शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात थोडक्यात टळला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 13:53 IST

कोल्हापुरातील शिवशाहू महाविद्यालयातील कार्यक्रमादरम्यान घडला प्रकार

कोल्हापूर: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमातील अपघात थोडक्यात टळला आहे. आदित्य ठाकरे शाळेच्या मैदानात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देत असताना कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक उडाला. आदित्य यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. काही खांब कोसळल्यानं थोडा वेळ गोंधळदेखील उडाला. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला.कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिंनीसाठी आयोजित करण्यात स्वसंरक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. शिवशाहू महाविद्यालयातील या शिबिराला जवळपास 2 हजार विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शिबिरासाठी महाविद्यालयाच्या आवारात मंडप उभारण्यात आला होता. आदित्य विद्यार्थिनींना व्यासपीठावरुन स्वसंरक्षणाचे धडे देत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे काही खांब कोसळले आणि मंडप उडाला. यानंतर एकच गोंधळ उडाला आणि घबराट निर्माण झाली. मात्र थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. खांब कोसळून मंडप उडाल्यानं विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. मात्र आदित्य ठाकरेंनी मिश्किल भाष्य करत परिस्थिती हाताळली. 'मीच जादूनं हा मंडप वर नेला होती. मला तुम्हा सगळ्यांची रिअॅक्शन पाहायची होती', अशी मिश्किल टिप्पणी आदित्य यांनी केली. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या कार्यक्रमानंतर आदित्य पुढील कार्यक्रमांसाठी निघाले. याआधी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या गाडीचा टायर फुटला होता. सुदैवानं त्यावेळी मोठा अपघात टळला होता. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरAccidentअपघात