चहा नाही मिळणार..!
By Admin | Updated: August 8, 2015 14:52 IST2015-08-08T14:52:02+5:302015-08-08T14:52:02+5:30
माणसाच्या मनामध्ये अनेक विचार अनेक वेळा, न सांगता, न विचारता, येत असतात. मग आपण काय करायचं? आपण आपल्या मनाचं दार उघडं ठेवायचं! बंद नाही करायचं! येऊ देत त्यांना! जात असतील तरी जाऊ देत! फक्त एक गोष्ट महत्त्वाची! आपल्या घरात असताना फक्त त्यांना सांगायचं.

चहा नाही मिळणार..!
>- धनंजय जोशी
माझ्या एका जवळच्या मित्रची गोष्ट!
नुकत्याच झालेल्या लॉस एंजेलिसमधल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाबद्दल!
माङया मित्रंची दोन सेशन्स होती. एका जरा गंभीर विषय होता (मृत्यूशी मैत्री कशी करावी?) आणि एक सर्वाच्या आवडीचा विषय - म्हणजे ‘योग-साधना आणि ध्यान-साधना’ यावरचा! माङया मित्रला खूप आनंद झाला होता कारण अशा विषयांवर फारसं लोकांना बोलायचं नसतं. पण अधिवेशनाच्या कार्यकत्र्यानी खूप धैर्य दाखवून दोन्ही कार्यक्रमांना वेळ दिली होती.
गंमत झाली ती अशी!
मित्रच्या पहिल्या कार्यक्रमाला जेमतेम पंधरा लोक आले, चार हजार लोकांपैकी! आणि दुस:या कार्यक्रमाला जेमतेम पंचवीस लोक आले, चार हजार लोकांपैकी!
मित्र खूप निराश होता. कारण त्याचे कोणीही ‘जीवश्चकंठश्च’ मित्र त्याच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. किंबहुना त्याला अनेकांनी विचारूनदेखील (अरे, तुझं सेशन किती वाजता आहे रे?) कोणी त्याच्या कार्यक्रमाला आले नाही!
माझा मित्र मला नंतर भेटला.
माङयाशी बोलला! निराश होता!
मला म्हणाला, ‘धनंजय, असं का? मला वाटतं असं वागणं हा एक प्रकारचा निरादर नाही का? की तू काय म्हणतोस त्याचं फारसं काही महत्त्व आम्हाला वाटत नाही? आम्ही जरा चांगली नाटय़संगीताची गाणी ऐकू.. तुझं आहे ते आहे. जेव्हा तुझी भेट होईल तेव्हा बघू!
मी त्याला म्हणालो, ‘अरे, ठीक आहे रे! मी तुला सान सा निमची शिकवण सांगितली, आठवतंय? डोंट चेक! ऊल्ल3 उँीू‘! म्हणजे इतरांच्या क्रियेबद्दल आपण न्याय देऊ नये! आता त्याहीपेक्षा आणखी एक शिकवण! ती म्हणजे माणसाच्या मनामध्ये अनेक विचार अनेक वेळा, न सांगता, न विचारता, येत असतात. मग आपण काय करायचं? आपण आपल्या मनाचं दार उघडं ठेवायचं! बंद नाही करायचं! येऊ देत त्यांना! आणि जात असतील तरी जाऊ देत त्यांना! फक्त एक गोष्ट महत्त्वाची! येऊ देत त्यांना, जाऊ देत त्यांना, तुङया घरामध्ये असताना फक्त त्यांना सांग, ‘‘मित्रहो, या आणि जा, चहा इथं नाही मिळणार! त्यांना दुसरीकडे जाऊ दे चहासाठी!’’
(अमेरिकेतील शिकागो या शहरात वास्तव्याला असणारे लेखक ङोन साधक/अभ्यासक आहेत.)
joshi5647@gmail.com