शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

विमानतळ की एसटी स्टँड?

By मनोज गडनीस | Published: January 28, 2024 12:27 PM

Airport: नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते.

- मनोज गडनीस नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते. हे असे का घडले व देशातील विमान प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात काय घडू शकते, याचा वेध घेणारा हा सारांश.

देशात गेल्या दहा वर्षांत ७५ नवी विमानतळे उभारली गेली आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील भारतीय कंपन्यांचा विस्तार झाला आहे. विमान कंपन्यांनी देखील नव्या विमानांची मोठी खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचसोबत दुसरीकडे हवाई मार्गे जोडणी वाढल्यामुळे वेळेच्या बचतीसाठी अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे दर देखील स्पर्धात्मक आहेत. परिणामी लोकांना विमान प्रवास काहीसा परवडत आहे.

 विमान कंपन्या सध्या विस्तार करण्याच्या मागे आहेत. आगामी दहा वर्षांत विमान कंपन्यांच्या ताफ्यात एक हजारापेक्षा जास्त विमाने दाखल होतील. त्याअनुषंगाने विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे. अनेक विमान कंपन्यांचे कर्मचारी हे नवीन अथवा कमी अनुभवी आहेत.  त्यामुळे जेव्हा एखाद्या विमानाला अनेक तासांचा विलंब होतो किंवा ते रद्द होते, तेव्हा ती परिस्थिती हाताळण्यासाठी वर्गात दिलेले प्रशिक्षण कामी येते असे नाही. 

विमान कंपन्यांचे काय चुकले?तर तिथे मानवी भावना लक्षात घेत आणि आपण सेवा क्षेत्रात काम करीत असल्याचे नीट उमजून परिस्थिती हाताळावी लागते; मात्र अलीकडे झालेल्या घटनांमध्ये याच दोन गोष्टींचा विसर विमान कर्मचाऱ्यांना पडल्यामुळे तणावाचे आणि क्वचित मारहाणीचे प्रसंग घडल्याचे विश्लेषण हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ राहुल मेहता यांनी केले. 

विमानांद्वारे गेल्या वर्षभरात कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक झाली आहे. दिवसागणिक प्रवाशांची वाढणारी संख्या आणि विमानांची अपुरी संख्या हे गणित व्यस्त प्रमाणात आहे. परिणामी, विमानांना विलंब आणि प्रवाशांचा उद्रेक होताना दिसत आहे.  

अलीकडच्या काळात पहिल्यांदा आणि नव्याने विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतुकीच्या इतर माध्यमांच्या तुलनेत विमानाच्या प्रवासाचे तिकीट नेहमीच महाग असते. त्यात विमानतळावर गेल्यावर तेथील पंचतारांकित सुविधा पाहून देखील नवखे प्रवासी भारावून जातात. आपल्या पैशांनुसार वागणूक ही त्यांची किमान अपेक्षा असते. ग्राहक म्हणून त्यात काही चूक नाही. मात्र, अलीकडच्या काळात विमान वाहतुकीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे विमानतळावर विमानाच्या पार्किंगची व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे विमानांना जागा होईपर्यंत हवेत घिरट्या घालाव्या लागत आहेत. परिणामी, विमानांना विलंब होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यातच अलीकडच्या काळात हिवाळ्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील काही विमानांना दाट धुक्यामुळे धावपट्टीवर उतरता आले नाही. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ