यवतमाळमध्ये आज २१५ जण पॉझिटिव्ह,५६ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 18:24 IST2021-02-24T18:24:03+5:302021-02-24T18:24:35+5:30
गेल्या २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह २१५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन ...

यवतमाळमध्ये आज २१५ जण पॉझिटिव्ह,५६ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू
गेल्या २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह २१५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष आणि ९४ महिला आहेत. यात यवतमाळ येथील १०० रुग्ण, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी ३, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी २, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी १ रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 1271 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1056 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16716 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14969 आहे. तर जिल्ह्यात एकूण 451 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 156701 नमुने पाठविले असून यापैकी 155579 प्राप्त तर 1122 अप्राप्त आहेत. तसेच 138863 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.