चांदवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे भूषण कासलीवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी सोमवारी (दि. १२) चांदवड तहसील कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात निवडणूक पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून वैभव विजय बागुल यांनी काम पाहिले.
उपनगराध्यक्षपदासाठी भूषण जयचंद कासलीवाल यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यांच्या नामनिर्देशनास नगरसेवक राहुल कोतवाल यांनी सूचक, तर नयना वाघ यांनी अनुमोदक म्हणून सहमती दिली. अन्य कोणतेही नामनिर्देशन न आल्याने पीठासीन अधिकारी वैभव बागुल यांनी भूषण जयचंद कासलीवाल यांची चांदवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित केली. याप्रसंगी नगरसेवक प्रियंका राऊत, सुधीर कबाडे, मंगल मोरे, राजू बागवान, प्रसाद सोनवणे, नयना वाघ, संदीप उगले, पल्लवी मोरे, मनीषा भालेराव, जीवन देशमुख, राजश्री प्रजापत, कमल जाधव, राहुल कोतवाल, अनिता बडोदे, महेंद्र गांधीमुथा, प्रदीप बनकर, सरला अग्रवाल, संभाजी गुंजाळ, लीलाबाई कोतवाल आदी उपस्थित होते.
तसेच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, मनोज शिंदे, योगेश ढोमसे, बाळासाहेब कासलीवाल, वर्धमान पांडे, सचिन राऊत, किरण वाघ, अनिल कोतवाल, आकाश बडोदे, जितेंद्र डुंगरवाल, रिजवान बागवान, गणेश खैरनार, सुनील मोरे, मुन्ना मोरे, संयम आचलिया, सुनील डुंगरवाल, रामजी जाधव, सागर बर्वे, नितीन अग्रवाल, महेंद्र कर्डिले, दीपक शिरसाठ, निखिल राऊत, नीलेश ढगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आदित्य मुरकुटे, लिपिक संजय क्षीरसागर, संगणक अभियंता गौरव जोपळे उपस्थित होते. चांदवड नगरपरिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड दोन दिवसानंतर होणार असून, त्यासाठी भाजपाकडून बरीच नावे आल्याची माहिती आहे. त्यावर एकमताने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नावे जातील व त्यानंतर नियुक्ती केली जाणार आहे.
येवला उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड
येवला : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी (अजित पवार)-भाजपच्या वतीने अमजद शेख, समीर समदडीया, तर शिंदेसेना - राष्ट्रवादी (शरद पवार) च्या वतीने रूपेश दराडे यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षातील कुणीही यावेळी हजर नसल्याने नगरपालिका सभागृहात विरोधकांनी बहिष्कारास्त्र काढल्याची चर्चा शहरात रंगली होती.
पिंपळगाव बसवंतला सतीश मोरे उपनगराध्यक्ष
पिंपळगाव ब.: नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सतीश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निर्णायक अधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
Web Summary : Bhushan Kasliwal elected Chandwad's Deputy Mayor unopposed. Yeola saw Pushpa Gaikwad's unopposed election. Satish More became Pimplegaon Baswant's Deputy Mayor similarly. Elections held smoothly.
Web Summary : भूषण कासलीवाल चांदवड के उप महापौर निर्विरोध चुने गए। येवला में पुष्पा गायकवाड़ का निर्विरोध चुनाव हुआ। सतीश मोरे पिंपलगांव बसवंत के उप महापौर बने। चुनाव शांतिपूर्वक संपन्न।