शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या कपाळावर आकडे टाकणे चुकीचे, एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील प्रकारावरून हायकोर्टाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:28 IST

एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कपाळावर आकडे टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला होता.

मुंबई - एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कपाळावर आकडे टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकाराबद्दल आज हायकोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावताना मृतांच्या डोक्यावर आकडे टाकणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेबाबतच्या एका प्रकरणाची  आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मृतांच्या कपाळावर आकडे टाकण्याच्या प्रकारावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली. तसेच या प्रकाराचा जाब विचारणाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. मात्र शवविच्छेदन करताना डॉक्टरांनी डोक्यावर आकडे टाकले, असा दावा राज्य सरकारने केला. दरम्यान, एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.  २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोडच्या पुलावर ही दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत २३ जण मृत्युमुखी पडले. या मृतांचे शवविच्छेदन केईएम रुग्णालयात झाले. त्या वेळेस रुग्णालयातील डॉक्टरने मृतांच्या डोक्यावर मार्करने १ ते २३ आकडे टाकले. असे आकडे बहुतेकवेळा अतिरेकी अथवा गँगस्टरचे एन्काउंटर केल्यानंतर टाकले जातात, अशी संतापजनक प्रतिक्रिया मुंबईकरांमधून उमटली होती.  त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केईएमच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरीश पाठक यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.  

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार