शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
2
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
3
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
4
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
5
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
6
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
7
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
8
'मी कधीच पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलो नाही', PM मोदी अन् अडवाणींच्या कौतुकावर थरुर म्हणाले...
9
रेल्वे रुळांना वर्षानुवर्षे गंज का लागत नाही? तुम्हाला माहितेय का? त्यामागं दडलंय खास कारण!
10
सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
11
"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
12
बँकेच्या लॉकरमधून २६ तोळे सोनं काढलं, चुकून दुसऱ्याच्या डिक्कीत ठेवलं, पुढं असं घडलं की...
13
आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली
14
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
15
तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
16
सारा तेंडुलकरने पापाराझीला पाहून पटकन तोंड का लपवलं? VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर रंगली चर्चा
17
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
18
‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
19
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
20
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:30 IST

Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात ओवेसींची तोफ धडाडली. नवनीत राणा यांच्या 'चार मुलांच्या' आवाहनावर ओवेसींनी बोचरी टीका केली असून अजित पवारांवरही निशाणा साधला आहे.

अमरावती: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राष्ट्रीय नेत्यांच्या एन्ट्रीने राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज अमरावतीत जाहीर सभा घेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय?" अशा शब्दात त्यांनी राणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदूंना आवाहन केले होते की, "जर ते १९ मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत." राणांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच विधानाचा धागा पकडून ओवेसींनी अमरावतीच्या सभेत पलटवार केला.

ओवेसींचा नवनीत राणांवर निशाणासभेत बोलताना ओवेसी म्हणाले, "मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात ४ मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात." त्यांनी पुढे जोडले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांनी जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात आहे.

अजित पवारांवरही बोचरी टीकाओवेसींनी आपल्या भाषणात महायुतीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. "जे आपल्या काकांचे (शरद पवार) झाले नाहीत, ते तुमचे काय होणार?" असा सवाल त्यांनी मतदारांना केला. "आता 'घड्याळाची' वेळ गेली असून 'पतंग' उडवण्याची वेळ आली आहे," असे म्हणत त्यांनी मतदारांना एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. "लोक मला म्हणतात मी भाजपची बी टीम आहे. पण मी कोणाची टीम नाही, मी तर अल्लाचा पुतळा आहे आणि लोकांसाठी काम करायला आलो आहे," असे उद्गार त्यांनी काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi Counters Navneet Rana's 'Have Four Children' Remark in Amravati.

Web Summary : Owaisi slammed Navneet Rana's call for Hindu women to have four children, stating people could have eight if they wished. He also criticized Ajit Pawar and urged voters to support MIM candidates in Amravati elections.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा