शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 12:44 IST

एकाच वेळी एकाच प्रकारची रोपे वाटपाचा विक्रम यापुर्वी दुबई येथील एका शाळेच्या नावावर आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीजिल्ह्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना कडूनिंबाच्या रोपांचे वाटप

पुणे : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना कडूनिंबाच्या रोपांचे वाटप करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विश्वविक्रम  करण्याच्या तयारीत आहेत. दि. २३ जून रोजी विद्यापीठाच्या मुख्य क्रीडांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांचा यावेळी सहभाग असेल.समर्थ भारत अभियानांतर्गत यंदा ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ३५ हजार स्वयंसेवक आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. यानिमित्त दि. २३ जून ते १५ जुलै या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व विद्यापीठाच्या समन्वयातून आणि शिवाजी विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रम घेण्यात येणार आहेत.एकाच वेळी एकाच प्रकारची रोपे वाटपाचा विक्रम यापुर्वी दुबई येथील एका शाळेच्या नावावर आहे. या शाळेने ९ हजार ४०० रोपांचे वाटप केले आहे. आता विद्यापीठाकडून सुमारे १५ हजार कडूनिंबाची रोपे वाटून नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीदरम्यान दोन्ही वारीमार्गांवर ५० लाख पत्रावळ््यांचे वाटप व संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वारीदरम्यान गोळा होणाºया कचºयाचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. सुमारे ३५ स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यांसह विविध प्रबोधन, स्वच्छता कार्यक्रम, आरोग्य शिबीरे घेण्यात येणार आहे. वारीमध्ये विद्यापीठाच्या प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दिंडीही दोन्ही मार्गांवर संपुर्ण वारीत सहभागी होणार आहे. ------------------विद्यापीठाच्या वारीची वैशिष्ट्य - १५ हजार रोपांच्या वाटपाचा विक्रम करणार- ५० लाख पत्रावळ््यांचे वाटप व संकलन- ३५ मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबीरे- वारी मार्गावर ३५ हजार वृक्षारोपण- कचºयाची कंपोस्ट खतनिर्मिती--------------------------

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसenvironmentवातावरणAshadhi Ekadashiआषाढी एकादशी