महाराष्ट्राज स्टायलिश अवॉर्ड् आज ‘झी मराठी’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 11:15 IST2017-12-31T11:14:06+5:302017-12-31T11:15:12+5:30

मुंबई : मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साई इस्टेट कन्सल्टंट प्रेझेंट्स ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चा देदीप्यमान सोहळा रविवारी दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

At the Zee Marathi 'Maharashtra's stylish appearance today | महाराष्ट्राज स्टायलिश अवॉर्ड् आज ‘झी मराठी’वर

महाराष्ट्राज स्टायलिश अवॉर्ड् आज ‘झी मराठी’वर

मुंबई : मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साई इस्टेट कन्सल्टंट प्रेझेंट्स ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चा देदीप्यमान सोहळा रविवारी दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाम मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षाची भेट म्हणून ‘झी मराठी’वर या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.
या सोहळ्याला मुख्यंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, भूषण प्रधान, क्रांती रेडकर, ऊर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर आदी मराठी सेलिब्रिटींसह सिद्धार्थ मल्होत्रा, काजोल, जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, सुशांत सिंग - राजपुत, चेतन भगत या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
>या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात आलिया भट्ट, करण जोहर यांना स्टालयिश अवॉर्ड्सने गौरविण्यातही आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात आलिया भट्ट ‘राधा..’च्या गाण्यावर थिरकली आहे तर मनीष पॉलच्या निवेदनानेही उपस्थितांचे मन जिंकले.

Web Title: At the Zee Marathi 'Maharashtra's stylish appearance today

टॅग्स :Mumbaiमुंबई