बड्या लग्नसोहळ्यांच्या मांडवांत

By admin | Published: November 15, 2015 07:09 PM2015-11-15T19:09:54+5:302015-11-15T19:09:54+5:30

कोटय़वधी रुपयांच्या इव्हेण्टवाली लग्नं नेमकी होतात कशी? त्या लग्नात नेमकं घडतं काय? कसं? - त्याचीच ‘कहाणी’ सांगणारं एक वेगळं पुस्तक ‘द बिग इंडियन वेडिंग’!

Big wedding celebrations | बड्या लग्नसोहळ्यांच्या मांडवांत

बड्या लग्नसोहळ्यांच्या मांडवांत

Next

भारतातल्या हाय सोसायटीतली ऐश्वर्यसंपन्न, कोटय़वधी रुपयांच्या इव्हेण्टवाली लग्नं नेमकी होतात कशी? त्या लग्नात नेमकं घडतं काय? कसं? - त्याचीच ‘कहाणी’ सांगणारं एक  वेगळं पुस्तक ‘द बिग इंडियन वेडिंग’! सध्या गाजत असलेल्या या पुस्तकाच्या लेखिका साक्षी हरीश साळवे

यांच्याशी गप्पा.
------------------------
भारतीय समाजात विवाह संस्थेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व विवाह समारंभाला दिलं जातं. अगदी गरिबातला गरीब असला तरी आपल्या मुलामुलीच्या लग्नात तो कुवतीपेक्षाही अधिक खर्च करतो किंवा त्याला तो करावा लागतो. गरिबांची ही कथा तर श्रीमंताघरच्या लग्न समारंभाचा काय थाट! या वैभवी ‘बडय़ा’ लग्नसोहळ्यांबाबत प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होत असतं.
या सगळ्याचं व्यवस्थापन कसं काय केलं जातं, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मात्र श्रीमंताघरचा प्रत्येक व्यवहार ‘अंदर की बात’ असल्याने आपल्यासाठी ते एक रहस्यच राहतं. याच रहस्याचा भेद करणारं ‘द बिग इंडियन वेडिंग’ हे पुस्तक सध्या गाजतं आहे. समाजाच्या अत्यंत वरच्या वर्गातील घरांत डोकावून तेथील विवाहसोहळ्याचं चित्र रंगवणारं हे पुस्तक केवळ कुतूहलच क्षमवत नाही, तर अनेकांना ते मार्गदर्शकही ठरत आहे. साक्षी हरीश साळवे या तरु ण लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक. आपण या पुस्तकात एकूण लग्नांपैकी जेमतेम क्.क्1 टक्क्यांपेक्षाही कमी लग्नांचा समावेश करू शकलोय असं साक्षी सांगते. मात्र तिचं हे 144 पानी पुस्तक हातात घेतल्यानंतर वाचक एका वेगळ्याच जगात सफर करू लागतो.
भारतात रोज सरासरी 3क् हजार लग्न पार पडतात. त्यामुळे विवाह संस्थेशी व्यवसायाची नाळ जुळलेल्यांना मंदीची अजिबात फिकीर नसते. भारतातील विवाह उद्योगातील उलाढाल आज तीन कोटी 8क् लाख बिलीयन डॉलरच्या आसपास आहे. या अर्थकारणावरही साक्षीचं पुस्तक प्रकाशझोत टाकतं. या पुस्तकात 2क्क्क् शाही, हायफाय विवाहसोहळ्यांचा वेध घेतला आहे. भारतातील सामान्य वर्गातील विवाहसोहळ्यांचा सरासरी खर्च 19 लाखांच्या आसपास असतो, तर श्रीमंतांच्या लग्नसोहळ्याचं बजेट 5.59 कोटी रु पयांच्याही पलीकडे जातं! कारण बजेट हा शाही विवाह सोहळ्यांचा मुद्दा नसतोच. कित्येक लग्नांच्या एका पत्रिकेची किंमतच  दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असते! 
डेस्टिनेशन वेडिंग अर्थात एखाद्या पर्यटन स्थळी किंवा विशेष ठिकाणी जाऊन तेथे विवाह करण्याचा फंडा आता तेजीत आला आहे. या पुस्तकात साक्षीने भारतातील लग्नसोहळे आणि अमेरिकेतील विवाहसोहळ्यांतील समांतरपणाकडेही बोट दाखवले आहे. शाही विवाहसोहळ्यांचं वाढतं महत्त्व आणि त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळातही विवाह उद्योग क्षेत्रची होत असलेली भरभराट यांचा आढावा ‘द बिग इंडियन वेडिंग’मधून घेण्यात आला आहे. 
नवी दिल्लीत जन्मलेल्या, वाढलेल्या साक्षीने ब्रिटनच्या एक्स्टर विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर लंडनमधीलच एका प्रतिष्ठित फॅशन हाऊसमध्ये नोकरी केली. त्यानंतर यूबीएस, बार्कले येथेही तिने नोकरी केली. याच काळात तिला लेखन छंदाने झपाटले आणि लेखन क्षेत्रतच कारकीर्द करण्याचा निर्णय साक्षीने घेतला. त्यासाठी तिने न्यू यॉर्कविद्यापीठातून स्क्रि प्ट रायटिंगचा अभ्यासक्र म पूर्ण केला. आता लेखन आणि मनोरंजन क्षेत्रवरच पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा तिचा मानस आहे.
‘द बिग इंडियन वेडिंग’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे सुहेल सेठ गमतीने लिहितात, ‘काय विचित्र योगायोग आहे, या पुस्तकाची लेखिका आणि मी दोघंही अविवाहित आहोत. नातेसंबंधाच्या या विचित्र विश्वापासून दूर राहण्यामागचं तिचं कारण मला माहीत नाही. पण माझं कारण अतिशय साधं सरळ आहे. लग्नसोहळाच नको, तो समारोहच नको म्हणून मी आजवर लग्न केलं नाही. 
पण एक नक्की, लग्न करणं आणि टिकवणं हे या काळात कठीण होत चाललं आहे. त्यात लग्नसोहळ्यांची वाढती प्रतिष्ठा. पूर्वी जसं लोकांना दुष्काळ आवडायचा, त्यातून फायदे व्हायचे तसंच हल्ली या सोहळ्यांचं झालं आहे. 
साक्षीच्या या पुस्तकात भारतीय शाही विवाहसोहळ्यांमध्ये जे जे घडतं त्याचा इत्थंभूत तपशील देण्यात आला आहे. एक वेगळं जग, त्याचा वेगळा आलेख या पुस्तकात उलगडत जातो.’
सेठ यांनी म्हटल्याप्रमाणो साक्षीच्या पुस्तकातून खरोखरच भारतीय शाही विवाहसोहळ्यांतलं ऐश्वर्य, त्यातला हव्यास, हेवेदावे, आनंद आणि व्यथा हे सारं अत्यंत सुंदर रीतीनं उलगडत जातं. सोहळ्यापासून इव्हेण्टपर्यंतचा प्रवास, त्यातली हाव, दिखावेगिरी अतिशय समर्पकपणो या पुस्तकात येते.
खरंतर लग्न म्हणजे पतीपत्नीचे रेशमीबंध, साताजन्माच्या गाठी असा एक समज अजूनही आहे. पण आता त्याची जागा दिखाऊपणा आणि व्यवहाराने घेतली आहे. ते सारं जग समजून घेताना काय उलगडलं यासंदर्भात साक्षी हरीश साळवे यांनी लोकमत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीचा हा काही भाग..
 
= तू एक बँकर म्हणून सुरु वात केलीस, मग लाइफ स्टाइल स्टोअर चालवलंस. मग हॉटेल व्यवसायात उडी घेतलीस आणि आता अखेर तुला तुझा मार्ग सापडला असं वाटतंय का?
साक्षी : हो. मी बिझनेसमधून पदवी पूर्ण केली तेव्हा माङया वडिलांनी मला सांगितलं होतं की इतरही काही पर्याय तपासून बघ. म्हणजे तुला नक्की काय आवडतंय याचा अंदाज येईल. आपल्या हाती लेखनकौशल्य आहे, याचा तोवर मला काही अंदाजही नव्हता. मी लेखन करू शकते असा विचार कधीच केला नव्हता. त्यावेळी मी करिअर समुपदेशकांचीही मदत घेतली. त्यांनी मला पीआर क्षेत्रत करिअर करण्याचा सल्ला दिला. मी लंडनमध्ये तीन वर्षे नोकरी केली. तिथेही माङया बॉसने तू पब्लिक रिलेशनमध्ये मास्टर्स कर असा सल्ला दिला.
मग मी बोस्टनला गेलेदेखील. तिथे गेल्यावर मला प्रश्न पडला की दुस:याचा पीआर आपण का करायचा? उलट आपला पीआर कुणीतरी करावा असं काहीतरी काम करू. आणि मग वाटलं आपण का लिहू नये? लिहिण्यानं जो आनंद मला मिळाला त्यातून लक्षात आलं की, ही कला आपल्यात आहे!
= पहिल्या पुस्तकासाठी हाच विषय का निवडला?
साक्षी : पहिली गोष्ट म्हणजे लग्न हे आपलं एक राष्ट्रीय वेड आहे. लग्न ठरलं म्हटलं की सगळ्यांनाच काय आनंदाचं भरतं येतं. आणि दुसरं म्हणजे हा विषय मला मनापासून खुणावत होता.
2क्13 मध्ये मी माङया आठ जवळच्या मित्रमैत्रिणींची लागोपाठ लग्न अॅटेण्ड केली. तेथे मी पाहुणी नव्हती, तर लग्न समारंभातील प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता. माङयावर मनोरंजनाची जबाबदारी होती. वेडिंग प्लॅनिंगचा तो एक भाग होता. वधु-वरांचं, त्यांच्या पाहुण्यांचं मनोरंजन करण्याचं आव्हान माङयासमोर होतं. त्यासाठीची स्क्रिप्ट लिहिताना मला माङयातल्या लेखिकेची जाणीव झाली. 
आपल्या लिखाणाने लोकांची करमणूक होऊ शकते, आपण मस्त लिहितोय याची जाणीव तेव्हा झाली आणि तेव्हाच असं वाटलं की या लग्नांविषयी का लिहू नये?  या सोहळ्यामध्ये लोक ज्या पद्धतीने खर्च करतात त्यानं डोळेच पांढरे होतात.
 
 
= आपल्या करिअरची वाट सापडली असं आता  वाटतं का?
साक्षी : सध्या दुस:या पुस्तकाचं काम करतेय. पुढच्या सप्टेंबरपर्यंत ते प्रकाशित होईल. काम सुरू झालंय हे खरं!
= या पुस्तकाच्या प्रवासात काही वेगळं हाती लागलं? काही वेगळा अनुभव.
साक्षी : खरं सांगते, मी पाहिलेला प्रत्येक लग्नसोहळा, त्याची गोष्ट, त्यातला अनुभव आणि त्याची त:हा हे सारंच वेगळं होतं.  
हा संपूर्ण अनुभवच मला समृद्ध करणारा आहे. पुस्तकाला लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. अर्थात थोडीफार टीकाही होतेय. पण पहिलंच पुस्तक, लेखनाचा अनुभव कमी. त्यामुळे टीका होण्यातही काही गैर नाही. 
एक नक्की, लोकांकडून मिळणारी कौतुकाची थाप, पुस्तक आवडलं असण्याचा प्रतिसाद यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय. 
याहून चांगलं लिहिण्याचा, वाचकांसमोर वेगळं जग उत्तम रीतीनं उलगडण्याचा मी नक्की प्रयत्न करीन!
 
मुलाखत आणि शब्दांकन 
- हरीश गुप्ता

Web Title: Big wedding celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.