शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

हे यश कॉपीमुक्त अभियानाचे!

By admin | Updated: June 18, 2014 04:25 IST

आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली

राजेंद्र दर्डा, (शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल तब्बल ९६.४५ टक्के लागला आहे. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड व नाशिक या जिल्ह्यांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समकक्ष झाला आहे. सीबीएसई पॅटर्न व राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये फारसा फरक राहिलेला नाही, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. गेल्या चार वर्षांपासून राज्यात कॉपीमुक्त अभियान अत्यंत कडकपणे राबविण्यात आले. त्यातून परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यात आला. पण कॉपीमुक्त अभियानाला सुरुवात करताच मार्च २०११चे निकाल कमी लागले होते. त्या निकालावरून ओरडही झाली होती. विशेषत: नागपूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर या विभागांचे निकाल खूपच कमी लागले होते. आता मात्र चार वर्षांनंतर मार्च २०१४च्या निकालाची तुलना केली तर राज्याचा सर्वसाधारण निकाल सरासरी १७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातही औरंगाबाद विभागाच्या निकालात ३२ टक्के, अमरावती विभागाच्या ४१ टक्के, लातूर विभागाच्या निकालात २५ टक्के वाढ झाली आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. या निकालाबद्दल एक स्वागतार्ह बदल मी अधोरेखित करू इच्छितो तो हा की, मार्च २०११मध्ये राज्यातील सर्व विभागांत निकालामध्ये मोठी तफावत व असमतोल होता. परंतु या वेळेस १२वीच्या निकालाप्रमाणेच १०वीच्या निकालातही विभागातील असमतोल व निकालातील तफावत खूप कमी झाली आहे. सर्वांनी मिळून राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा मोठा फायदा झाला. मुले अभ्यासाकडे वळली. त्यातून गुणवत्तेला चालना मिळाली. शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आज रोजी जाहीर झालेला निकाल ८८.३२ टक्के लागला, यातच कॉपीमुक्ती अभियानाचे यश प्रतिबिंबित होते. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के सर्वाधिक असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४.२९ टक्के हा सर्वांत कमी आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील २०,७३१ माध्यमिक शाळांतून विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मला याचा आनंद आहे की, त्यापैकी १९ टक्के म्हणजे ३,९४९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ४० टक्के (पान १० वर)