शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

"ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए"; मनसेचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 2:02 PM

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर सर्व नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील सदैव अटल समाधी स्थळावर केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि एनडीए नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. देशाच्या जडणघडणीत अटबिहारी यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांची ९९ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियातूनही त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. 

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावरुन, केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांचा संसदेतील एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आणि तत्कालीन सरकारच्या कामकाजाची पद्धत सांगितली आहे. सरकार येईल, आणि जाईल. पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. 

तत्कालीन पी.व्ही. नरसिंग राव यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी यांनी सांगितली होती, हे सांगतानाच त्यांनी देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यावरुन, मनसेनं विद्यमान मोदी सरकारला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.  

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, हि अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज...? असा प्रश्न मनसेनं विचारलं आहे. मनसेनं अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे.  तसेच, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना कि पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, असेही मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजपाच्यावतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अटबिहारी वाजपेयी यांची ९९ वी जयंती देशभरात साजरी होत आहे. त्यांचे जुने व्हिडिओ, त्यांचे कोट्स शेअर करुन सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीMNSमनसेBJPभाजपाPakistanपाकिस्तान