शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:44 IST

पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

ची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला -  गजानन मोहोडअमरावती - दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांंच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या ११ महिन्यांत १०५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकरी बाहेर यावा, यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंताळ्यात बहुतांश शेतकरी वंचित राहिले. या कर्जमाफीनंतरही विदर्भातील सहा जिल्ह्यांत साडेतीन हजार शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यंदा जानेवारी महिन्यात ८५, फेब्रुवारी ७८, मार्च ९२, एप्रिल ७८, मे ९८, जून ९५, जुलै १०५, आॅगस्ट ११४, सप्टेंबर १०६ आॅक्टोबर ८६, नोव्हेंबर ९५ व १५ डिसेंबरच्यापर्यंत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या सन २००१ पासून या सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त सात हजार ६६७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ हजार ९५० प्रकरणे अपात्र, तर २९६ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आतापर्यंत सात हजार ६३२ प्रकरणांत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे.सन २००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास सन २००५ च्या शासनादेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरुप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ज्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

आत्महत्यांचा आलेख वाढताचसन २००१ मध्ये ५२ शेतकरी आत्महत्या होत्या. सन २००२ मध्ये १०४, सन २००३ मध्ये १४८, सन २००४ मध्ये ४४८, सन २००५ मध्ये ४४५, सन २००६ मध्ये १४४९, सन २००७ मध्ये १२४७, सन २००८ मध्ये ११४८, सन २००९ मध्ये १००५, सन २०१० मध्ये ११७७, सन २०११ मध्ये ९९९, सन २०१२ मध्ये ९५१, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१५ मध्ये १३४८, सन २०१६ मध्ये १२३५, सन २०१७ मध्ये ११७६ व सन २०१८ मध्ये ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात मागील दोन वर्षांनंतर कमी झालेल्या शेतकरी आत्महत्या  यंदा वाढल्या आहेत. किंबहुना यंदा राज्यात सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यांत २५८, अमरावती  २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्धा जिल्ह्यात ७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व सलग नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र