शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 20:01 IST

Worli Assembly Election 2024 Result Updates: लोकसभेला मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते, परंतू उद्धव ठाकरेंनी ते न दिल्याने देवरा शिंदे गटात गेले होते. हेच देवरा विधानसभेला आदित्य ठाकरेंसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले होते.

Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेली निवडणूक काँग्रेसचे उरलेले गडही उध्वस्त करून गेली आहे. महायुती, मविआ, महाशक्ती, मनसे, अपक्ष अशा लढ्यात अनेकांचे गड गेले, वाचले आहेत. अशाच बहुरंगी लढतीचा थेट फायदा आदित्य ठाकरेंना झाला आहे. गेल्यावेळी राज ठाकरेंनीआदित्य ठाकरेंना थेट पाठिंबा दिला होता, तर आताही राज ठाकरेच कळत-नकळत आदित्य ठाकरेंच्या मदतीला आले आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने माहिममध्ये विजय प्राप्त केला आहे. तिथे राज ठाकरेंनी पूत्र अमित ठाकरेंना उभे केले होते. सदा सरवणकर आणि अमित ठाकरे अशीच ही निवडणूक रंगली होती. यात दोघेही पराभूत झाले तर ठाकरे गटाचे महेश सावंत जिंकले आहेत. इकडे वरळीतही शिंदे गटाने आदित्य ठाकरेंची आमदारकी घालविण्याची पूर्ण तयारी केली होती, परंतू भाजपा-महायुतीकडे जाऊ शकणारी मनसेची मते मनसे उमेदवाराने घेतल्याने अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना मोठी मदत झाली आहे. 

लोकसभेला मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते, परंतू उद्धव ठाकरेंनी ते न दिल्याने देवरा शिंदे गटात गेले होते. हेच देवरा विधानसभेला आदित्य ठाकरेंसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले होते. लोकसभेला मनसेने भाजपाला पाठिंबा दिला होता. परंतू विधानसभेला राज यांनी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यात महिममध्ये शिंदे गटाने माघार न घेतल्याने पुढचे सर्व एकमेकांना मदतीचे मार्ग बंद झाले होते. 

आदित्य ठाकरेंना वरळीत देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना टक्कर द्यायची होती. परंतू देशपांडे यांनी 18,858 मते घेतल्याने देवरांचा खेळ बिघडला आणि आदित्य ठाकरेंचा 8,000 मतांनी विजय झाला. आदित्य यांनी 60,606 मते घेतली तर देवरा यांना 52,198 मते मिळाली. मनसे उमेदवार नसता तर मतांचा खेळ काही वेगळाच रंगला असता. अप्रत्यक्ष रित्या राज यांनी आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचविली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४worli-acवरळीShiv Senaशिवसेना