कल्याणचा युसूफ शेख ‘इसीस’च्या संपर्कात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:32 IST2017-10-06T05:31:58+5:302017-10-06T05:32:13+5:30

वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरु ण युसूफ शेख हा इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Yusuf Shaikh of Kalyan in contact with Isis? | कल्याणचा युसूफ शेख ‘इसीस’च्या संपर्कात ?

कल्याणचा युसूफ शेख ‘इसीस’च्या संपर्कात ?

कल्याण : वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरु ण युसूफ शेख हा इसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
युसूफ हा ११ मे २०१६ ला बेपत्ता आहे. त्याला नमाजपठणाचे वेड होते. तसेच तो स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त असल्याने उपचारही सुरू होते. तो बेपत्ता होण्यापूर्वी त्याला एका व्यक्तीचा सारखा फोन यायचा. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याला येणारे फोनही बंद झाल्याची माहिती मिळत आहे. युसूफ बेपत्ता झाल्यावर आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथून एका व्यक्तीचा फोन त्याच्या कुटुंबीयांना आला. त्यात तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले. ही माहिती कुटुंबीयांनी पोलिसांनाही दिली. त्या फोन नंबरवरून पोलीस नेल्लोर येथेही गेले. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. युसूफ हरवल्यापासून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी त्याच्या आईने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

Web Title: Yusuf Shaikh of Kalyan in contact with Isis?