आडाळीतील आयुर्वेदिक प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, श्रीपाद नाईक यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:02 AM2022-01-13T01:02:18+5:302022-01-13T01:03:11+5:30

Adali Ayurvedic project : दोडामार्ग तालुक्यात आडाळी येथे आयुष मंत्रालयाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आयुवेर्दिक वनस्पती संशोधन प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

Work on Adali Ayurvedic project will start soon, assures Shripad Naik | आडाळीतील आयुर्वेदिक प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, श्रीपाद नाईक यांचे आश्वासन

आडाळीतील आयुर्वेदिक प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, श्रीपाद नाईक यांचे आश्वासन

Next

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्यात आडाळी येथे आयुष मंत्रालयाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आयुवेर्दिक वनस्पती संशोधन प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयुवेर्दिक वनस्पती  तसेच वैदू यांचा आयुष मंत्रालयाच्या संशोधन विभागाकडून समन्वय साधू असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या कार्यक्रमा नंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे,माजी आमदार राजन तेली,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,अन्नपूर्णा कोरगावकर साक्षी वंजारी उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले केंद्रीय आयुष्य मंत्रालयाचा आडाळी येथे वनस्पती संशोधन प्रकल्प मंजूर आहे त्यासाठी राज्य सरकारने जमीन हस्तांतरण केली आहे आता या प्रकल्पासाठी भरीव आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. आयुष्य मंत्रालय माझ्याकडे असल्याने आर्थिक तरतुदी वर भर दिला जाईल असे मंत्री नाईक म्हणाले.

आंबोली या सह्याद्री पटृटात ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. या औषधी वनस्पतींचे औषधी गुणधर्म जाणारे वैदू देखील आहेत. त्यांच्याकडून माहिती संकलन करून ठेवल्यास आणि या औषधी वनस्पतीचा उपयोग निश्चित झाल्यास आयुर्वेदामध्ये फायदा होईल याकडे  मंत्री नाईक यांचे लक्ष वेधले असता त्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण विचार करू तसेच नजिकच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष मंत्रालयाच्या संशोधन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणून औषधी वनस्पती आणि वैदूंचा समन्वय साधला जाईल असे ही त्यानी यावेळी सांगितले. भविष्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयुर्वेदिक वनस्पती ह्या फायदेशीर ठरू शकतील गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल असा विश्वास मंत्री नाईक यांनी व्यक्त केला. भाजपाची सत्ता येईल मात्र मुख्यमंत्री आपण होणार का यावर त्यांनी मौन बाळगत सिम्त हास्य करत हा विषय टाळला.

Web Title: Work on Adali Ayurvedic project will start soon, assures Shripad Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.