शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ओझोन संवर्धन दिन विशेष : ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यांपर्यंतचे छिद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:09 IST

सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे..

ठळक मुद्देओझोन छिद्राचा मानवी जीवनावर परिणाम प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर

पुणे: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनांचा व धुर ओकणाºया वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यापर्यंतचे छिद्र तयार झाले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे, असे भूशास्त्राच्या अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जगभरात १६ सप्टेबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने ‘लोकमत’ने भूशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधला.अवकाशात तपांबराच्या वर २० ते ३० किमी मध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत. परंतु, तापमानात वाढ होऊन वातावरणातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चालेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधने आदींमुळे क्लोरो फोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनला छिद्र पडते. ही प्रक्रिया होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे आणि शीत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वाढत्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया जलद गतीने होत आहे.भूशास्त्राचे अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,आशिया खंडामध्ये ओझोनच्या छिद्राचे प्रमाण ८ ते १० टक्के असून उत्तर धृवाच्या दिशेने गेल्यावर हे प्रमाण ३० टक्के तर अंटरटिकाकडे हे प्रमाण ६० टक्के आहे. वाढत्या एअर कंडिशनर,रेफ्रिजरेटर आणि धूर ओकणाºया वाहनांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला धोका पोहचत आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्त्वचेचे कॅन्सर आणि श्वसनाचे विकार होत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealthआरोग्य