टायर फुटल्याने कार उलटली, सुदैवाने कार चालक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 00:15 IST2022-08-17T00:13:02+5:302022-08-17T00:15:16+5:30
मंगळवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टायर फुटण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

टायर फुटल्याने कार उलटली, सुदैवाने कार चालक बचावला
उरण : जेएनपीए-उरणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने कार रस्त्यावरच उलटी. या अपघातात कारचालक अंकुश म्हात्रे (रा. सावरखार-उरण) यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी दिली.
मंगळवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. टायर फुटण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वाहन चालकांनी आपले वाहन चालविताना खबरदारी घेऊन नियमित वाहनांची तपासणी करावी.टायरमधील हवा चेक करावी तसेच मोबाईलवर बोलणे टाळून शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी यानिमित्ताने केले आहे.