टँकरच्या धडकेत तरुण ठार
By Admin | Updated: July 1, 2017 02:53 IST2017-07-01T02:53:37+5:302017-07-01T02:53:37+5:30
सुकापूर येथे एका टँकरने दिलेल्या धडकेत, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३०च्या सुमारास घडली

टँकरच्या धडकेत तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सुकापूर येथे एका टँकरने दिलेल्या धडकेत, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३०च्या सुमारास घडली असून, मृत व्यक्तीचे नाव मुकेश लालजी यादव (२१) आहे. मुकेश हा सायकल घेऊन पनवेलच्या दिशेने जात होता. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या टँकरने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.