शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:27 IST

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देहे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही.काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेशी खेळू नका. राजकारण राजकारण्यांना करू द्या, नाही तर थेट राजकारणात या, आडून आडून खेळण्यात मजा नाही, असे आव्हान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सिनेकलाकार आणि वृत्तवाहिन्यांच्या न्यूज अँकर्सना दिले आहे. 

यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करत हे आव्हान दिले आहे. ट्विटमध्ये ठाकूर म्हणाल्या, "काही सिनेकलाकार - न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा,पण म्हणून इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका. जाता जाता - राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून आडून खेळण्यात काही मजा नाही!"

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव -कंगनाने मुंबई ही पीओकेसारखी वाटते, मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबई पोलिसांपेक्षा माफिया बरे अशी वक्तव्ये केली होती. यावरून महाराष्ट्रासह अभिनेते, नेत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. यावरून वेगवेगळे राजकीय रंग देण्याचे सुरु असताना आता काँग्रेसने कंगनाविरोधात हक्कभंग सादर केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. 

अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग प्रस्ताव -रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर गोस्वामींनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत यांच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली असून त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरी भाषेत केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.  

महत्त्वाच्या बातम्या -

महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरKangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस