वर्धा नदीत पोहायला गेलेला युवक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 21:02 IST2021-03-07T21:01:13+5:302021-03-07T21:02:46+5:30

वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा घाटावरील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेला एक युवक बेपत्ता झाला.

Youth goes missing after swimming in Wardha river | वर्धा नदीत पोहायला गेलेला युवक बेपत्ता

वर्धा नदीत पोहायला गेलेला युवक बेपत्ता

नांदेपेरा (यवतमाळ) : वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा घाटावरील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेला एक युवक बेपत्ता झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.गणेश गजानन पेंदोर (२६) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश हा रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या तीन मित्रासह भुरकी-रांगणा घाटावरील वर्धा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला. यावेळी पोहतापोहता अचानक गणेश तेथून बेपत्ता झाला. त्याच्या मित्रांनी यावेळी त्याचा शोध घेतला. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोधकार्य सुरूच होते.

Web Title: Youth goes missing after swimming in Wardha river