चंद्रावर जाऊन या फक्त १० दिवसांत! उघडले पर्यटनाचे दरवाजे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:16 IST2026-04-12T11:15:33+5:302026-04-12T11:16:49+5:30

Artemis II News: नासाने चंद्रावर अपोलो मोहिमेच्या माध्यमातून अनेक मोहिमा केल्या. त्यातील अपोलो ११ ही सर्वाधिक चांगली मानव मोहिम होती, ज्यात जगात प्रथमच मानव चंद्रावर उतरला. परंतु, त्यानंतर अनेक वर्षे अमेरिका चंद्रावर गेली नाही आणि भारतासह इतर अनेक देश चंद्रावर यान पाठविण्याचा प्रयत्न करू लागले.

Artemis II : Go to the moon in just 10 days! The doors of tourism have opened!! | चंद्रावर जाऊन या फक्त १० दिवसांत! उघडले पर्यटनाचे दरवाजे!!

चंद्रावर जाऊन या फक्त १० दिवसांत! उघडले पर्यटनाचे दरवाजे!!

- प्रा. सुरेश चोपणे
नासानेचंद्रावर अपोलो मोहिमेच्या माध्यमातून अनेक मोहिमा केल्या. त्यातील अपोलो ११ ही सर्वाधिक चांगली मानव मोहिम होती, ज्यात जगात प्रथमच मानव चंद्रावर उतरला. परंतु, त्यानंतर अनेक वर्षे अमेरिका चंद्रावर गेली नाही आणि भारतासह इतर अनेक देश चंद्रावर यान पाठविण्याचा प्रयत्न करू लागले. कित्येक वर्षांनंतर नासाने २०२६ मध्ये एक अवकाशयान सोडण्याचा प्रयत्न केला. कदाचित अलीकडे अवकाश पर्यटनाची जगाची इच्छा असल्याने आर्टेमिस २ हे अवकाश पर्यटनाची संधी मिळवून देणार नाही, असे माझे मत आहे.

१ एप्रिल रोजी नासाचे आर्टेमिस २ नावाचे अवकाशयान ४ अवकाशयात्रींच्या सान्निध्यात चंद्रप्रवासाला निघाले. त्यांत रीड वाईसमन, विक्टर ग्लोव्हर, ख्रिस्तीना कोच आणि जेरेमी हॅन्सेन या ४ अवकाशयात्रींचा समावेश होता. खरं तर ही मानवी उतरणीची मोहीम नव्हती; केवळ पृथ्वी आणि विशेषतः चंद्र प्रदक्षिणा होती. त्याला फ्लाय-बाय मिशन म्हणतात. दहा  दिवसांच्या कालावधीची ही मोहीम होती. १९७२ नंतरची ही दुसरी चांद्रमोहीम होती. ही पहिली अशी मोहीम होती ज्यात ४ अवकाश संशोधक व वैमानिकांनी दूरच्या अवकाशाच्या आत आणि बाहेरून अभ्यास, पृथ्वी आणि चंद्र भ्रमण केले.

आर्टेमिस २ मोहिमेचा भारताला फायदा मिळणार
अवकाश क्षेत्राच्या दृष्टीने ही आर्टेमिस मोहीम खूप महत्त्वाची होती. अवकाशयात्रींनी लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरून पृथ्वीची पाहणी आणि अभ्यास केला. मंगळाकडे प्रत्यक्ष अभ्यास करत जाण्याची संधी मिळाली. पृथ्वीची अदृश्य बाजू अंतराळवीरांना पाहता आली. आपण पृथ्वीवरून चंद्रग्रहण पाहतो, त्याच वेळी त्यांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली.
भारत सरकारने उशिरा का होईना, चंद्रयान मोहिमेची अतिशय सक्षमतेने सुरुवात केलेली आहे. आपण आजपर्यंत चंद्रावर मानवी मोहीम करू शकलो नाही. येत्या २०३० पर्यंत भारत चंद्रावर निश्चितच पोहोचेल. यामुळे पृथ्वीच्या बाह्य आवरणाचा, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कावर्षावांचा, चंद्रावरील खडक, खनिजे, आवरण, विवरे, पाणी, बर्फ, ग्रहणे अशा विविध वैज्ञानिक बाबी समजून घेण्यात आणि गोळा करण्यात नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेचा भारताला फायदा मिळणार आहे.

वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनाही अनेक फायदे 
विशेष म्हणजे आर्टेमिस २ चे वीर अगदी पर्यटनाच्या पद्धतीने गेले आणि आले, हे नक्की. म्हणूनच या मोहिमेद्वारे जागतिक अवकाश क्षेत्राचा आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे. विज्ञान, भूशास्त्र, वातावरण, खनिजे ही जरी मोहिमेची उद्दिष्टे असली तरी माझ्या मते अवकाश पर्यटन हा सुद्धा मोठा उद्देश आहे.
या मोहिमेच्या आधारे भारतीय इस्रो संस्थेला फार मोठा फायदा मिळणार असून पुढे मानवी मोहीम पाठविण्यासाठी मदत होणार आहे. भारताने गेल्या दोन दशकांत अंतरिक्ष मोहिमेसाठी खूप चांगले प्रयत्न केले.
२००८ मध्ये पहिली चंद्र मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली आणि अचानक देशाचे नाव जगभर प्रसिद्ध झाले. भारताने पहिल्याच मोहिमेत चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध केले आणि नासासह सर्व देशांनी इस्रो या भारतीय अवकाश संस्थेची दखल घेतली. 

चंद्राचे विशेष प्रेम..
२०१९ मध्ये इस्रोने चंद्रावर उतरणारे यान पाठविले, परंतु त्याचे उतरणारे उपकरण पडले. यात थोडीशी असफलता मिळाली असली तरीही एकूण प्रयत्न यशस्वी ठरले. 
२०२३ मध्ये पुन्हा तिसरे चंद्रयान यशस्वीरीत्या पाठविले आणि चंद्रावर उतरले सुद्धा. देशाची ही पहिलीच यशस्वी चंद्रमोहीम ठरली.
२०२८ मध्ये चंद्रयान ४ ची तयारी सुरू आहे. ती चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणण्याची मोहीम असणार आहे. यानंतर मात्र भारत चंद्रयान ५ ही मानवी मोहीम राबविणार आहे. 

चंद्रयान ६ ही संपूर्ण मानव चंद्र मोहीम असणार आहे.
अशा मोहिमा सुरू राहिल्या तर विज्ञान क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन निश्चित बदलेल. पृथ्वीवर उद्योग आणि विकास प्रक्रिया खूप पुढे गेली असली तरी अजून अवकाश संशोधन, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात आपण खूप मागे आहोत. त्यामुळे विविध विषयांवर संशोधन होण्यासाठी अशा मोहिमा अत्यावश्यक आहेत.
म्हणूनच भविष्यात आर्टेमिसच्या पुढील मोहिमांचे आगळे-वेगळे फायदे सर्व देशांना मिळतील. त्यात पृथ्वी आणि चंद्राचा अभ्यास, विविध घडामोडी, विज्ञान आणि पर्यटन क्षेत्रातील विविध फायद्यांचा समावेश असणार आहे. भारत आज अशा मोहिमा करण्यात मागे नाही. परंतु नासाच्या आर्टेमिससारख्या योजनांचा देशाला निश्चितच 
फायदा होईल. 
पृथ्वीचा व्यास साधारणतः १२,७५६ किमी 

Web Title : सिर्फ 10 दिनों में चाँद की सैर! पर्यटन के दरवाजे खुले!!

Web Summary : नासा के आर्टेमिस II मिशन से भारत के अंतरिक्ष कार्यक्रम को लाभ। यह भविष्य के चंद्र मिशनों, चंद्र घटनाओं को समझने और संभावित अंतरिक्ष पर्यटन को बढ़ावा देगा, वैज्ञानिक उन्नति को बढ़ावा देगा।

Web Title : Moon tourism opens in 10 days! Doors to space open!

Web Summary : NASA's Artemis II mission benefits India's space program. It aids future lunar missions, understanding lunar phenomena, and potential space tourism, boosting scientific advancement.