शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

बदलला दिवाळीचा फराळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 7:00 AM

गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता.

- अंकुश काकडे दिवाळी सुरू झाली, की ८ दिवस दिवाळी फराळ घरी करण्याची गडबड असे. रोज सर्व मंडळी फराळ करण्यात गुंतलेली असत आणि त्यावेळी फराळाचे जिन्नसही किती असायचे, बुंदीलाडू, रवालाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, अनारसे, मोठी शेव, तिखट शेव, पोह्याचा चिवडा, कडबोळे आणि हे सर्व पदार्थ घरातील महिला करीत. दिवसेंदिवस दिवाळीचे स्वरूपही बदलत गेले. घरातील एकत्र कुटुंबपद्धती कमी होत गेली. घरातील महिलादेखील कामानिमित्त बाहेर जाऊ लागल्या, त्यामुळे रेडिमेड फराळ सुरू झाला. तोदेखील पॅकेटमध्ये, तसेच घरोघरी फराळाला जाणे हेदेखील कमी होत गेले. आता दिवाळी झाल्यानंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक फराळ ही प्रथा सुरू झाली. अर्थात, त्यात राजकीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी, काही प्रमुख नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करतात. पण यावर्षी निवडणुका अर्थात होऊन गेल्या होत्या, त्यामुळे ती संख्या कमी होती. आता घरीदेखील नवीन तरुण पिढी पूर्वीसारखे दिवाळीच्या पदार्थांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या दिवाळी फराळाच्या पदार्थांची जागा आता मिसळपाव, मटार उसळ, बटाटेवडा-भजी, पाव ढोकळा, मसाला घावन, उत्तप्पा, वडा सांबार, इडली चटणी असे काही दाक्षिणात्य पदार्थदेखील पाहावयास मिळतात. अर्थात, दिवाळीचे पारंपरिक पदार्थदेखील ठेवलेले असतात. अहो एवढेच काय, पण... परवा आमच्या पक्षाच्या कोथरूडमधील एका कार्यकर्त्याने एका गार्डनमध्ये दिवाळी फराळ आयोजिला होता. तेथे फराळासाठी गेलो अन् मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेथे तर चक्क आॅम्लेट ब्रेड ठेवला होता आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी त्याच ठिकाणी होती. लाडू-करंजी घेताना कोणी दिसत नव्हते. शिवाय रविवार किंवा सुटीचा वार या फराळ कार्यक्रमासाठी निवडला जातो. तसेच एका दिवशी चार, पाच ठिकाणी फराळाचे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे डॉ. सतीश देसाई यांची आठवण सांगत होते, की फराळाचे आमंत्रण आल्यानंतर ते प्रथम विचारत काय मेनू आहे  आणि जेथे वेगळा व चांगला, चमचमीत मेनू असेल तेथेच जातात. मला मात्र सर्व ठिकाणी जाऊन थोडं थोडं घ्यावं लागतं. पण ह्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागला त्यामुळे काही ठिकाणी आनंद, तर काहींनी फराळाचे कार्यक्रमच आयोजिले नाहीत. गेल्या रविवारी सदाशिव पेठेतल्या एका माननीयांनी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. अर्थात, तो दिवाळी फराळ सदाशिव पेठेतला होता. त्यामुळे तो मर्यादित होता. पण कार्यकर्त्यांची मात्र त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. साहजिकच त्या ठिकाणी असलेले मिसळपाव संपले. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना फराळ मिळाला नाही, ते तेथेच जवळ असलेल्या गोपाळ हायस्कूलमध्ये एका माननीयांनी आयोजिलेल्या फराळाकडे वळले. पण पुण्यातील चित्र मात्र नेहमीप्रमाणे होते. निकाल काहीही लागला तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार या दिवाळी फराळात सहभागी झाल्याचे दिसले. (लेखक प्रसिद्ध राज

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी