मालेगाव : एमआयएमबरोबर जाण्याची तयारी दर्शवित मालेगावमध्ये काँग्रेसचा नवा प्रयोग अल्पावधीतच संपुष्टात आला. आता महाविकास आघाडीबरोबर काँग्रेसची चर्चा सुरू झाली असून दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होण्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी काँग्रेसने नऊ जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीचे सूत्र जमले नाही तर ६४ जागांवर उमेवार उभे करण्याची तयारी देखील काँग्रेसने तयारी केली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
महानगरपालिका जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटला शह देण्यासाठी केली जाणारी काँग्रेस एमआयएम युती फिस्कटल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी देखील प्रसिद्ध केली असून एकाच घरातील तिघांचा समावेश करण्यात आला आहे.
मालेगावमधील राजकीय घडामोडी दिवसेंदिवस बदलण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व एमआयएम यांची युती होणार असल्याचे दोन्ही बाजूने घोषित करण्यात आले होते. त्यासाठी त्यांच्यातील चर्चा सुरू होऊन लवकरच युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे बोलले जात असताना नवा ट्रिस्ट आला आहे. युती होण्यापूर्वीच दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेस आघाडीसाठी आग्रही असतांनाही अंतिम निर्णय होण्यापूर्वीच आपले काही उमेदवारही निश्चित करून काही प्रभागांचा दावा मजबूत केला आहे.
मनपा निवडणूक २०२६
काँग्रेसचे ९ उमेदवार
प्रभाग २ - महमंद यासीन शकील अहमद
प्रभाग ३ - आफरीन परविन शेख
प्रभाग ७ - रशिदा अय्युब अब्दुल कय्युम
प्रभाग १७ - अशरफ अली नबी सरवर
प्रभाग १८ - एजाज बैग अजीत बेग (पुरुष). रियाज बेग (पुरुष), यास्मीन बेग एजाज बेग
प्रभाग २० - अब्दुल अहात कलीमउद्दीन
प्रभाग २१ - तस्लीमा जैनु पठाण
बेग यांच्या कुटुंबातील तिघे
ही युती फिस्कटल्याने काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीस सामोरे जाणार आहे. त्यांच्यात अद्याप जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नसला तरी शहराध्यक्ष बंग यांनी काँग्रेसच्या ९ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली असून पुर्व भागातील प्रभागांचा समावेश आहे. या यादीत बेग यांच्या घरातील तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यात स्वतः बेग यांच्याबरोबरच त्याची पत्नी व लहान भावाचा समावेश आहे. त्यामुळे या यादीवर घराणेशाहीचा आरोप होत आहे.
प्रदेशाध्यक्षांचे आदेश : एमआयएम, मनसे नको
मालेगामध्ये एमआयएम बरोबर काँग्रेसची बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएम व मनसे यांच्याशी निवडणूक युती करू नये असे आदेश दिले आहेत. त्या आदेशामुळे स्थानिक पातळीवर होणारी ही युती होण्यापूर्वीच फिस्कटली आहे. दुसरीकडे काँग्रेसने येथील पूर्व भागातील ६४ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शहराध्यक्ष एजाज बेग यांनी दिली आहे. तूर्तास त्यांनी पूर्व भागावर लक्ष केंद्रित केले असून आगामी काळात पश्चिम भागातील उमेदवार निश्चित करण्याचे धोरण आखले आहे. त्यात पश्चिम भागातून आतापर्यंत दोघेजण निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. तर दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती बेग यांनी दिली आहे.
Web Summary : Congress in Malegaon explores contesting independently after MIM alliance collapses. MVA talks ongoing; nine candidates announced. Congress prepares to contest all 64 seats if alliance fails. Family members included in candidates list.
Web Summary : मालेगांव में कांग्रेस एमआईएम गठबंधन टूटने के बाद अकेले चुनाव लड़ने पर विचार कर रही है। एमवीए के साथ बातचीत जारी; नौ उम्मीदवारों की घोषणा। गठबंधन विफल होने पर कांग्रेस सभी 64 सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी में है। उम्मीदवारों की सूची में परिवार के सदस्य शामिल।