद आहे. फ्रॉइडच्या मते हे विधान लैंगिकतेशी संबंधित आहे.
चित्रत कुमारी मातेनं तिच्या मूळच्या किरमिजी रंगाच्या वस्त्रवर करडय़ा रंगाचं आणखी एक वस्त्र लपेटलेलं दिसतं. हे वस्त्र तिच्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखालून येऊन पायार्पयत पसरलेलं आहे. स्पष्ट दिसतं.
ह्या वस्त्रच्या बाह्य आकाराचा संबंध फ्रॉइड, व्हिन्सीच्या स्वप्नात आलेल्या गिधाडाशी जोडतो. चित्रकार म्हणून जेव्हा आपण हे चित्र पाहतो, तेव्हा अनेक दृष्टिकोनातून पाहतो. चित्रकार नसलेला रसिक ह्या चित्रकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. फोटोग्राफी नसण्याच्या काळातलं हे चित्र. ह्या चित्रसाठी केलेल्या रेखाटनांवरून चित्रकारानं मानवी देहाचा, चेह:यावरील भावदर्शनाचा, देहबोलीचा तसेच वस्त्रंच्या घडय़ा, चुण्या, पोत अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिसतो. म्हणूनच कथाकथनाच्या अंगानं जाणारं हे चित्र चित्रकारांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं मानलं जातं.
सर्वसामान्यांना जे दिसत नाही, ते मानसशास्त्रचा अभ्यास करणा:यांना दिसतं. मग कलाकृतीच्या मागे दडलेले अनेक अर्थ उलगडतात. फ्रॉइडसारख्या महत्त्वाच्या विचारवंताचे विचार अशा वेळी महत्त्वाचे ठरतात.
ह्या करडय़ा रंगाच्या वस्त्रच्या बाह्याकृतीत फ्रॉइडला गिधाडाची आकृती दिसली. ती कशी, ते चित्रच्या शेजारी गिधाडाची दुसरी एक आकृती काढून ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रदर्शनात दाखवलेलं आहे. मानसशास्त्रचा अभ्यास नसलेल्या माङयासारख्या सामान्य चित्रकाराला ही गिधाडाची आकृती पाहण्यासाठी मान थोडी वाकडी करावी लागली. मेरीच्या कमरेच्यामागे लपेटलेल्या वस्त्रचा काही भाग गिधाडाच्या चोचीसारखा दिसला आणि खालचा भाग गिधाडाच्या मानेसारखा आणि गुडघ्याचा भाग हा पोटासारखा दिसला. उरलेला भाग मी पंखासारखा मानायला तयार झालो. अशा दृष्टिकोनातनं पाहिलं तर सगळ्यांनाच तिथं गिधाड दिसतं. तुम्हालाही दिसेल. प्रदर्शनात तसं स्पष्टही केलंय. फ्रॉइडनं चित्रचा अभ्यास केला, मानवी मनाचा, शरीराचा आणि लैंगिकतेचा अभ्यास केला, काही निष्कर्ष काढले, जगापुढे मांडले.
चित्रसमोर मी उभा राहिलो होतो तोर्पयत त्यात सर्व वेळ मी लिओनादरेला लहानपणी पडलेल्या स्वप्नातल्या गिधाडाची आकृती न्याहाळत होतो. त्यामुळे चित्रच्या इतर अंगांकडे पाहण्याचा माझा मूड विरघळून जातोय, असं मात्र मला वारंवार वाटत होतं.
एकदा गिधाड, एकदा लिओनादरे, एकदा दाली, एकदा फ्रॉईड, एकदा मेरी, एकदा तिची आई, एकदा येशूृ, एकदा कोकरू, असं पाहता पाहता मी भंजाळून गेलो. माझं डोकं काम करेनासं झालं. एकदा गिधाडाची आकृती आणि त्या गिधाडाचा लिओनादरेच्या लहानपणीच्या स्वप्नाशी असलेला संबंध आणि एकूणच मानवी मन आणि लैंगिकता ह्यांचा संबंध मान्य करून मी ते सगळं बाजूला ठेवून चित्रचा स्वतंत्र अभ्यास आणि रसग्रहण करायला खरंतर काहीच हरकत नव्हती. प्रदर्शनातलं हे चित्र ओरिजिनल नसलं तरी प्रतिकृतीच्या उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानामुळे ते तंतोतंत मूळ चित्रएवढंच सुंदरही होतं.
पण तरी मी ते चित्र मनमोकळेपणानं अनुभवू शकलो नाही. गिधाडाची छाया त्या चित्रवर पसरलेलीच राहिली. मी तिथून निघून आलो.
आज संगणकावर हे चित्र डाउनलोड करून पाहिलं तरी माझं मन गिधाडाची एक आकृती तयार करतं आणि कुमारी मातेच्या त्या तलम वस्त्रवर चिकटवतं. मग कम्प्युटरच्या स्क्रीनवरसुद्धा त्या करडय़ा गिधाडाची पडलेली करडी सावली माङया मनावर पसरते. चित्र झाकोळतं, मनात मळभ दाटतं.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)