शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:47 IST

विद्यार्थी शिकतात अन् एकमेकांनाही शिकवतात 

लंडन/पुणे/नाशिक : ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉइस ॲवार्ड’साठी निवड केली. हा पुरस्कार कोविडकाळात ज्या शाळांनी सर्वोत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला अशा शाळांना दिला जातो. 

आदिवासीबहुल खेड तालुक्यातल्या या शाळेत विद्यार्थ्यांना विषयानुकूल अभ्यासक्रम शिकवला जातो.  विद्यार्थी   एकमेकांनाही शिकवतात. येथील शिक्षक दत्तात्रय वारे यांनी सांगितले की, या पुरस्कारामुळे आमच्या शाळेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. अत्यंत दुर्गम असलेल्या जालिंदरनगरच्या या शाळेत २०२२ साली केवळ तीन विद्यार्थी होते. कमी पटसंख्या असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण दोन वर्षांत या शाळेने  परिवर्तन घडून आणले. दत्तात्रय वारे यांनी हे परिवर्तन केवळ पायाभूत पातळीवर झाले नाही, तर शैक्षणिक स्तरावरही हा बदल घडून आल्याचे सांगितले. 

५० शाळांमधून झाली निवडजालिंदरनगरमधील या जिल्हा परिषद शाळेची निवड ही ५० शाळांच्या यादीमधून करण्यात आली आहे.  या शाळेला पुरस्कार देण्यासाठी सर्वाधिक मतदान मिळाले. ‘टी४ एज्युकेशन’ संस्था जगभरातील सुमारे १०० देशांमधील दोन लाख शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत आहे. 

अबुधाबी येथे वितरणटी फोर एज्युकेशन संस्थेच्यावतीने १५ आणि १६ नोव्हेंबरला अबुधाबी येथे वर्ल्ड स्कूल समिट होणार असून, त्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. ते स्वीकारण्यासाठी दत्तात्रय वारे यांच्यासह शिक्षक जाणार आहेत.

पुरस्काराच्या पाच श्रेणी संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार सामाजिक सहकार्य, पर्यावरण कृती, सर्जनशीलता, आपत्तीत उल्लेखनीय कार्य व आरोग्य साहाय्य अशा पाच श्रेणींमध्ये दिला जातो.   

देशाबरोबरच प्रगत देशातील शासकीय व खासगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे टाकत ही सरकारी शाळा या पातळीवर पोहोचली. सरकारी शाळांची क्षमता सिद्ध करणारी  ही घटना आहे. आगामी काळात राज्यातील सर्वच शाळा या दिशेने मार्गक्रमण करतील.दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

शाळेला मिळालेला पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत.गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra School Wins UK Award for Transforming Tribal Education

Web Summary : Pune's Zilla Parishad school wins 'Worlds Best School Prize' for its transformative work in a tribal area. Overcoming challenges, including low enrollment, the school revolutionized education, earning international recognition and a substantial award to be presented in Abu Dhabi.
टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक