शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ या कॅलेंडरची तुम्हाला माहिती आहे का? अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 09:31 IST

Indian National Calendar: भारताचं नववर्ष 1 जानेवारी किंवा गुढीपाडवा नाही. खूप कमी लोकांना या दिनदर्शिकेविषयी माहिती आहे. भारतीय खगोलशास्त्रावर आधारलेली ही दिनदर्शिका खरोखर भन्नाट प्रकरण आहे. त्याचाच हा वेध...

- विनय जोशी (खगोल अभ्यासक, नाशिक) 

गळ्या भारतीयांनाभारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! या शुभेच्छांनी खरंतर आश्चर्य वाटू शकेल. १ जानेवारी नाही, गुढीपाडवा नाही मग हे कोणते नववर्ष? हे आहे २२ मार्चला सुरू झालेले आपल्या भारताचे अधिकृत वर्ष. ‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ हे भारताचे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर असून शासकीय कामकाज, बातम्या, राजपत्र यात याचा वापर केला जातो. तसेच जावा व बाली येथील हिंदू याचा वापर करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती यापासूनच झाली. राष्ट्रीय सौर दिनांक चेकवर लिहिणे ग्राह्य आहे.भारतात जशी भाषा, वेशभूषा यात विविधता आहे तसेच कालगणनेत सुद्धा प्रचंड वैविध्य आहे. बहुतांश भारतात गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते, तर गुजरातमध्ये दिवाळी पाडव्यापासून. तमिळनाडू-पुथंडू, बंगाल-पहेला वैशाख, पंजाब- बैसाखी, केरळ- विषू या दिवसापासून तर व्यवहारात १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते. हा सगळा गोंधळ पाहून सर्वांना समान वाटेल आणि शास्त्रशुद्ध अशी देशाची एखादी कालगणना असावी, असा विचार स्वातंत्र्यानंतर सुरू झाला. १९५२ मध्ये भारत सरकारने शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅलेंडर सुधारणा समिती स्थापन केली. या समितीने सर्व बाबींचा सखोल विचार करून सुचवलेली दिनदर्शिका सरकारने राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून २२ मार्च १९५७ या दिवसापासून अधिकृतपणे स्वीकारली.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित कालगणना आहे. १२ महिने सौर म्हणजे सूर्यावर आधारित असून त्यांची नावे चांद्र म्हणजे चैत्र, वैशाख हीच आहेत; पण यात तिथींसारखे प्रतिपदा, द्वितीया असे नसून १ ते ३१ अंकांनी दिवस मोजले जातात. नवीन वर्षाची सुरुवात भारतीय सौर १ चैत्र वसंत संपात दिनी म्हणजे २२ मार्चला होते. या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. यानंतर तीन महिन्यांनी सौर १ आषाढ- २२ जूनला सूर्य कर्कवृत्तावर दिसत असताना दक्षिणायन सुरू होते. पुढे २३ सप्टेंबरला शरद संपात दिनी सहा महिने पूर्ण होऊन सौर १ आश्विन येतो. यावेळी पुन्हा दिवस-रात्र समान असतात. तर २२ डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन सौर १ पौष येतो. अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.

या दिनदर्शिकेत महिन्याचे दिवस ३०/३१ घ्यायला देखील शास्त्रीय आधार आहे. सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती मंदावते म्हणून त्या काळातले वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे आहेत. सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती जास्त असते म्हणून त्या काळातले आश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे. अशा तऱ्हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. इंग्रजी लीप वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय वर्षही ‘लीप वर्ष’ घेतात. त्या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात २१ मार्चला करतात. भारताच्या बहुतेक भागांत शालिवाहन शक वापरला जात असल्याने आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेत देखील तोच आहे. नवीन दिवसाची सुरुवात मध्यरात्री १२ वाजता होते.

खरेतर ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे; पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. दैनंदिन व्यवहारात या दिनदर्शिकेचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. ही दिनदर्शिका घरात लावणे, जिथे जिथे इंग्रजी तारीख लिहितो तिथे सौर दिनांकसुद्धा लिहिणे, चेक, निमंत्रण, लग्नपत्रिका वगैरे सगळ्या दैनंदिन व्यवहारात वापर करणे, अशा सोप्या उपायातून हे कार्य घडू शकेल. अशा प्रयत्नांतून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात रुजावी याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!वैशिष्ट्य काय?‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ हे भारताचे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर असून शासकीय कामकाज, बातम्या, राजपत्र यात याचा वापर केला जातो. जावा व बाली येथील हिंदू याचा वापर करतात. नेपाळ संवत दिनदर्शिकेची निर्मिती यापासूनच झाली.

खरे तर ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे; पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. 

टॅग्स :IndiaभारतJara hatkeजरा हटके