शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम

By admin | Updated: August 22, 2016 05:56 IST

मुंबईच्या रस्त्यावर कमी खड्डे असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ अखेर उघडे पडले आहे़

शेफाली परब,

मुंबई- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यावर कमी खड्डे असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ अखेर उघडे पडले आहे़ पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहर व उपनगरातील खड्ड्यांची संख्या ३७०० वर पोहोचली आहे़ सर्वाधिक खड्डे पश्चिम उपनगरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे़दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई खड्ड्यांतच गेली. त्यात एप्रिल महिन्यात उघड झालेल्या घोटाळ्याने रस्त्यांच्या कामांचे बिंग फोडले. तरीही गेल्यावर्षी यापेक्षा अधिक खड्डे होते, असा दावा करीत आपली अब्रू वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरू होता़ मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील खड्ड्यांनी गतवर्षीचा विक्रम मोडला आहे़२०१५ मध्ये या काळात मुंबईच्या रस्त्यांवर तीन हजार ४९१ खड्डे पडले होते़ यंदा तीन हजार ६३८ खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर पडले आहेत़ यापैकी आता केवळ १५९ खड्डे भरणे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे़ मात्र या आकडेवारीवरून खड्डे बुजविण्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे़>उपनगरे खड्ड्यांतवांद्रे ते दहिसरपर्यंत असलेल्या पश्चिम उपनगरातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यांत असल्याचे दिसून आले आहे़ अंधेरीत ४१५, मालाड-मालवणी ३८९ तर बोरीवलीत ५५१ खड्ड्यांची नोंद झाली आहे़>खड्ड्यांत गेलेले वॉर्डबोरीवली विभाग हा सर्वाधिक खड्ड्यांत गेलेला विभाग ठरला आहे़ तेथील रस्त्यांवर ५५१ खड्डे पडले आहेत़ तर कुलाबा, फोर्ट, चर्चगेटमध्ये १६७ आणि दादरमध्ये २१६ खड्डे पडले आहेत़ त्यापाठोपाठ पूर्व उपनगरात कुर्ला आणि गोवंडी, मानखुर्द हा विभाग खड्ड्यांत आहे़ १६० ते १७० खड्ड्यांची या विभागांमध्ये नोंद झाली आहे़