यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्यावर भर

By Admin | Updated: June 17, 2014 20:19 IST2014-06-17T19:49:41+5:302014-06-17T20:19:53+5:30

बीबीएफने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकरी यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्याकडे वळला आहे. याकरिता कृषी विभाग, आत्माच्यावतीने शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

This year, BBF stresses sowing soya beans | यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्यावर भर

यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्यावर भर

अकोला : बीबीएफने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकरी यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्याकडे वळला आहे. याकरिता कृषी विभाग, आत्माच्यावतीने शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
अकोला तालुक्यातील आखतवाडा येथे बीबीएफ यंत्राने सोयाबीनची पेरणी करण्यासंबधी शेतकर्‍यांना मंगळवार १७ जून रोजी प्रशिक्षण देण्यात आले. शेतकर्‍यांच्या शेतावर या यंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा समितीचे अध्यक्ष हेमंत देशमुख होते, तर सुरेश मुंदडा, बन्सी बोपटे, सरपंच अर्चना तालोट, डॉ. पंदेकृविचे कापूस तज्ज्ञ डॉ. आदीनाथ पसलावार, डॉ. विकास गौड, प्रकल्प उपसंचालक कुर्बान तडवी, तालुका कृषी अधिकारी के.आर. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख यांनी आपल्या भाषणातून आत्माच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या शेतावर पोहोचवले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. पसलावार यांनी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, कपाशी, सोयाबीन पेरणी व बीजप्रक्रिया आदींबाबत इत्यंभूत माहिती दिली. डॉ. गौड यांनी तूर, मूग व उडीद पिकावर येणारे रोग, कीड व त्याचे व्यवस्थापन या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तडवी यांनी मूग पीक प्रात्यक्षिकाबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली. चौधरी यांनी बीबीएफद्वारे उत्पादनात भर पडत असल्यामुळे या यंत्राने सोयाबीन पेरणी करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना दिला. त्यांनी पीक विमा काढण्यासंबंधी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आखतवाडा,आपातापा, शामाबाद, सुलतान अंजनपूरसह परिसरातील बहुसंख्य शेतकर्‍यांसह आत्माचे तालुका तज्ज्ञ व्यवस्थापक व्ही.एम. शेगोकार, एम. आर. निखाडे, अनंत देशमुख, आर.एस. कोकणी, एम.एम. बेदरे, विजय तालोट यांची उपस्थिती होती. संचालन देशमुख यांनी, आभारप्रदर्शन शेगोकार यांनी केले.

Web Title: This year, BBF stresses sowing soya beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.