धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:18 PM2018-08-12T16:18:12+5:302018-08-12T16:19:56+5:30

धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Youth suicide due to Dhangar community reservation | धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

Next

सेलू (परभणी): धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  या युवकाने  १२ आॅगस्ट रोजी १ वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्टपासून समाजबांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच गोमेवाकडी येथील योगेश राधाकिशन कारके (२०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोमेवाकडी येथील कार्यकर्ते रविवारी सेलू येथे आरक्षणाच्या बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच योगेश याने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा सुरू केला आहे. 

मोबाईलवर आढळला मॅसेज
योगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून बी. शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स मॅसेज लिहिला होता. त्यात धनगर आरक्षणासाठी मी जीव देत आहे, असे म्हटले आहे. मात्र रेंजच्या कारणावरून हा मॅसेज सेंट झाला नसावा, अशी माहिती बीट जमादार चवरे यांनी दिली.

Web Title: Youth suicide due to Dhangar community reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.