शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

अवनी वाघिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 6:02 PM

देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे...

ठळक मुद्देअवनी वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.

अविनाश साबापुरे‘जवरिक आमचे नातलग मरून राह्यले होते, तवरिक आमच्या बोंबलन्याले कोणी कवडीचा भाव नाई देल्ला. अन् आता थे वाघीण मारली तं एवढं चिल्लावाले काय झालं राजेहो...’ नरभक्षक वाघिणीच्या शिकारीनंतरची चर्चा ऐकून चिडलेल्या गावकऱ्यांच्या मनातली ही सणक आहे. मृत्यू हा वाईटच असतो, तो माणसाचा असो नाहीतर प्राण्याचा. ज्याच्या मरणाची चर्चा व्यापक प्रमाणात होते, त्याच्या जगण्याचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्याचे जगणे इतिहास बनतो. इतिहास भलाही असतो अन् बुराही असतो. राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब या तीन तालुक्यांतील खेडूत गावकऱ्यांसाठी अवनी वाघिण दु:खद इतिहास बनला आहे. तो जेवढा उगाळला जाईल, तेवढीच गावकऱ्यांची ठणक वाढणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाघिणीने धुमाकूळ घातला होता. ‘अवनी’चे नामाभिधान मिळालेल्या या वाघिणीमुळे २५-३० गावांचे शिवार अक्षरश: रक्ताळले होते. १३पेक्षा जादा माणसे त्याहून दुप्पट गायीढोरं वाघिणीचे शिकार झाले. त्यांचे ओरबाडलेले देह पाहणाऱ्या गावकऱ्यांना वाघिणीच्या पाऊलखुणाही भयावह वाटू लागल्या होत्या.झोटिंगधरा गावात वाघिणीने माणूस मारल्यावर भयग्रस्त गावकऱ्यांनी एसडीओंचे शासकीय वाहन पेटवून आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यानंतर प्रशासन आणि शासन हलले. २००पेक्षा जादा कर्मचारी जंगलात फिरवून ‘मिशन टी-१’ गतिमान करण्यात आले. तेव्हापासून जंगलात दडलेली वाघीण देशभरातील माध्यमांमधून वारंवार झळकू लागली.‘मिशन टी-१’मधील ताफ्यावर चोहोबाजूंनी ‘प्रेशर’ होते. वाघाला पकडण्याचे, बेशुद्ध करण्याचे, ठार मारण्याचे नियम पाळत पुढे आलेल्या वाघिणीला कसे ‘फेस’ करावे हा प्रश्न होता. वन्यजीवप्रेमींची नजर, गावकऱ्यांची आस अन् माध्यमांचा कटाक्ष ही सगळी कसरत पेलत असतानाच शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.पांढरकवडा, कळंब आणि राळेगाव या वाघग्रस्त तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये अक्षरश: पेढे वाटण्यात आले. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींनी सोशल मीडियातून वनविभागाला संशयाच्या शिखरावर उभे केले. वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य असतानाही तिला मारण्यातच आले, हा आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नामवंत वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ ही मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... अशा दुहेरी संरक्षकाच्या भूमिकेतल्या शासनाला आता वन्यजीवप्रेमींच्या आरोपांमुळे बचावात्मक पवित्र्यात यावे लागले आहे.पर्यावरण जपण्यासाठी सर्वच प्राण्यांप्रमाणे वाघांनाही जगविणे आवश्यक आहे. पण एखादा वाघ हजारो माणसांच्या जगण्याचा दुश्मन झाला असेल तर? वनविभागालाही अशावेळी वाघ की माणूस, यापैकी एकाला निवडणे आवश्यक होणारच. साहजिकच माणसांना प्राधान्य देण्यात आले. शिवाय वाघ आज आढळला आणि लगेच दुसºया दिवशी ठार मारला, असेही नाही. दोन वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला केवळ पकडण्यासाठीच ७०-८० दिवस मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडाही झाला.सारे उपाय हरल्यावरच वाघिणीला संपविण्यात आले. पण वन्यजीवप्रेमींचा आक्षेप कायम आहे. हे आक्षेप ऐकल्यावर वाघग्रस्त गावकऱ्यांचे म्हणणे एवढेच आहे, की वाघांची चिंता वाटणाऱ्यांनी तीन दिवस आमच्या गावात येऊन मुक्कामी राहावे. आताही या भागात वाघिणीचे दोन बछडे आणि एक वाघ फिरत असल्याची गावकऱ्यांना भीती आहे. त्या भीतीवर वन्यजीवप्रेमींनी काहीतरी उपाय सांगावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शहरात एखादवेळी चार वानरांची टोळी अंगणातले वाळवण उधळून लावते, दोरीवरचे कपडे उचलून नेते, तेव्हा शहरी माणसं अक्षरश: पिसाळून जातात. माकडांचा बंदोबस्त करा, म्हणून पेपरात बातम्या येतात. मग ३० खेड्यांमध्ये जर वाघ थेट माणसं मारत असेल, तर त्या गावकऱ्यांनी ओरडूही नये? वाघ मेला, डोक्यावरची मृत्यूची टांगती तलवार हटली म्हणून त्यांनी आनंद साजरा केला तर चुकले कुठे? चोर येऊ नये म्हणून दाराशी कुत्रा पाळणाऱ्यांना खेड्यातल्या माणसांपेक्षा वाघ महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी एकदा जरूर अशा खेड्यांमध्ये परिवारासह मुक्कामाला यावे, मृत्यूची भीती काय असते, ते एकदा अनुभवावे आणि माणसे की माणसाला मारणारे एक श्वापद, दोघांपैकी कोणाला मरू द्यावे याचा निर्णय घ्यावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे..(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीतउपसंपादक आहेत.)

manthan@lokmat.com