शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:54 IST

Chhagan Bhujbal Yeola Assembly 2024: येवला विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शरद पवार छगन भुजबळाच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. शरद पवारांनी साथ सोडल्यापासूनच शरद पवारांनी येवला विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली होती. 

शैलेश कर्पे, नाशिकYeola Vidhan Sabha Election 2024: गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकांपासून येवला-लासलगाव मतदारसंघात वाढत्या मताधिक्याने विजयी होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्यासमोर यापूर्वी दोनवेळा पराभूत झालेले माणिकराव शिंदे यंदाही रिंगणात आहेत. यावेळी मतदारसंघातील विकास या मुद्द्याभोवती भुजबळ आणि शिंदे यांनी ही निवडणूक केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

२००४ साली छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात प्रवेश केला. सलग दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झालेल्या कल्याणराव पाटील यांना भुजबळ यांनी पराभूत करून येवला मतदारसंघात पाय रोवले. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत भुजबळ यांनी माणिकराव शिंदे यांना पराभूत केले. 

२०१४ आणि २०१९ या सलग दोन निवडणुकीत भुजबळ यांनी संभाजी पवार यांना पराभूत करून सलग चारवेळा येवला मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळविला. या २० वर्षांच्या काळात भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचा मोठा विकास केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून भुजबळ यांना मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे मनोज जरांगे यांनी टार्गेट बनवले आहे. त्याचे पडसादही येवला मतदारसंघात उमटतांना दिसून येत आहेत.

नेहमीच कांदा भाव आणि पाणीप्रश्नामुळे चर्चेत राहणाऱ्या या मतदारसंघात येवला तालुक्यातील १२४ गावे आणि निफाड तालुक्यातील ४६ गावे असा १७० गावांचा येवला-लासगाव मतदारसंघ बनला आहे. 

येवला तालुक्यातील अंदरसूल, राजापूर, नगरसूल, पाटोदा व मुखेड ही पाच जिल्हा परिषद गट आणि येवला नगरपरिषद यांच्यासह निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर आणि देवगाव या तीन जिल्हा परिषद गटांचा या मतदारसंघात समावेश आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभे ठेवले आहे. 

१९९० मध्ये माणिकराव शिंदे यांनी अपक्ष, तर २००९  साली शिवसेना पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली आहे. मात्र त्यांना अद्याप यश मिळाले नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा माणिकराव शिंदे यांना भुजबळ यांच्याविरोधात उतरविले आहे. 

भुजबळ यांच्यासाठी माजी आमदार कल्याणराव पाटील, अंबादास बनकर हे प्रचाराची धुरा सांभाळताना दिसून येत आहेत, तर माणिकराव शिंदे यांच्या प्रचाराची मदार मारोतराव पवार, नरेंद्र दराडे, संभाजी पवार, कुणाल दराडे यांच्यावर दिसून येत आहे. यापूर्वी विकासाच्या मुद्द्यावर बाजी मारणारे भुजबळ यंदाही विकास आणि पाणी, रोजगार मुद्द्यांवर पुन्हा मतदारांना आवाहन करीत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे.

शरद पवारांचे भुजबळांविरोधात 'मराठा कार्ड'

छगन भुजबळ चारवेळा येवला मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. यावेळी पहिल्यांदाच भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी मराठा समाजाचे माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

भुजबळांनी साथ सोडल्यानंतर उमेदवार देताना चुकल्याचे म्हणत शरद पवार यांनी येवलेकरांची माफी मागितली होती. आता भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार स्वतः येवला मतदारसंघात सभा घेत आहे. त्यामुळे पवारांची साथ सोडलेल्या भुजबळांना येवला मतदारसंघ कितपत साथ देतो हे निवडणूक निकालानंतर समजणार आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट...

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे यांना ९३ हजार ५०० मते मिळाली होती, तर महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना ८० हजार २९५ मते मिळाली होती. 

त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीला १३ हजार २०५ मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भुजबळ आणि महाविकास आघाडीचे शिंदे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. लोकसभेला कांदा आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्दे ऐरणीवर होते.

मांजरपाडा पाण्याची खुशी आणि गम

मांजरपाडा प्रकल्पाला २००९ मध्ये मान्यता मिळाली. या कालव्याचे काम करण्यासाठी भुजबळांनी प्रतिष्ठा पणाला लावली. अडीच वर्षांपूर्वी या पाण्याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्यात या कालव्याचे पाणी शेवटचे टोक असलेल्या डोंगरगावच्या तलावात सोडण्यात आले. त्यावेळी या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला. डोंगरगावपर्यंत मांजरपाड्याचे पाणी पोहोचू शकते याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

निफाड तालुक्यातील ४६ गावांची निर्णायक भूमिका

येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील लासलगाव, विचूर आणि देवगाव या तीन जिल्हा परिषद गटातील ४६ गावांचा समावेश असल्याने या मतदारांची भूमिकाही या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. त्यानुसार उमेदवारांकडून प्रचाराची रणनिती आखली जात आहे. माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, जयदत्त होळकर यांच्यासह या स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकyevla-acयेवलाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळ