शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे काम वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:47 IST

शैक्षणिक वर्ष २0१९-२0 सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात सर्वार्थाने नवीकोरी पुस्तके पडणार

ठळक मुद्देजानेवारी-फेब्रुवारीत पुस्तके बाजारात दाखलअभ्यासक्रमाचे काम येत्या डिसेंबर महिनाअखेरपर्यंत अंतिम टप्प्यात येणार

पुणे : विद्यार्थ्यांना कालसुसंगत शिक्षण घेता यावे; या उद्देशाने बालभारतीकडून इयत्ता तिसरी व इयत्ता बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २0१९-२0 सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात सर्वार्थाने नवीकोरी पुस्तके पडणार आहेत. येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बारावीची सर्व विषयांची नवीन पुस्तके बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.पहिलीपासून बारावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके बालभारती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विषयतज्ज्ञांकडून नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या कोणत्या घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असावा, याबाबत अभ्यास मंडळातील सदस्य चर्चा करत आहेत. अभ्यासक्रमाचे काम येत्या डिसेंबर महिनाअखेरपर्यंत अंतिम टप्प्यात येणार आहे. त्यानंतर विषयतज्ज्ञ व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येकी दोन शिक्षकांसमोर  नवीन अभ्यासक्रम ठेवला जाईल. पाठपुस्तक निर्मितीच्या विविध प्रक्रियेतून सर्व विषांची पुस्तके गेल्यानंतर ही पुस्तके छपाईसाठी दिली जातील. इयत्ता बारावीच्या गुणांवर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षा अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. नव्याने तयार होणाऱ्या बारावीच्या पुस्तकांमध्ये या प्रवेशपूर्व परीक्षांना पूरक असणाऱ्या घटकांचा समावेश केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून पुस्तके तयार केली जात आहेत. विज्ञान व गणित या विषयांच्या पुस्तकांवर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता तिसरीपेक्षा बारावीची पुस्तके बाजारात लवकर आणली जाणार आहेत............बालभारतीकडून यंदा इयत्ता तिसरी व बारावीची नवीन पुस्तके तयार केली जात आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांकडून नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके उपलब्ध होतील.- विवेक गोसावी, संचालक, बालभारती.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण