शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते फ्रीझ झाले म्हणजे तुम्ही गुन्हेगार ठरता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:19 IST

Banking News: आजच्या डिजिटल युगात खिशात पैसे नसले तरी कोणाचे काही अडत नाही. आपण डिजिटल युगात जसे वेगाने पुढे जात आहोत तसे त्याचे काही दुष्परिणामदेखील सोसावे लागत आहेत.

-ॲड. (डॉ.) प्रशांत माळी(सायबर कायदा व सायबर सुरक्षातज्ज्ञ)

आजच्या डिजिटल युगात खिशात पैसे नसले तरी कोणाचे काही अडत नाही. आपण डिजिटल युगात जसे वेगाने पुढे जात आहोत तसे त्याचे काही दुष्परिणामदेखील सोसावे लागत आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे वाढते सायबर गुन्हे. सायबर फसवणूक आणि त्यातून होणारे बँक खाते फ्रीझ होणे, एका क्षणात यूपीआय बंद होणे, एटीएम कार्ड निकामी होणे, पगार अडकणे, व्यवसाय ठप्प होणे असा त्रास होतो. महत्त्वाचा प्रश्न असा की, खाते फ्रीझ झाले म्हणजे खातेदार गुन्हेगार ठरतो का? केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आयफोरसी) यांनी नुकत्याच जारी केलेल्या नवीन प्रमाणित कार्यप्रणालीचे (एसओपी) उत्तर स्पष्ट आहे - नाही.

बँक खाते फ्रीझ होणे म्हणजे काय?बँक खाते फ्रीझ होणे याचा अर्थ असा की, तपास यंत्रणा किंवा बँकेने तुमच्या खात्यावर व्यवहार करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. एखाद्या खात्यात सायबर फसवणुकीचे किंवा संशयास्पद व्यवहाराचे पैसे आल्याचा संशय असतो, तेव्हा पोलिस किंवा संबंधित विभाग तपासासाठी बँकांना ते खाते 'होल्ड' किंवा 'फ्रीझ' करण्याचे आदेश देतात.

खाते फ्रीझ का होते, गैरसमज कुठे होतो?बहुतांश प्रकरणांत खाते फ्रीझ होण्यामागे सायबर फसवणुकीची तक्रार असते. जेव्हा एखादी पीडित व्यक्ती cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाईनवर तक्रार करतो, तेव्हा ती संशयास्पद रक्कम ज्या-ज्या खात्यांमधून हस्तांतरण झाली आहे, ती सर्व खाती तपासासाठी तात्पुरती 'होल्ड' किंवा 'फ्रीझ' केली जातात. अनेकदा तपास यंत्रणांना केवळ संशय असतो. याचा अर्थ असा नाही की खातेदार दोषी आहे. तुम्ही निर्दोष असाल तर तुमचे फ्रीझ बँक खाते कोर्टाच्या आदेशानुसार मोकळे केले जाते.

केंद्र सरकारच्या नव्या एसओपीत कोणत्या बाबींचा आहे समावेश?१. बँका, पेमेंट ॲग्रीगेटर्स आणि अंमलबजावणी यंत्रणांनी केवळ संशयास्पद रकमेपुरतेच खाते मर्यादित ठेवावे. पूर्ण खाते फ्रीझ करणे हा शेवटचा पर्याय असावा, जेणेकरून खातेदाराला दैनंदिन व्यवहार, पगार किंवा औषधोपचारासाठी पैसे वापरता येतील.२. खाते किंवा त्यातील काही रक्कम फ्रीझ केली गेली, तर बँकेने तत्काळ खातेदाराला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे त्याची माहिती देणे आवश्यक आहे. यात तक्रार क्रमांक आणि फ्रीझ करण्याचे कारण स्पष्ट असावे.३. खाते केवळ संशयावरून फ्रीझ केले असेल, तर संपूर्ण नेट बँकिंग किंवा यूपीआय बंद करण्यापूर्वी बँकेने खात्री करणे आवश्यक आहे.४. तपास यंत्रणेने खाते फ्रीझ केल्यानंतर ९० दिवसांच्या आत कोणतीही कायदेशीर कारवाई केली नसेल किंवा न्यायालयाचा कोणताही आदेश आला नाही, तर ते खाते अनफ्रीझ करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नागरिकाला मिळतो.

खाते फ्रीझ झाल्यावर काय करावे?होम ब्रँचमध्ये जाऊन लेखी स्वरूपात खाते फ्रीझ होण्याचे कारण विचारा.पोलिस ठाण्याचा पत्ता आणि कोणत्या राज्याच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे, याची माहिती घ्या.तुमचा अधिकृत तक्रार अर्ज दाखल करा. बँकेला ही तक्रार ७ दिवसांच्या आत संबंधित तपास अधिकाऱ्याकडे पाठवणे बंधनकारक आहे.केवळ पडताळणीसाठी खाते फ्रीझ झाले असल्यास व्हिडीओ कॉल किंवा अधिकृत कागदपत्रांद्वारे ओळख पटवून देऊन तुम्ही खाते अनफ्रीझ करण्याची विनंती करू शकता.पोलिस तपासात विलंब होत असेल किंवा तुमची बाजू ऐकून घेतली जात नसेल, तर तुम्ही वकिलामार्फत किंवा स्वतः न्यायालयात धाव घेऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Account Freeze: Does It Mean You're a Criminal?

Web Summary : A bank account freeze doesn't automatically make you a criminal, says cyber expert Dr. Prashant Mali. It often stems from suspected cyber fraud. New guidelines prioritize partial freezes and quick notifications. If no action occurs within 90 days, you can seek legal recourse.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक